पंचावन्न वर्षांपूर्वी सहा पौंडात सुरू केला उद्योग,आज आहे तीन दशलक्ष डॉलर्सची सॉफ्टवेअर कंपनी!

0

नाझी जर्मनीतून पाच वर्षांच्या वयात सुखरुप बाहेर पडलेल्या डेम स्टेफनी शर्ली यांनी उदरनिर्वाहाच्या विचाराला कधी गृहित धरले नाही. त्यांनी १९६२मध्ये त्यावेळी सुरू सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली जेंव्हा संगणकासोबतच सॉफ्टवेअर मोफत मिळत असे. आज त्यांनी आपल्या उभारता उद्योग तीन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा केला आहे. स्टेफनी यांनी फ्रिलांसींगच्या विचारांना अंमलात आणले, महिलांना घरातूनच काम करण्याची संधी मिळाली, ज्याबाबत कधी ऐकायला मिळाले नव्हते. “ लोकांनी मला वेडी ठरवले, म्हणाले की सॉफ्टवेअर जर मोफत आहे तर कुणी त्यासाठी पैसे का देईल? पण मला खात्री होती की हार्डवेअर पेक्षा सॉफ्टवेअर जास्त महत्वाचे आहे.”

त्यांची उद्दिष्ट जी होती ती सरळ होती- सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना करणे, ज्यावेळी तेथे कुणीच अस्तित्वात नव्हते. त्याचबरोबर त्यांना कमी लेखणाऱ्या एखाद्या पुरुष वरिष्ठाला उत्तर द्यावे लागू नये. सोबतच महिलांना सक्षम बनवण्याची त्यांना आंस होती, ज्यातून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.

त्यांच्या टेडटाॅक अर्थात व्हिडीओ सादरीकरणातून असे लक्षात येते की, ‘सर्वात यशस्वी उद्यमीच्या बाबतीत आपण कधीच ऐकले नसेल’. टेडटाॅक शोच्या व्यासपीठावर त्यांच्या चर्चेतून त्यांनी काही अडचणींचा उल्लेख केला ज्या त्यांना जाणवल्या, जेथे केवळ पुरुषांची मक्तेदारी होती. त्यांनी अशा प्रक्रिया आणि मानकांबाबत सांगितले जी त्यांनी विकसित केली होती. त्यांची ही चर्चा पंधरा लाखवेळा पाहिली गेली आहे. त्यांचे आत्मचरित्र ‘लेट इट गो’ ज्यात एका आश्रित मुलाच्या यशस्वी उद्यमीची त्यात कहाणी सांगतात, त्या काळातील ते बेस्ट सेलर होते. डेम स्टेफनी यांची कंपनी फ्रिलान्स प्रोग्रामर्स अर्थात मुक्तपणे काम करण्याच्या संकल्पनेची अग्रभागी बनली, एक प्रतिभावान गणितज्ञ, त्या अशा निवडक दूरदृष्टीच्या लोकांपैकी एक आहेत ज्यांनी आधुनिक सॉफ्टवेअर उद्योगाची उभारणी केली, जसे आम्ही जाणतो, शेवटी जेंव्हा त्यांची कंपनी शेअरबाजारात आली तेंव्हा कंपनीचे सत्तर कर्मचारी करोडपती झाले. अधिकृतपणे १९९३मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपली बहुतांश संपत्ती दान केली, आणि त्या आता समर्पित परोपकारी झाल्या आहेत. डेम शर्ली यांनी ‘युवर स्टोरी’सोबत बोलताना १९६० मध्ये सुरु केलेल्या उभरत्या उद्योगाबाबत चर्चा केली. त्याकाळात देखील त्यांनी भारतीय महिलांना वरिष्ठपदांवर ठेवले, कंत्राट मिळवण्यासाठी पुरूष बनून गेल्या. ‘ आमच्यासारखे खूप लोक तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत, कारण आम्हाला त्यात रूची आहे. मी क्वचितच विश्वास ठेवेन की, मला इतके चांगले पैसे सॉफ्टवेअर लिहिण्यात मिळत होते, कारण ते काम मजेदार होते. माझे काम एका अध्यात्मिक विश्वासाने चालत असे, पण माझी कंपनी महिलांसाठी अभियानांतर्गत चालत असे. आम्हाला अपेक्षित होते की महिला पूर्णत: आपल्या आर्थिक जीवनावर नियंत्रण करू शकल्या पाहिजेत. त्यामुळे कंपनीच्या प्रारंभीचा दृष्टीकोन बदलला. मला वाटले नाही की सारे जग बदलून टाकेन. पण मी हा विचार करत असे की, महिलांसाठी काही बाबी नक्की बदलायला हव्यात.’

