प्राचीन पारंपारिक ज्ञानापासून अत्याधुनिक वैज्ञानिकतेपर्यंत सर्वव्यापी श्री गणेश!

0

वेद आणि उपनिषदांच्या माध्यमातून भारतीय वैदीक सनातन धर्माच्या संस्कृतीने जगाला हजारो वर्षांपासून अनेक ज्ञान विज्ञानाच्या देणग्या खुल्या केल्या आहेत. गणपती ही तर साक्षात ज्ञान आणि विद्या, बुध्दी आणि कलांची देवता. गणांचा नायक म्हणजे सर्वसामान्यांचा देव ज्याला उपनिषदांच्या माध्यमातून प्राचीन ऋषी मुनींनी देखील वर्णिले आहे. हा गणनायक नेमका कसा आहे. तो ॐकार स्वरुप आहे. म्हणजे तो आदी आणि अंती देखील भरून राहिला आहे. भारतीयांच्या परंपरेत गणेश स्तवन पुजन नेहमी कुठल्याही कार्यात आधी केले जाते .हा गणेश म्हणजेच बुध्दीचा कारक देव आहे. आजच्या युगात संगणकाच्या माध्यमातूनही साक्षात हा गणेशअवतार जन्मला आहे कारण संगणक जसा लाखो प्रकारची माहिती (डाटा)साठवून ठेवतो तसा लंबोदर असलेल्या गणेशाच्या मोठ्या मस्तकात आणि पोटात हजारो प्रकारच्या माहितीचा संचय आहे. संगणकाला जसा माऊस हा भाग त्याच्या कार्यान्वयनात महत्वाचा आहे तसा वाहक म्हणून उंदीर गणेशाच्या बाजुला सदैव असतो. आजच्या विज्ञान युगातही हा बिध्दीचा कारक गणेश आपल्या दैनंदिन गोष्टीत वास करतो. हेच उपनिषदांचा एक भाग असलेल्या अथर्वशिर्षात सांगितले आहे. कसे ते जाणून घेऊया.

ॐ नमस्तेगणपतये ॥ त्वमेवप्रत्यक्षंतत्त्वमसि ॥ त्वमेव केवलंकर्तासि ॥ त्वमेवकेवलंधर्तासि ॥ त्वमेवकेवलंहर्तासि ॥ त्वमेवसर्व खल्बिदंब्रह्मासि ॥ त्वंसाक्षादात्मासिनित्यम् ॥१॥

अथर्वशिर्षाच्या केवळ दहा श्र्लोकातून गणेशाच्या सर्व व्यापी रुपाचे वर्णन केले आहे. त्यात म्हटले आहे की, हे गणेशा तू मूळ तत्वरुप आहेस, तूच कर्ता आणि धर्ता आहेस, तू हर्ता देखील आहेस. सा-या जगात भरून राहिलेले ब्रम्हरूप तूच आहेस. तू नित्य आणि साक्षात आहेस.

ऋतंवच्मि ॥ सत्यंवच्मि ॥२॥

मी सत्य तेच सांगतो आहे, जे वास्तव आहे तेच निवेदन करतो आहे.

अवत्वंम् ॥ अववक्तारम् ॥ अवश्रोतारम् ॥ अवदातारम् ॥ अवधातारम् ॥ अवानूचानमवशिष्यम् ॥ अवपश्चात्तात् ॥ अवपुरस्तात् ॥ अवोत्तरात्तात् ॥ अवदक्षिणात्तात् ॥ अवचोर्ध्वात्तात् ॥ अवाधरातात् ॥ सर्वतोमांपाहिपाहिसमंतात् ॥३॥

तू सर्वाठायी आहेस, वक्ता, दाता, धाता, गरु आणि शिष्यदेखील तूच आहेस, तू मागे आहेस, पुढे आहेस, उत्तर, दक्षिण, उर्ध्व, अध, सर्व दिशांमध्ये आहेस, जेथे जेथे पाहतो तेथे तूच भरून राहिला आहेस.

त्वंचाङमयस्त्वंचिन्मयः ॥ त्वमानंदमयस्त्वंब्रह्मासि ॥ त्वसच्चिदानंदाद्वितीयोसि ॥ त्वंप्रत्यक्षंब्र्ह्मासि ॥ त्वंज्ञानमयोविज्ञनमयोसि ॥४॥

तूच वाड़मय, आणि चिन्मय आहेस, ब्रम्हांडातीक सारा आनंद तूच आहेस, तू सत चित्त आनंद असा दुस-या रुपातही आहेस, तू प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस, ज्ञान आणि विज्ञान देखील तूच आहेस.

सर्वजगदिदंत्वत्तोजायते ॥ सर्वजगदिदंत्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वजगदिदंत्वयिलयमेष्यति ॥ सर्वजगदिदंत्वयि प्रत्येति ॥ त्वंभूमिरापोनलीनिलोनभः ॥ त्वंचत्वारिवाक्पदानि ॥५॥

हे सारे जग तुझ्यातून उत्पन्न होते, तुझ्याच योगान स्थिर राहते, आणि शेवटी तुझ्यातच विलय पावते. पुन्हा हे जग तुझ्यातच प्रत्ययास येते.

