अतिदुर्गम भागातील ६५० शौचालयाना पाणी मिळवून देणा-या या महिलेला भेटा!

0

माझारकोडी धनशेखर यांनी गावात ६५० शौचालये तयार करून गावाची ओळख बदलून टाकली आहे, आणि संवेदनशील नेतृत्व काय कसे करू शकते ते दाखवून दिले आहे. धनशेखर यांची ही किर्ती आज राज्यभर पसरली आहे, ज्यात त्यांनी दूर्गम भागातील पंचायतीच्या क्षेत्रात हे काम केले आहे. पंचायत गाव परिषदेच्या माध्यमातून २०११पासून अध्यक्ष झाल्यानंतर हे काम त्यांनी हाती घेतले.


धनशेखर (४९) या ४० माजी आणि सध्याच्या महिला पंचायत नेत्यांपैकी एक आहेत, ज्या स्वतंत्रपणे काम करतात आणि पुरूषांप्रमाणे जीवन जगतात. अनेक आर्थिक अडचणी असतानाही आणि पुरूष प्रधान राजकीय वातावरण असूनही तसेच मर्यादीत अधिकार असूनही त्यांनी त्यांच्यासाठी जिल्ह्याची नवी ओळख निर्माण केली आणि पुरूषांना मागे टाकत रस्ते, पिण्याचे शुध्द पाणी तसेच शौचालयांच्या सुविधा निर्माण केल्या आहेत.

राज्याचा जन्मदर सध्या ऑस्ट्रेलिया, फिनलँड आणि बेल्जीयम यांच्या पेक्षाही सर्वात कमी आहे.  बालमृत्यू आणि प्रसुती दरम्यानच्या मृत्यूमध्ये, तसेच महिला आणि बालकाविरोधातील गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील घट आणण्यात राज्याने यश मिळवले आहे असे २०१६च्या अहवालात नमूद केले आहे. मात्र मेलामारूंगूर सारख्या ठिकाणी जेथे चार दिवसांतून एकदाच पाणी मिळते, आणि जायला खडबडीत रस्ते आहेत, जिल्ह्यातील अधिका-यांना पोहोचणे अवघड जात होते, त्यामुळे त्यांना भेट देणे शक्य नव्हते असे धनशेखर सांगतात.

“ त्यांना आमच्या सारख्या दुर्गम भागातील पंचायतीबाबत काहीच वाटत नाही. याचा अर्थ त्यांच्या जवऴ आमच्या विकासासाठी निधी राखून ठेवला नव्हता. आम्ही केवळ त्याच्या भरवश्याने राहू शकत नव्हतो. पंचायतीमध्ये निधी शहराजवळच्या भागातून येतो.” (तालुक्याचे मुख्यालय कलाइयाकोवील येथून) त्यामुळे या गावात महिला आणि शाळेच्या गणवेशातील मुली नळाच्या बाजूला प्लास्टीकची भांडी घेवून रांगेत दर चार दिवसांनी पहायला मिळत, जेंव्हा पाणी येत असे धनशेखर म्हणाल्या.

“ मला हे चित्र बदलायचे होते, माझ्या मते एकच मार्ग होता, जिल्हा प्रशासनाने आमच्या सारख्या दुर्गम भागातील पंचायतीची दखल घ्यावी, त्यांना दाखवले पाहिजे की काय करता येवू शकते. मी ते करण्यात यश मिळवले.”

२००५ मध्ये, रामनाथपूरम जिल्ह्यातील आठ गावांना मेलामारूंगूर पंचायतीला जोडण्यात आले. मात्र राज्याच्या आर्थिक परिषदेने त्यांच्यासाठी असलेल्या निधीचे हस्तांतर मात्र मेलामारूंगूर पंचायतीला केले नाही. राज्याच्या अनुदानाचा या पंचायतीला एकमेव मोठा आर्थिक आधार असतो, धनशेखर यांनी यासाठी प्रथम लढा हाती घेतला. ज्यात याचिका दाखल करणे त्यात प्रत्येक आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहणे, या शिवाय सहा महिने राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाशी संपर्कात राहणे या सा-या गोष्टीचा समावेश होता. त्यांनी त्यांचे लक्ष पाण्याच्या टंचाईकडे वळविले.

धनशेखर यांची उपलब्धी त्यांनी केवळ ६५० शौचालये बांधली इतकीच नाही, तर त्यांनी ती इतरांच्या तुलनेत कमी खर्चात तयार केली आहेत, प्रत्येकी १३,५०० रूपये खर्च करून. ज्यापैकी बारा हजार स्वच्छ भारत अभियानातून अनुदान म्हणून मिळाले. त्यांनी बांधकाम साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने त्यात त्यांना कमी दर लागले. त्यामुळे केवळ ही शौचालये नाहीत तर अन्य काही बांधकामे त्याच खर्चात त्यांना करून घेता आली जसे की, दारिद्र्य निर्मुलन समितीचे कार्यालय.

घरगुती शौचालये बांधल्यास त्याला वीस ते चाळीस हजार खर्च होतो. असे २०१६च्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे. दिल्ली स्थित थिक टँकने हा अहवाल तयार केला आहे. धनशेखर यांना कमी पडलेल्या लाख भर रूपयांचा खर्च स्वत:हून करावा लागला. जो गावकरी परत देणार नाहीत. हे पैसे परत मिळणार नाहीत कारण धनशेखर मरयार समाजाच्या आहेत, जी धेवर या जातीची पोटजात आहे. त्यांच्या कुटूंबाकडे १५एकर जमीन आहे जी मेला मारूंगर येथे आहे. त्यामुळे हा खर्च त्यांना सहन करण्यासारखा होता जरी गेल्या पाच वर्षात शेतीमध्ये फारसे उत्पादन होत नसले तरी. पाऊस कमी झाल्याने त्यांच्या कुटूंबाचा सावकारीचा व्यवसाय चांगला चालतो. धनशेखर यांनी हा पैसा त्यांच्या गावावरील प्रेमापोटी खर्च केल्याचे सांगितले. कारण त्यांना जिल्ह्याच्या नकाशात गावाला आदर्श गाव म्हणून झळकवायचे होते. त्यांच्या सारख्याच इतर पंचायतीच्या महिला अध्यक्षा हे काम इतक्या प्रभावीपणे करू शकल्या नाहीत.