आपण आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, बदल भयंकर असू शकतात, पण तसे आवश्यक नाही. ज्या प्रकारचे काम आपण आणि आपल्या पिढीच्या महिलांनी केले, त्याने जरूर बदल झाला आहे. पण मला वाटते की, आम्ही एकाच चक्रात फिरतो आहोत. एकविसाव्या शतकातही तोच संघर्ष पहायला मिळतो आहे. जो महिलांना करावा लागता कामा नये. काय खरचं बदल होतो आहे? तुम्हाला याने निराशा नाही येत की ही किती संथ प्रक्रिया आहे?

होय, ही संथ आहे. पण जोवर ती संथ आहे तोवर ती टिकाऊ नाही. रात्रीतून बदल होणे अपेक्षित नाहीत. महिलांची आंदोलने शेकडो वर्षांपासून बदलाच्या प्रक्रियेत आहेत. कायदे झाल्याने समाजाला आणखी मागे जाण्यातून रोखता आले. ज्या मुद्द्यांवर मी पन्नास वर्षांपूर्वी बोलत असे त्यावर युरोपात आजही चर्चा सुरू आहे. कायदे तर बदलले आहेत पण मुद्दे नाही बदलले. समान संधी, समान वेतन भूतकाळातील हेच मुद्दे आजही नेहमीसारखेच आहेत. जेंव्हा मी व्यवसायाची सुरूवात केली होती, तेंव्हा मी तरूण आणि आदर्शवादी होते. आणि आम्ही महिलांनी स्वत:ला विषयवस्तुशिवाय व्यावसायी दाखवण्याचा संघर्ष केला होता. व्यावसायिक लोक आम्हाला खालच्या पातळीवर घेऊन जात जेंव्हा आम्ही गांभिर्याने सॉफ्टवेअरचा व्यवसाय करू पहात होतो. आता हे मुद्दे अधिक लपून आहेत आणि घातक आहेत, सांस्कृतिक मुद्दे आहेत. एखाद्या महिलेच्या अपयशासाठी लिंगभेदाला दोष देणे आता सहजसोपे झाले आहे. आम्हाला एकविसाव्या शतकाचा आनंद घेण्यासाठी योगदान देतानाच शिकावे लागेल.

आपण म्हणाला की, भारतासोबत विशेष ओढ आहे. . .

होय, माझ्या पतीचे बालपण भारतात गेले, पण तो राजेशाहीचा काळ होता. त्यामुळे आपण त्यावर बोलू इच्छित नाही. १९६०च्या काळात त्या भारतीय महिलांना वरिष्ठ सॉफ्टवेअर व्यावसायीच्या पदावर नोक-या देत होत्या. मला आजही आठवते की, श्रीमती बकाया यांना मी पहिल्या भारतीय महिलेच्या रूपात नोकरी दिली होती. त्यांच्या सुंदर साड्या आणि बिंदी पाहून मी मोहीत झाले होते. त्या खूप शिक्षित आणि सुसंस्कृत महिला होत्या. आम्ही सॉफ्टवेअर शिवाय साहित्य आणि अन्य विषयांवर चर्चा करत असू. आम्ही कधी मैत्रिणी नाही होऊ शकलो कारण मी बॉस होते. पण त्यांच्यासोबत कामाचा वेगळाच आनंद होता.

