लैंगिक अत्याचाराने पीडित एक स्त्री बदलत आहे समाजातील रूढीवादी विचार

लैंगिक अत्याचाराने पीडित एक स्त्री बदलत

आहे समाजातील रूढीवादी विचार

Thursday April 14, 2016,

4 min Read

मातृत्व हे स्त्रीला दैवाने दिलेली नैसर्गिक देणगी आहे. अशा या जननीची अनेक रूपे आहेत जसे आई, बहिण, पत्नी, मुलगी. पण आजही अनेक ठिकाणी या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला अनेक बंधनांमध्ये जखडून ठेवले आहे. तिला बुरख्यात ठेवणे, शिक्षण तसेच स्वातंत्र्याने फिरण्याची बंदी करणे अशा अनेक प्रकारे ‘ती’ ला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात पसरलेल्या अशाच कुप्रथेविरुद्ध लढा देत आहेत उत्तर प्रदेशच्या मुज्जफ्फरनगर मध्ये राहणाऱ्या रेहाना अदीब. त्या महिलांना शोषण मुक्ती, न्याय व सन्मान देण्याचे काम करीत आहेत.

image


रेहाना या बालवयातच आपल्या जवळच्यांकडूनच लैंगिक शोषणाला बळी पडल्या. त्या सांगतात की, ‘जेव्हा मी १७-१८ वर्षाची होते तेव्हाच मला लक्षात आले की माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे. मी ऐकले होते की ज्यांच्याबरोबर चुकीचे झाले आहे त्यांना कुणीही साथ देत नाही. त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे? कुठे जायचे? हे माहित नव्हते. ’तेव्हा त्या ‘दिशा’ नामक एका संस्थेशी जोडल्या गेल्या व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातल्या ‘धरणे’ आंदोलनात हिरहिरीने भाग घेऊ लागल्या.

image


रेहाना सांगतात की, ‘मी लहानपणापासून बघितले की मुलींना यात्रेत घेऊन जायचे नाही, रस्त्याने मान खाली घालून चालले पाहिजे, डोके झाकले पाहिजे यासगळ्या गोष्टींमुळे मन क्षुब्ध होत असे, की ही सारी बंधने मुलींनाच का? मुलांना का कुणी काही सांगत नाही.’

रेहाना सांगतात की, मनुष्य नेहमीच समाजातील घडत आलेल्या चुकीच्या प्रथांना आळा घालण्याचा व त्याला सुधारण्याचा विचार करत असतो, याच विचारांनी त्यांनी सन १९८९ मध्ये आपली संस्था ‘अस्तित्व’ ची स्थापना केली. मुज्जफ्फरनगर व सहारनपुरमधील त्यांच्या या संस्थेत १८-२० कार्यकर्त्या कार्यरत असून सुमारे सहा हजार स्त्रिया या संघटनेशी जोडलेल्या आहेत.

image


रेहाना यांची संस्था गांव व शहरांमधील मुलींसाठी व स्त्रियांसाठी हक्काची लढाई लढत आहे. सुरवातीला त्यांनी स्त्रियांच्या छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले. लोकांना समजावले की मुलींना पण मुलांप्रमाणे संधी द्या त्यांना पण पुढे जाण्याचा हक्क आहे. हळूहळू त्या बलात्कार, हुंडा व स्त्रियांच्या इतर मुद्द्यांबद्दल आवाज उठवू लागल्या. रेहाना आपल्या संस्थेअंतर्गत अश्या मुलींना शिक्षणाची संधी पुन्हा देतात ज्यांचे शिक्षण काही कारणाने अर्धवट राहिले आहे. बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध आवाज उठवून जनजागृती करून मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करतात. यासाठी त्या अनेक शाळांशी जोडल्या गेलेल्या आहेत.

image


रेहाना सांगतात की, “आमचा समाज कोणतेही लिंगभेद करत नाही परंतु आमची लढाई पुरुषांशी नाही तर अशा 'सिस्टिम'शी आहे जे स्त्री पुरुषांमध्ये दरी निर्माण करतात. तर समाजातील काही लोक स्वतःला धर्माचे ठेकेदार समजून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात?”

रेहाना मानतात की, आमची सगळ्यात मोठी लढाई ही मुलींच्या लैंगिक शोषनाविरुद्ध आहे. त्या सांगतात की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या विरोधात लढत राहील, कारण यामुळे मुली इतक्या कुंठीत होतात की त्यांचे घराबाहेर पडणे कठीण होते. संप्रदायपद्धतीतील संवेदनशील असलेले मुज्जफ्फरनगर व सहारनपुरमध्ये रेहानाने 'परदा' प्रथेच्या विरोधात एकसारख्या उठवत होत्या. त्यांचे असे मानने आहे की, बुरख्याआड स्त्रियांची उर्जा व गतिशीलता कमी होते. प्रत्येक स्त्रीने आपल्या संस्कृतीचा व सभ्यतेचा सन्मान मनापासून केला पाहिजे. जर मनातच सन्मान नाही तर आड-पडद्यात रहाण्याचा अर्थ तो काय?. रेहाना आज ज्या क्षेत्रात समाज प्रबोधनाचे काम करतात ते एक असे क्षेत्र आहे जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने त्याला मनापासून पाठींबा देतात. जेथे धर्माच्या नावाखाली दंगली होतात तेथे त्या लोकांना समजावतात की मनुष्य धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे, ज्या दिवशी या समाजातील माणुसकी संपेल त्या दिवशी जगच संपुष्टात येईल.

image


आपल्या आव्हानांबद्दल त्या सांगतात की, सिस्टीमला सुधारण्याच्या माझ्या मागणीमुळे मला खाप व काठ पंचायतींकडून धमक्या मिळतात, तसेच अनेक शाळेतील शिक्षकांकडून विरोध पत्करावा लागतो. म्हणून मला आपल्या कामाची जागा सारखी बदलावी लागते. त्या सांगतात की जन्म हिंदू कुटुंबातील नसल्यामुळे मला ते आपले मानत नाहीत व मुसलमान सांगतात की, तुम्ही परदा करत नाही, तुम्हाला भेटायला पोलीस, पत्रकार व दुसरे पुरुष येतात त्यामुळे जर तुम्ही स्वतः सुधारु शकल्या नाही तर दुसऱ्या स्त्रियांना काय सुधाराल. तरीही त्यांना वाटते की,’’आम्ही भारतीय मुसलमान स्त्रिया आहोत व आम्हाला भारतीय संविधानप्रमाणेच आपले अधिकार मिळाले पाहिजेत व धर्माच्या ठेकेदारां कडून बनवलेल्या कायद्यांचे बंधन नकोत.”    

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

धर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ

समाजाच्या कटू वाक्यांनी बदलले आयुष्य, आज दोनशे मुलांसाठी ‘आई’ आहेत सविता... 

वयाच्या १० व्या वर्षी लग्न, २० व्या वर्षी ४ मुलं, ३० व्या वर्षी एका संस्थेची स्थापना...... आता २ लाख स्त्रियांचा विश्वास ‘फूलबासन’

लेखिका : गीता बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close