यात दिसतात ते खरेखुरे पायलट आहेत, मॉडेल्स नाहीत

यात दिसतात ते खरेखुरे पायलट आहेत, मॉडेल्स नाहीत

Tuesday May 23, 2017,

2 min Read

साधारण वर्षभरापूर्वी हवाईदलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात महिलांना सामावून घेण्यात आले. या निर्णयाचा लिंगभेदाच्या प्रश्नावर सकारात्मक परिणाम आता नव्या व्हिडिओमुळे दिसून येवू लागला आहे. यात चर्चा आहे ती ‘महिला ज्या आमच्या घराचे रक्षणही करतात’!

याबाबतच्या वृत्ता नुसार, सरकारने मागच्या वर्षी परवानगी दिल्यानंतर सहा महिला फायटर पायलट होण्याच्या तयारीत होत्या. मात्र त्यातील केवळ तिघींना यासाठी निवडण्यात आले आणि त्या आता कर्नाटकच्या बिदर येथे प्रशिक्षण घेत आहेत. अशावेळी महिलांच्या या साहसाला पाठबळ देण्यासाठी आणि आणखी मुलींनी यासाठी पुढे यावे म्हणून भारतीय हवाईदलाने एक व्हिडीओ जारी केला आहे, ‘एक लडकी हू मै’ (मी एक मुलगी आहे.) . 


फोटो सौजन्य - युट्यूब

फोटो सौजन्य - युट्यूब


आम्ही आजही त्याच मानसिकतेमध्ये जगतो आहोत ज्यात मुलीने घराबाहेर जावू नये असे आम्हाला वाटते. तीने घर पहावे आणि मुलांना जन्म द्यावा. मात्र हवाईदलाच्या नव्या (व्हिडिओ) चित्रफितीमध्ये हे आव्हान स्विकारण्याची प्रेरणा दिली जाते, की आमच्या या मुलींचा अभिमान बाळगा ज्या घराच्या संरक्षणासाठी देखील सक्षम आहेत. संदिपान भट्टाचार्य मुख्य कार्यकारी आणि ग्रे समुहाच्या कार्यालयाचे मुख्याधिकारी म्हणाले की, “ तुम्हाला याची दखल घ्यावी लागेल की गेल्या दीड वर्षात लैंगिक समानतेबाबत खूप चर्चा झाल्या. ब-याच लोकांनी यामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही यावर विचार करता तर, त्याच्या गाभ्यातच हवाईदलाने हे सारे प्रत्यक्षात करून दाखवले आहे, ज्यातून याबाबत वाद घालणा-यांना प्रतिवाद करताच येणार नाही”.

संदिपान म्हणतात की, “ बरेच ब्रांड समानतेबाबत बोलतात, मात्र फार थोडे यात काही करून दाखवितात.” किंवा ते म्हणतात, “ वॉक द टॉक” अजून काय हवे यात दिसतात ते खरेखुरे पायलट आहेत, मॉडेल्स नाहीत.

या चमूला सहा ते आठ महिने वेळ लागेल कारण हा व्हिडीओ तयार करण्यात त्यांना अनंत अडचणी जसे की लेहच्या निषिध्द भागात चित्रीकरण वगैरे आहे. पण सांदिपान म्हणतात की, “या प्रेमाच्या प्रसुतीकळाच समजा!”

एक लडकी हू मै - व्हिडीओ

    Share on
    close