कंपनी स्थापन करताना आपले मजबूत वैचारीक उद्दीष्ट जितके आपणास उद्योगी बनवेल तितकेच कार्यकर्ताही बनवेल.

माझी संस्था पहिल्या सामाजिक व्यवसायांपैकी एक होती. आमच्याकडे त्यासाठी शब्द नव्हते. मी शोध घेतला की काय आम्हाला एखाद्या विश्वस्त संस्थेप्रमाणे काम करावे लागेल? पण त्यावेळीच मला जाणवले की, महिला म्हणून आम्हाला कुणी गांभिर्याने घेणारच नाही जोवर आम्ही गांभिर्याने नफा कमावणा-या होत नाही. प्रगती संथ होती. आम्ही पंचवीस वर्षांनी परतावा दिला. मी खूप वर्षांपर्यत वेतन घेत होते आणि पहिल्या वर्षीतर मी खर्च देखील नाही घेतला. मला खूप अभिमान आहे, खरेतर पैश्यासाठी नाही पण जी संपत्ती आम्ही बनवली, आणि जितक्या लोकांना रोजगार दिला आणि एक बदल घडवण्यात सहकार्य केले.

नाझी जर्मनीतून वाचून पलायन करणे आणि इंग्लडमध्ये एक शरणार्थी म्हणून राहणे- आपल्या भूतकाळाने आपल्या भविष्यात किती बदल केले?

माझे अवघे जीवनच माझ्या भूतकाळाने प्रेरित आहे. मला आजही असेच वाटते की, मला एकही दिवस वाया घालवता कामा नये. मला हे सिध्द करावे लागते की, मी माझा जीव त्यासाठी वाचवला कारण तो वाचवण्यास लायक होता. मी तितकीच शक्तिवान आहे जितकी ७५वर्षांपूर्वी होते. माझे आता वय झाले आहे. मी सकाळी ऊठून हाच विचार करते की, मी किती नशीबवान होते? सर्वांनीच त्यावेळी मला मदत केली, आणि आता मी आणखी लोकांना मदत करत आहे.

१९६०मध्ये ब्रिटन मध्ये स्टार्टअप करणे कसे होते?

तुम्हाला हसायला येईल कारण माझ्याकडे भांडवल नव्हते. माझ्याकडे सहा पौंड होते जे आजच्या शंभर पौंडाइतके आहेत. मी स्वत:च्या मेहनतीने भांडवल उभारले. त्यानंतर घराच्या बदल्यात कर्ज घेतले. मी व्यवसायाबाबत काहीही जाणत नव्हते. माझ्या पहिल्या उत्पादनाच्या वेळी सारे आर्थिक नियोजन चुकीचे केले होते. मी केवळ कामाच्या बदल्यात पैशांबाबत विचार केला. मी रोजगाराच्या बाजूने इतकी हरवल्यासारखी होते की , माझ्यासाठी केवळ कर्मचारी आणि उत्पादन महत्वाचे होते आणि व्यवसाय किंवा आर्थिकदृष्ट्या तो सक्षमपणाने चालवण्यावर नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष रखडले, सुरूवात फारच संथ होती. मी व्यावसायिक नव्हते पण माझ्यात ते शोधण्याचा अनुभव होता. त्यामुळे स्थानिक व्यवस्थापन केंद्राशी संपर्क केला आणि म्हटले की, ‘या आणि माझी कंपनी पहा, जी एक आधुनिक कंपनी आहे. संगणक आणि मोठ्या गोष्टी आहेत इथे. त्यावरून आपल्या लक्षात येईलच की, एक मोठी संस्था कसा कारभार करत आहे. आणि कसा संघर्ष करत आहे. आपण माझी मदत बाजार वाढवणे आणि उत्पादने विक्रीत करू शकता ’ .आजकालचे जग खूपच वेगळे आहे, आतातर नवयुवक हायटेक कंपन्या स्थापन करत आहेत आणि दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तकाळात अब्जाधिश होत आहेत. जसे फेसबुक आणि अन्य, फेसबुक मध्ये आता३५०० महिला काम करतात. पण जेंव्हा ते बाजारात आले तेंव्हा त्यांच्या संचालकात एकही महिला नव्हती. त्यामुळे गोष्टी बदलल्या आहेत पण काही तश्याच राहिल्या आहेत.

