डायलिसिसचे देवदूत

डायलिसिससारखे महागडे उपचार सामान्यांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी झटणा-या मंडळींची कथा

डायलिसिसचे देवदूत

Monday October 05, 2015,

5 min Read

सरकारी अनुदान किंवा विम्याचं कवच नसेल तर डायलिसिसवरचे उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. मुंबई किडनी फाऊन्डेशनने या विषयावर सहा वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यानुसार देशात 950 मुत्रपिंड तज्ज्ञ, सात हजार डायलिसिस केंद्र आणि चार हजार डायलिसिस मशीन्स आहेत. हे संशोधन सहा वर्षांपूर्वीचे असले तरी सध्याही परिस्थिती बहुतांशी तशीच आहे. ऑल इंडिया मेडिकल सायन्स आणि आरोग्य मंत्रालयाने 2009 मध्ये या विषयांवर सर्वेक्षण केले होते. यामध्ये 2 लाख 30 हजार नागरिंकापैकी 90 टक्के नागरिकांना महिनाभरात तीव्र मुत्रपिंडाचा रोग झाल्याचे आढळले.

ही आकडेवारी भारतीयांसाठी चिंताजनक आहे. 1990 पासून देशात मधुमेहाचे ( विशेषत: प्रकार 2) चे प्रमाण 123 टक्यांनी वाढले आहे. भारत हा हृदय आणि किडनी खराब होणा-यांचा देश बनलाय. बदलती जीवनशैली हेच याचे मुख्य कारण आहे.

कमाल शाह, संदीप गुडीबंदा आणि विक्रम वूप्पाला यांनी एकत्र येऊन 2009 साली हैदराबादमध्ये नेफ्रोपल्स या उच्च दर्जाच्या डायलिसिस सेंटरची स्थापना केली. वूप्पाला सांगतात, “ आयआयटी खरगपूरमधून 1999 साली पदवीधर झाल्यानंतर मी दहा वर्ष अमेरिकेत घालवली. यापैकी शेवटची काही वर्ष मी न्यू जर्सीमधील एमसीकिन्से आणि कंपनीमध्ये होतो. हे काम करत असतानाच मी भारतामध्ये परत येईन आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीत काम सुरु करेल हे निश्चित केले. भारतामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार साथीच्या रोगाप्रमाणे वाढत आहेत.” त्यामुळे या आजारांशी संबंधीत काम करण्याची खूणगाठ वूप्पाला यांनी बांधली. “ भारतामध्ये साडेसहा कोटी मधुमेहाचे तर 14 कोटी उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत ”, असे वूप्पाला यांनी सांगितले. याबाबतचे संशोधन करत असताना वूप्पालांची भेट कमाल शाह यांच्याशी झाली. अॅपल सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेले कमाल 12 वर्षांपासून डायलिसिसचे उपचार घेत होते. अमेरिकेत डायलिसिसचे उपचार घेत असतानाचे अनुभव वूप्पाला यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहेत. “ शहा 18 वर्ष डायलिसिसचे उपचार घेतात. पण ते रोज सकाळी पोहतात. दर महिन्याला प्रवास करतात आणि अगदी पूर्णवेळ काम करतात. त्यांचे हे वेळापत्रक नक्कीच प्रेरणादायी आहे. डायलिसिसचे महागडे उपचार घेणे ज्यांना शक्य नाही अशा रुग्णांना या सोयी उपलब्ध करणे हे माझे ध्येय होते.” अशी आठवण वूप्पाला यांनी सांगितली. त्यामुळे शहा आणि संदीप गुडीबंदा ( बंगळूरुमध्ये अभियंता म्हणून काम करणारे गुडीबंदा त्यावेळी कॅन्सरग्रस्तांच्या संस्थेत काम करत होते ) यांनी एकत्र येऊन नेफ्रो प्लसची स्थापना केली.

नेफ्रोपल्सचे संस्थापक  ( डावीकडून-उजवीकडे) विक्रम वूप्पाला, संदीप गुडीबंदा आणि कमाल शाह

नेफ्रोपल्सचे संस्थापक ( डावीकडून-उजवीकडे) विक्रम वूप्पाला, संदीप गुडीबंदा आणि कमाल शाह


“ आम्ही हैदराबादमध्ये सुरुवात केली. कारण आम्हाला कामाची स्वरुप घरगुती ठेवायचे होते. त्यानंतर एकापेक्षा जास्त केंद्र कशी चालतात याचा अनुभव घेण्यासाठी हैदराबाद शहरामध्येच दुसरे सेंटर सुरु केले. घर सोडून अन्य ठिकाणी दूरच्या भागात सेंटर कसे चालवावे याचे प्रशिक्षण त्या केंद्रामध्ये मिळाले. कामाची यादी करणे, त्याचे नियमन करणे आणि कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन करणे यासारख्या किचकट विषयांचा या काळात अनुभव आला. रुग्णालयाशी व्यवहार तसेच मुत्रपिंडतज्ज्ञांसोबत भागिदारी करतानाही अनेक जटील समस्यांचा सामना करावा लागला. पण हे सर्व नव्या कार्याची सुरुवात होती. त्यानंतर बंगळूरु, चेन्नई, नोईडा, रोहतक, पुणे, बोकारो, नालगोडा, आणि कानपूर या शहरांसह 14 राज्यातल्या 34 शहरांमध्ये आम्ही सेंटर उघडली.

