५०० आणि २००० रुपयाच्या नोटा काढण्यासाठी ४० टक्के नवीन एटीएम कार्यान्वित

५०० आणि २००० रुपयाच्या नोटा काढण्यासाठी ४० टक्के नवीन एटीएम कार्यान्वित

Wednesday November 23, 2016,

1 min Read

दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांचे आकार वेगळे असल्यामुळे एटीएममध्ये ते बसवण्यासाठी रिकॅलिब्रेशन करण्यात आले आहे. देशातील एकूण एटीएमपैकी ४० टक्के म्हणजेच ८२५०० एटीएम ५०० आणि २००० रुपयाच्या नवीन नोटा काढण्यासाठी कार्यान्वित झाले आहे. एटीएम यंत्रणेत नव्याने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्येही बदल केले आहेत. 

image


कालपर्यंत देशभरातील एकूण २.२ लाख एटीएम यंत्रणांपैकी ८२५०० एटीएम नवीन नोटांच्या रचनेनुसार कार्यान्वित करण्यात झाले होते. कॅश लॉजिस्टिक एसोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रितुरात सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, शासनाकडून मिळालेल्या निर्देशांकानुसार काम सुरु आहे. या कामासाठी अधिक मनुष्यबळ संघटीत करून कार्यान्वित करण्यात आले आहे. आणि ग्राहकांच्या सोयीसाठी हे कार्य जलदगतीने सुरु आहे.

रिझर्व बँकेचे डेप्युटी गर्वनर एस. एस. मुंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली हे काम सुरु आहे. ग्रामीण भागात देखील ही सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी हे संघटन प्रयत्नशील आहे.