रक्त, लाळ आणि डीएनए जतन करण्याच्या क्षेत्रात व्यवसायाची संधी निर्माण करणारी ‘ओपनस्पेसीमेन’

0

‘बायो-बँक्स’चे (जैव बँक) ग्लोबल मार्केट २०१८ पर्यंत २१६ मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. टाईम मॅगझिनने जगाला बदलणा-या १० संकल्पनांच्या यादीत बायो-बँकिंगची( जैव बँक) देखील गणना केली आहे. क्लिनिकल रिसर्चच्या दृष्टीने या बाजाराची उपलब्धता खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते. परंतु आज हे मार्केट मानक (स्टँडर्ड) आणि गुणवत्तापूर्ण (क्वालिटी) ‘बॉयोस्पेसीमेन’( जैव नमुने) च्या कमतरतेशी झगडते आहे.

उच्च गुणवत्तापूर्ण आणि एक आदर्श अशा (स्टँडर्ड) ‘बॉयोस्पेसीमेन’ ( जैव नमुने) च्या संशोधनाला मोठी मागणी आहे. परंतु याची उपलब्धता अतिशय मर्यादित आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन श्रीकांत अडिगा यांनी २०१२ मध्ये ‘ओपनस्पेसिमेन’ला ( OpenSpecimen) लाँच केले. ‘ओपनस्पेसिमेन’ म्हणजे उच्च गुणवत्तायुक्त मानवी ‘बॉयोस्पेसीमेन’ सारख्या रक्त, लाळ, प्लाझ्मा, डीएनए आणि आरएनए पर्यंत पोहोचवणारे ओपन-सोर्स बॉयो-बँकिंगचे एक माहितीयुक्त व्यासपीठ आहे.

श्रीकांत अडिगा
श्रीकांत अडिगा

उच्च गुणवत्ता डेटा नसलेला ‘बॉयोस्पेसिमेन’ काही एक कामाचा नसतो. या मोफत आणि ओपन-सोर्स ‘बॉयो-बँक’ मॅनेजमेंट डेटाबेसच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्य़ांबाबत बोलायचे झाल्यास हे एखाद्या विशिष्ट आजारपणाच्या किंवा मग अभ्यासाच्या गरजेनुसार स्टँडर्ड डेटाचे कलेक्शन आणि प्रक्रिया करण्याचे काम करते. सध्या १३ हून अधिक देशांमधील ३० पेक्षा जास्त बॉयो-बँक्स ‘स्पेसीमेन’ ( रक्त किंवा लाळ इत्यादींचा तपासणीसाठी पाठवायचा नमुना) चा वापर करत आहेत.

‘ओपनस्पेसीमेन’ला सुरूवातीला caTissue च्या रूपात लाँच करण्यात आले होते. यासाठी अमेरिकेतील राष्ट्रीय कर्करोग संस्थेने निधीचा पुरवठा केला, तर वॉशिंग्टन विद्यापीठासारख्या अमेरिकन शैक्षणिक संशोधन केंद्राने आपले सहकार्य देऊ केले होते. श्रीकांत अडिगा हे या प्रकल्पाच्या पहिल्या विकासकांपैकी एक आहेत. ते पुण्यातील ‘पर्सिटंट सिस्टम्स’मध्ये काम करत असताना या प्रकल्पाशी जोडले गेले. २०११ मध्ये जेव्हा या प्रकल्पातून निधी काढून घेण्यात आला, तेव्हा ‘कृषाग्नी सोल्युशन्स’नी या प्रकल्पाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले. असा बदल झाला असला तरी प्रकल्पाचा ‘ओपन सोर्स’ हा स्वभाव मात्र कायम राखण्यात आला.

‘ओपनस्पेसीमेन’च्या LIMS या अप्लिकेशनच्या माध्यमातून ‘बॉयो-बँक्स’ला आपल्या गरजे नुसार ‘बॉयो-स्पेसीमेन’ ट्रॅक करता येते. ‘ओपनस्पेसीमेन’वर उपलब्ध असलेले कलेक्शन, कंसेन्ट, क्यूसी, रिक्वेस्ट आणि वितरणाच्या कार्याला अनुकूल (कस्टमाईज) केले जाऊ शकते. ‘कृषाग्नी सोल्युशन्स’ नवनवीन आवृत्त्या विकसित करते आणि त्यासाठी व्यावसायिक सहकार्य मिळवून देण्याचे काम करते. आपल्या उत्पादनाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचे काम कंपनी करत आहे. याचसाठी कंपनीने चीनी आणि स्पॅनिश आवृत्ती सुद्धा सुरू केली आहे.