त्वंगुणत्रयातीतः ॥ त्वंगुणत्रयातीतः ॥ त्वंदेहत्रयातीतः ॥ त्वंकालत्रयातीतः ॥ त्वंमूलाधारस्थितोऽसिनित्यम ॥ त्वशक्तित्रयात्मकः ॥ त्वांयोगिनोध्यायंति नित्यम् ॥ त्वंब्रह्मात्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वंवायुस्त्वंसूर्यस्त्वंचंद्रमास्त्वं ब्रहम्भूर्भुवःस्वरोम् ॥६॥

सत्व, रज तम, या त्रिगुणांच्याही पलिकडे तूच आहेस, स्थूल देह लिंग देह आणि कारण देह या अवस्थांच्या पलिकडेही तूच आहेस. तू तीनही काळांच्या पलिकडे आहेस, योगीजन सतत तुझेच ध्यान करतात. सा-या जगातील सा-या देवता तूच आहेस ब्रम्ह लोकापासून भुलोकापर्यंतच्या सप्तलोकात तुझा वास आहे.

गणादिंपूर्वमुच्चार्यवर्णादिंतदनंतरम् ॥ अनुस्वारःपरतरः ॥ अर्धेदुलसितम् ॥ तारेण रुद्धम् ॥ एतत्तवमनुस्वरूपम् ॥ गकारःपूर्वरूपम् ॥ अकारोमध्यमरूपम् ॥ अनुस्वारश्चान्त्यरूपम् ॥ बिन्दुरुत्तररूपम् ॥ नादःसंधानम् ॥ संहितासंधिः ॥ सेषागणेशविद्या गणकऋषिः ॥ निचृद्गायत्रोछन्दः ॥ गणपतिर्देवता ॥ ॐ गंगणपतये नमः ॥७॥

ॐकार हा बीज मंत्र म्हणजे तुझे स्वरुप मन न करण्याचा विधी आहे. त्याचा उच्चार म्हणजेच नादमयी अनुसंधान आहे, हीच गणेश विद्या होय. गणक नावाचा ऋषी, देवी गायत्री आणि देवता गणपती आहेत. अशा बीजरुपी गणेशाला मी वंदन करतो.

एकदंतायविद्महेवक्रंतुडाय धीमहि ॥ तन्नोदंती प्रमोदयात् ॥८॥

एअक्दंतंचतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ॥ रदंचवरदंहस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ॥ रक्तंलंबोदरंशूर्पकर्णकंरक्तवाससम् ॥ रक्तगंधानुलिप्तांगंरक्तपुष्पैःसुपूजितम् ॥ भक्तानुकंपिनंदेवंजगत्कारणमच्युतम । आविर्भूतंचसृष्ट्यादौप्रकृतेःपुरुषात्परम् ॥ एवंध्यायतियोनित्यं सयोगीयोगिनांवरः ॥९॥

जे वक्रगतीने म्हणजेच दुष्ट बुध्दीने वागतात त्यांना शासन करणा-या या वक्रतुंडाला माझा नमस्कार असो. त्याचे ध्यान केल्याने आम्हाला चांगली सद प्रेरणा मिळो. रक्तवर्णाचा, लाल फुलानी सजलेल्या रक्तचंदनाची ऊटी लावलेल्या या देवाला माझा नमस्कार असो. विलक्षण अश्या शक्तीच्या या मनुष्यरुपातील देवाचे मी ध्यान करतो.

नमोव्रातपतये नमोगणपतये नमः प्रमथपतयेनमस्तेअस्तुलंबोदरायैकदंतायविघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तयेनमः ॥१०॥

लोकसमुदायाचा अधिपती असलेल्या व्रातपती असलेल्या गणेशाचे मी ध्यान करतो. विघ्नांचा नाश करणा-या शिवसूत अश्या वरदमुर्तीला माझा नमस्कार असो.

अथर्वशिर्षाच्या या दहा श्लोकात सा-या विश्वातील शक्तीचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्राचीन काळातील या श्लोकामधून या भारतीयांच्या अद्भूत एलिफंट गॉडची शक्ती वर्णली आहे. आजच्या विज्ञान युगातही या देवाच्या वर्णनातून त्याच्या गुढ गंभीरतेचे दर्शन होतेच पण त्याशिवाय आमच्या हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरेतील पूर्वजांच्या दिव्य वैज्ञानिक ज्ञानाचा आवाका पाहून मती गुंग होते. म्हणूनच या शांती मंत्राच्या उच्चारणातून सा-या जगाच्या शांतीचा उदगाता श्रीगणेशाला वंदन करुया.

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयम देवा भद्रंपश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्त्ननूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥१॥

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बहस्पतिर्दधाउ ॥२॥

ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ।