‘आजीच्या गोष्टी’ ची परंपरा जतन करण्यासाठी राजस्थानने सुरू केले आजींचे सक्षमीकरण

‘आजीच्या गोष्टी’ ची परंपरा जतन करण्यासाठी राजस्थानने सुरू केले आजींचे सक्षमीकरण

Monday May 29, 2017,

2 min Read

माझी आई आणि तिच्या वयाच्या अनेक जणांना पुढच्या पिढीच्या भवितव्याची चिंता आहे, गोष्टी सांगण्याच्या समृध्द पंरपरेला मुकत चालल्या बद्दल, जेथे आजी-आजोबा (बहुतांश आजीच) लहानग्यांना गोष्टी सांगत असतात.

कुणीतरी वाद घालेल की आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात, ब-याचश्या गोष्टी कलौघात नष्ट झाल्या आहेत. पण वास्तव हेच आहे की त्यामुळे त्यातील आपुलकी हरवली आहे, हे नाकारता येणार नाही. हेच लक्षात घेवून राजस्थानच्या शिक्षण विभागाने आदेश काढला आहे की,त्यांनी सप्ताहातून एक दिवस आजीबाईना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गोष्टी सांगण्यासाठी नियुक्त करावे.

माध्यमिक शिक्षणाचे उपसंचालक अरूण कुमार शर्मा म्हणाले की, “ या मागे संकल्पना आहे की समाजाचा सहभाग वाढविणे, घरातील ज्येष्ठांच्या ज्ञानाचा फायदा नव्या पिढीच्या मुलांना देणे, आणि त्यांच्या सक्रिय सहभागातून आपल्या कौटूंबिक मुल्यांचे जतन करणे, संवर्धन करणे आणि हे करताना मानवी शहाणपणाच्या परंपरेला मुलांपर्यंत प्रवाहित करणे.”


image


आजीबाई ज्यांना मुलांमध्ये जावून गोष्टी सांगायच्या आहेत त्यांनी शाळेत प्रत्येक शनिवारी यावे. जर त्या उपलब्ध नसतील तर ज्येष्ठ शिक्षकांनी हे काम करावे असे अभिप्रेत आहे. सुरूवातीला योजना अशी होती की शिक्षकांनीच गोष्टी सांगाव्यात. पण या प्रकारातुन आजीबाईना ज्यांना त्यांच्या म्हातारवयात दुर्लक्षीत पणाची भावना होते त्यांना आनंदी वाटेल की माझे कुणी ऐकते आहे. या कामाबद्दल त्यांना काही मानधनही देण्यात येत आहे.

जरी हे प्रायोगिक तत्वावर असले तरी, शाळांना कोणत्या गोष्टी सांगाव्या याची दक्षता घ्यावी लागणार आहे. याची खातरजमा केली जावी की त्यातून भेदाभेद पसरणार नाही.

शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते चरणजीत धिल्लन म्हणाले की, “ सध्याच्या काळात अशा उपक्रमांची गरज आहे, ज्यावेळी तंत्रज्ञानामुळे माणसाला घेरले आहे. मुलांच्या मनात ममता आणि नैतिक मुल्यांची निर्मिती होणे गरजेचे आहे, त्यामध्ये वयोवृध्द पालकांची भूमिका महत्वाची आहे. हा सर्वात सोपा प्रकार आहे ज्यातून स्पर्श, शिकवण आणि पोहोच या माध्यमातून मुलांना त्यांच्या भावनिक विकासाला बळ देता येईल. मात्र विभागाने ही दक्षता घ्यायची आहे की ज्या गोष्टी निवडल्या जातील त्यात धार्मिक भेद किंवा राजकीय हेतू नसावेत.”