१९६०मध्ये सॉफ्टवेअर कंपन्या कश्या होत्या? कंपनीत रोजच्या मुद्द्यांना निपटण्यासाठी आपण काय करत होता?

मी जेंव्हा सुरुवात केली त्यावेळी उद्योग जगत नव्हते, मी आणि इतर काही जणांनी ते स्थापन केले. त्यावेळी हार्डवेअर सोबतच सॉफ्टवेअर मोफत दिले जात होते. माझ्या उद्योगाची जी पध्दत होती ती अश्या प्रकारची होती की बंडल करून सॉफ्टवेअर विकायचे असे. लोक म्हणाले की मी वेडी आहे हे तर मोफत आहे. त्यासाठी कुणी पैसे का द्यावे? पण मला याबाबत जाण होती हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर महत्वाचे आहे. मी अधिकांश अमेरिकी कंपन्यांकडे जात असे. कारण ते ब्रिटिश कंपन्याच्या तुलनेत नव्या विचारांना खुले होते. ब्रिटिश कंपन्या जास्त पारंपारिक नव्हत्या, मी अशा लोकांना खूप पत्र पाठवली जे संगणक कर्मचा-यांसाठी जाहिराती देत होते. मी लिहित असे की, मी नोकरीसाठी अर्ज करत नाही, पण मला माझ्या कंपनी बाबत सांगायचे आहे. त्या पत्रांना खूपच कमी प्रतिसाद होता.त्यावेळी माझ्या पतीने सुचविले की, मला स्टेफनी शर्ली नावाचा वापर करता कामा नये, आणि कुटूंबाचे आडनाव स्टिव वापरले पाहिजे. स्टिव जास्त यशस्वी नाव असल्याचे सिध्द झाले. मी व्यवस्थापकांशी चर्चा करू शकले, आणि सांगू शकले की माझी कंपनी कश्याप्रकारच्या सेवा देऊ शकते. अर्थातच त्यांना त्यावेळी याबाबत जाणवले की, मी एक महिला आहे. पण त्यांच्यात इतके सामर्थ्य नव्हते की ते मला परत जायला सांगतील. अशी ही सुरूवात झाली. ते खूपच मजेदार आहे. वास्तवात आम्हाला माहिती होते की, आम्ही काही वेगळे करत आहोत. त्यावेळी आम्हाला हे माहिती होते की, ते किती महत्वाचे आहे. आम्ही वर्षानुवर्षे अस्तित्वासाठी संघर्ष केला. जितक्या अडचणी आल्या तितक्या महत्वाकांक्षा वाढल्या. हळुहळू बाजारपेठ विस्तारली आणि आम्ही एक यशस्वी उद्योजक झालो. त्यानंतर आम्ही कुठल्याही इतर कंपनीसारखेच दिसू लागलो. पण आम्ही घरातूनच काम करत होतो. आमचे घर लहान होते आणि माझे मुलही होते. मी जेवणाच्या टेबलजवळ काम करताना पायाजवळ मूल असायचे. आणखी कुणी बैठकीच्या खोलीत काम करत असे आणि पियानोच्या चारही बाजूना कागद पडलेले असत. (माझे पती पियानो वाजवत असत.) काही शयनकक्षात काम करत असत. एका आधुनिक कंपनीसाठी ते घर आधुनिक नव्हतेच. त्यावेळी आम्ही कोळश्याचा हिटर वापरत होतो. व्यवस्थापक म्हणून मला कर्मचा-यांना मार्गदर्शन करावे लागे. त्यासोबतच मला यावरही लक्ष द्यावे लागे की, हिटर सुरू आहे की नाही आणि मग कोळसा लाकडे घेऊन घरात फिरत असे.

