ठाण्यात 'स्टार्टअप इंडिया, स्टॅण्डअप इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात

0

सीएफओ आशिया पुरस्काराचे २००१ सालचे विजेते आणि या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय दिपक घैसास यांनी ठाणे येथे 'स्टार्टअप इंडिया, स्टॅण्डअप इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात केली. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्या प्रसारक मंडळाच्या परिसरात या कार्यक्रमाची घोषणा केली होती. या प्रसंगी जेनकोवल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेसचे अध्यक्ष असलेल्या घैसास यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, उद्योजकांनी स्वतःला काही प्रश्न हे निश्चितच विचारायला हवे. ते म्हणजे उद्योगाची कल्पना योग्य आहे का?, इतरांपेक्षा ती अभिनव आणि चांगली आहे का?, या उद्योगाचा समाजाला काही फायदा होणार आहे का? तसेच त्यांचे प्रयत्न योग्य आहेत का? याशिवाय त्यांनी विघटनकारी संशोधनाबद्दलदेखील आपले मत नोंदवले. जागतिकीकरणाच्या दिशेने प्रवास करण्याच्या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. तसेच आत्मपरिक्षणाची गरज या विषयाला अधोरेखित करताना ते म्हणतात की, आत्मपरिक्षण हे लादलेल्या दर्जाचे नसावे. विद्यार्थी प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय बेडेकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

बाजारपेठेतील मूल्यांची योग्य आखणी करण्यासाठी आणि विविधांगी विचार करण्यासाठी स्टार्टअप्सची गरज असल्याच्या विषयावर त्यांनी जोर दिला. भारतात सद्यस्थितीतील औद्योगिकीकरण आणि आर्थिक परिस्थिती यांबद्दल त्यांनी आपले मत नोंदवले. या दोन गोष्टींमुळे उद्योजकांना गतिशील आणि व्यावहारीक दृष्टीकोन ठेवता येतो.

स्त्रोत - पीटीआय

अनुवाद – रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi