पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद, मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद, मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Wednesday November 09, 2016,

1 min Read

काळ्या पैशाचा पोलखोल करण्‍यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० रुपयाच्‍या नोटा चलनातून बाद करण्‍यात आल्‍याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ज्‍यांच्‍याकडे पाचशे व हजाराच्‍या नोटा आहेत त्‍यांनी त्‍या बँकेत अथवा पोस्‍ट ऑफीसमध्‍ये जमा करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. 

image


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी संवाद साधताना देशातील गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात काळा पैसा आणि नकली नोटांबाबत बोलताना त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. या निर्णयामुळं देशवासियांमध्ये निर्माण होणार संभ्रम दूर केला. सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून ठराविक रक्कमच काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता. 

विशेष म्‍हणजे पुढचे तीन दिवस रेल्‍वे, रुग्‍णालय, विमानतळ येथे जुन्‍या नोटा चालणार आहेत. देशभरातील सर्व बँका ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. आता २००० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव स्वीकारला आहे. १० नोव्हेंबरलाही काही एटीएम मशीन बंद ठेवण्यात येणार आहेत.