क्रिकेट प्रशिक्षिका सकीना अख्तर यांनी काश्मीरमधील वहिवाट मोडीत काढली

क्रिकेट प्रशिक्षिका सकीना अख्तर यांनी काश्मीरमधील वहिवाट मोडीत काढली

Sunday January 01, 2017,

2 min Read

सकीना अख्तर, एक मुलगी जी आशावादी आहे आणि स्वप्न पहाते, भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे. हे स्वप्न तिने पाहिले ज्यावेळी तिच्या घरातून कुणाचा पाठिंबा नव्हता. तिच्या आवडीप्रमाणे वागता येत नव्हते, यातून अखेर बाहेर पडण्याचा निर्धार तिने केला, अनेक अडचणींना तोंड देत तिने काश्मीर विद्यापीठ गाठले आणि गेल्या आठ वर्षापासून क्रिकेटमध्ये प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात सकीनाने भारताच्या काही सुपरस्टार खेळाडूंना घडविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.


Source : The Tribune

Source : The Tribune


श्रीनगर मधील मुनवराबादमध्ये राहणा-या सकीना यांनी क्रिकेटपेक्षा वेगळ्या क्षेत्रात कारकिर्द करण्याबाबत कधी विचारच केला नव्हता, आज त्या काश्मिरमधल्या एकमेव महिला क्रिकेट प्रशिक्षिका आहेत आणि सध्या १९ वर्षाखालील राज्याच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देत आहेत.

“ज्यावेळी, मी लहान होते, माझ्या भागातील मुलांच्या क्रिकेटसंघाचा मी भाग असे. त्याच काळात मी खेळातील बारकावे शिकले.”एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले. मात्र सकीनाला माध्यमिक वर्गात गेल्यानंतर क्रिकेट खेळणे सोडून द्यावे लागले. कारण तिचे खेळणे कुणाला रुचणारे नव्हते. त्यांनतर तिने शाळेतील क्रिकेटसंघात सहभाग नोंदविला आणि आंतर शालेय, जिल्हा आणि राज्य क्रिकेटसंघात सामने खेळण्यासाठी जावू लागली. १९९८ मध्ये सकीनाने तिच्या जीवनातील पहिल्यांदा १९ च्या खालच्या वयोगटातील सामना खेळला. त्यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी आणि सर्वाधिक धावा करून सकीना ‘महिला सामना मालिका वीर’ ठरली.

श्रीनगरमध्ये महिला महाविद्यालयात आल्यानंतर, वर्गाना दांड्या मारून आणि क्रिकेटच्या मैदानावर जास्तीत जास्त वेळ देत सकीनाने सरावातून खूप चांगल्या पध्दतीने स्वत:ला तयार केले. “ माझ्या घरच्यांनी पाठिंबा दिला, पण त्यांनी मला सर्वात आधी स्वत:च्या शिक्षणासाठी लक्ष देण्यास सांगितले.” सकीना सांगते. महाविद्यालयातून निघाल्यावर तिने काश्मीर विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. लवकरच तिच्या लक्षात आले की जीवनात तिला काय करायला पाहिजे, त्यामुळे पहिल्या सेमिस्टर नंतर तिने विद्यापीठ सोडले आणि दिल्लीला खेळातील पदविका मिळविण्यासाठी रवाना झाली, बीसीसीआयची ’अ’ स्तरा’ची परिक्षा २००९मध्ये उत्तिर्ण केली. त्यांनतर तिने काश्मीर स्पोर्टस् परिषदेसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिने नवतरुणांची अनेक शिबीरे घेतली. “ माझे पहिले शिबीर पोलो मैदानावर होते, ज्यावेळी काश्मिर खो-यातील २५०मुले वेगवेगळ्या शाळांतून आली होती,” तिने सांगितले. यातून तिचे समाधान झाले नाही तिने अनेक प्रकारची वेगवेगळी कामे केली आणि २००७मध्ये कंत्राटी पध्दतीने काश्मीर विदयापीठात काम मिळाले. आतापर्यंत तिने मुले आणि मुली दोघांना प्रशिक्षण दिले आहे.

जेंव्हा सकीनाला तिच्या भविष्यातील योजनेबाबत विचारणा केली, तिने सांगितले, “मला प्रशिक्षणाच्या सर्व तीन स्तरांचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यानंतर मी राष्ट्रीय प्रशिक्षक होईन, त्यातून मला भारतात कुठेही क्रिकेटच्या छंदासाठी प्रशिक्षण देता येऊ शकेल”.

    Share on
    close