मनोरंजक वाटते आहे. . .

ते फारच आनंददायक होते. कंपनी आणि नव्या परिवारासोबतचे माझे ते आनंदाचे दिवस होते. आजचे जग किती बदलते आहे? आज ज्यांना कार्पोरेट व्यवस्थापनाच्या आणि करदेयकांबाबत काम करावे लागते ते आमच्या संघर्षांच्या तुलनेत काहीच नाही.

सुरुवातीला कोणते प्रकल्प होते ज्यावर आपल्या कंपनीने काम केले होते?

पहिला प्रकल्पच आश्चर्य वाटावे असा होता- तो माझ्या माजी कर्मचा-याकडून मिळाला होता. तो संगणक निर्माता होता, ज्याच्यासोबत मी त्याआधी काम केले होते. मला वाटते की, ते थोडे स्वार्थी होते, कारण मला किमतींबाबत काहीच माहिती नसायची, आणि त्यांनी मला प्रस्ताव दिला, साधारणत: मला जे त्यांच्याकडे वेतन मिळत असे तितकेच, दुसरा प्रकल्प माजी सहका-याने दिला. तो अमेरिकी कंपनीसोबत काम करत होता. ती कंपनी युरोपात आपली सहकारी कंपनी सुरू करत होती. त्यांनी मला व्यवस्थापकीय आराखडा करण्यास सांगितले, त्यावेळी प्रथम काही प्रकल्प मित्र किंवा त्यांच्या मित्रांचे आले. एक महत्वाचे काम ब्रिटिश रेल्वेचे मिळाले. मी नशीबवान होते, की मला ते काम मिळाले. त्याकामामुळे मला खूप फिरता आले आणि माझ्या जीवनात पहिल्यांदाच मी युरोपभर पहिल्यावर्गाने प्रवास केला.

एक शब्द जो मनात येतो तो निडर. आपण एकाचवेळी अनेक आव्हाने स्वीकारली. आपण केवळ महिलांच्या कंपन्याना कामे दिली. त्यावेळी जेंव्हा लोकांना मुक्त काम करणा-यांबाबत(फ्रिलांन्स) माहिती नव्हती, त्यावेळी आपण त्यांना सक्षम केले. ज्यावेळी सॉफ्टवेअर मोफत दिले जात होते त्यावेळी आपण ते विकण्यास सुरुवात केली. साधारणपणे एकामागोमाग यश मिळवणे अधिक व्यावसायिक मानले जाते पण आपणतर झोकून दिले होते.

मला वाटते की, एकेकाळी एखाद्या कामाचा पाठलाग करणे उद्योजकांचे वैशिष्ट्य होते. आपण ज्यांच्याबद्दल सांगितले त्यातील कुणीही मला व्यस्त ठेवण्यास पुरेसे होते. पण माझ्यासाठी कधीच एक आव्हान पुरेसे नव्हते.

होतकरू उद्योजकांना तुम्ही काय सांगाल?

नव्याने केलेले काम त्याग करण्यासारखे आहे. मला असे वाटते की तुम्हाला वापरकर्ते बनून पहावे लागते की वापरकर्ते काय मागतात? खरेतर प्रोफेसर नाहीत उद्योजकच नव्या गोष्टी बनवण्यात जबाबदार असतात. महिला उद्यमींना मी सांगेन की, पारंपारिक पुरुषांच्यासारखे काम न करता तुमच्यातील नैसर्गिक गुणांचा विकास करत काम केले पाहिजे. एखादी अशी गोष्ट शोधा ज्याची तु्म्हाला चिंता वाटते, प्रशिक्षण घ्या, आणि स्वत:ला उच्चश्रेणीच्या लोकांत पहा आणि त्यानंतर स्वत:चा आनंद घ्या.

लेखिका: राखी चक्रवर्ती

अनुवाद : किशोर आपटे.