सांस्कृतीक अडचणींचा सामना करत असतानाच रुग्णांना उच्च दर्जाची सेवा पुरविणे हे आमचे मुख्य ध्येय होते. हे ध्येय गाठण्याच्या निश्चयाने आम्ही सारे भारवलेले होतो. आमचा निर्धार पक्का असल्यानं या सा-या अडथळ्यांवर आम्ही मात करु शकलो. पण एखाद्या हैदराबादच्या संस्थेला उत्तर प्रदेशात यशस्वी होणं सोपे नव्हते. एखाद्या देशासारखाच उत्तर प्रदेशाचा विस्तार आहे. आज उत्तर प्रदेशात आमची पाच केंद्र आहेत.” असे वूप्पाला यांनी स्पष्ट केले.

“ छोट्या शहरांपेक्षा महानगरांमध्ये काम करणे सोपे असते ”, असे वूप्पाला सांगतात. “ जेंव्हा तुम्ही उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात काम सुरु करता त्यावेळी कोणताही माल खरेदी करत असताना अत्यंत गुंतागुतीच्या करांचा तुम्हाला सामना करावा लागतो. त्याहीपेक्षा क्लिनिक आणि प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असलेले कर्मचारी मिळणं ही छोट्या शहरांमधली मुख्य समस्या असते. ज्या शहरांमध्ये आम्हाला सेंटर सुरु करायचे आहे तेथील स्थानिकांचा शोध घेण्यासाठी आम्ही मोठे परिश्रम घेतले. त्याच उद्देशानं मी अमेरिकेतून हैदराबादमध्ये परत येऊन आमचा उद्योग सुरु केला.” असे वूप्पाला यांनी सांगितले. “ स्थानिकांना तुम्हाला जास्त वेतन द्यावेच लागते. त्यामुळेच छोट्या शहरांमध्ये मनुष्यबळाचे व्यवस्थापन ही मोठी समस्या असते “, असे वूप्पाला यांनी मान्य केले.

डायलिसिस सेंटरचे प्रतिकात्मक छायाचित्र

डायलिसिस सेंटरचे प्रतिकात्मक छायाचित्र


वैद्यकीय क्षेत्रासाठी डायलिसिस सरळ आहे. जपान किंवा जर्मनीमधून त्यासाठी मशीन आयात करावी लागते. पण याचे वितरक भारतामध्येही आहेत. परवानाच्या विषयाची काळजी उत्पादकाकडून घेतली जाते. या मशिनला रेडिएशनचाही धोका नाही. त्यामुळे याबाबतचे नियमही फारसे कडक नाहीत. फक्त या मशिन्स महाग आहेत. प्रत्येक मशिनची किंमत साधारण सात लाख इतकी आहे.

“ स्वस्त दरात आरोग्यसेवा पुरविणे हाच नेफ्रोप्लसचा मुख्य उद्देश आहे ” असे वूप्पाला सांगतात. “ या मशिन्स महागड्या असल्या तरी याची किंमत कमी व्हावी यासाठी नेफ्रोप्लस पूर्ण प्रयत्न करते. नेफ्रो प्लस ही देशातली सर्वात मोठी डायलिसिसची मशीन पुरवणारी संस्था आहे. त्यामुळे ही किंमत रुग्णांसाठी कमी करणे शक्य होते. त्यामुळे आम्हांला मशिन्स योग्य ठिकाणी पोहचणे, त्याची योग्य व्यवस्था करणे आणि त्यामध्ये योग्य गुंतवणूक करणे शक्य होते. छोट्या केंद्रांना हा फायदा मिळत नाही ‘’ , असे वूप्पाला यांनी सांगितले.

“ या कारणांमुळे नेफ्रोप्लस ही सार्वजनीक-खासगी क्षेत्रामधील रुग्णांना दर्जेदार डायलिसिसची यंत्रणा पुरविणारी संस्था बनली आहे. आम्ही सरकारसोबत काम करु शकतो, पण सरकारी पातळीवर मिळणारा प्रतिसाद अतिशय संथ आहे. त्यामुळे आम्ही खासगी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केलंय. डायलिसिस हा महागडा उपचार आहे. एखाद्याला यावर आपल्या खिशातून खर्च करणे अशक्य आहे. यामधून मिळणा-या वैद्यकीय सेवा या दर्जेदार असतीलच असेही नाही. त्यामुळे सरकारने याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. पण सरकारी पातळीवर तसे होत नाही,” असे वूप्पाला यांनी स्पष्ट केले.

डायलिसिस सेंटरचे प्रतिकात्मक छायाचित्र

डायलिसिस सेंटरचे प्रतिकात्मक छायाचित्र


अन्य आशियाई देशांमध्ये विस्तार करणे हे नेफ्रोप्लसचे पुढील उद्दीष्ट आहे. या विभागातले सर्वात मोठे डायलिसिस केंद्र होण्याची कंपनीची इच्छा आहे. त्यामुळे किडनीबाबतच्या आजाराचे गांभीर्य सरकारला पटवून देणे शक्य होईल. मागच्या काही वर्षांमध्ये मेडिकल सायन्सच्या क्षेत्रात प्रगती झालीय. पण त्याचवेळी आरोग्य निर्देशांकात घट झालीय. गंभीर आजारांवर उपचार करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला उच्च दर्जाची आरोग्य सेवा देणे हाच नेफ्रो प्लस या संस्थेचा उद्देश आहे.