ओपनस्पोसीमेन ‘बॉयोबँकिंग’ उद्योग क्षेत्राच्या अनेक महत्त्वाच्या गरजा भागवण्याचे काम करते ही बाब गेल्या वर्षी झालेल्या वार्षिक समुदाय बैठकीत ( Annual Community Meeting) जगभरातील बॉयोबँकर्सनी मान्य केली.

ओपनसस्पेसीमेन टीम
ओपनसस्पेसीमेन टीम

‘ओपनस्पेसीमेन’च्या व्यावसायिक मॉडेलविषयी बोलताना श्रीकांत अडिगा म्हणतात की डेटाबेस हा एक ओपन सोर्स आहे आणि हे ओपन-सोर्स असणे हा सर्वात मोठा फायदा आहे, तर लायसनिंग मॉडेल हा इतर आणि आमच्यामधील सर्वात मोठा फरक आहे. ओपन सोर्स असल्याकारणाने या व्यासपीठाचा मोफत वापर केला जातो. वापरकर्त्याला केवळ सपोर्ट सारख्या कंसल्टन्सी सेवा, इन्स्टॉलेशन, डेटा मायग्रेशन, कस्टमायझेशन आणि इंटिग्रेशन अशासाठीच किंमत आकारली जाते.”

श्रीकांत अडिगा सांगतात, “सहकारीतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करुन विक्रीतील मक्तेदारी मोडून काढत असल्याकारणाने शैक्षणिक संशोधन केंद्रांना ओपन सोर्स खूपच आवडतो. यामुळेच अमेरिकेतील राष्ट्रीय कर्करोग संस्थेने फंडिगमधून हात काढून घेतल्यानंतरसुद्धा एक उदारमतवादी असलेल्या ओपन सोर्स रचनेला आम्ही टिकवून ठेवले आहे. आमच्याकडे लोक, अनुभव, तज्ञ आणि आपल्या ग्राहकांना योग्य मार्ग देण्यासाठी आवश्यक ती संसाधने देखील आहेत.”

प्रतिसाद आणि आव्हाने


‘ओपनस्पेसीमेन’कडे विक्री आणि मार्केटिंग टीम नाहीत. तरी सुद्धा वापरकर्त्यांरकडून आलेला फीडबॅक खूपच सकारात्मक आहे. ‘वर्ड्स ऑफ माऊथ’च्या माध्यमातून ‘ओपनस्पेसीमेन’कडे ग्राहकांचा ओघ सतत सुरू आहे.

श्रीकांत सांगतात, “ उच्च गुणवत्ता असलेले आणि वापरण्यासाठी अतिशय सोपे असेल असे जागतिक दर्जाचे उत्पादन बनवण्याच्या कामी आमची सारी गुंतवणूक खर्च झाली. या रणनीतीने आम्हाला तीव्र गतीने उत्पादनात सुधारणा करणे आणि खरी समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवले. या व्यतिरिक्त आम्ही वापरकर्त्या लोक समूहाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या उत्पादन विकास रणनीतीनुसार (प्रोडक्ट डेव्हलपमेंट) काम करतो. यामुळे आमच्या वापरकर्त्यांकडून नेमक्या गरजा काय आहेत हे जाणून घेण्याची मदत मिळते. तसेच त्यांच्यामुळेच या गरजांच्या पूर्ततेला बळकटी प्राप्त होते.”

असे असले तरी या उपक्रमासमोर अनेक आव्हाने देखील आहेत. या उपक्रमासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ‘ओपनस्पेसीमेन’ ही भारतीय कंपनी असून ती आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करते हेच.

श्रीकांत सांगतात की विक्रीमध्ये पाठपुरावा करणे, समोरासमोर घेतलेल्या मिटिंग आणि डेमो दाखवण्याची गरज असते. ते म्हणतात, “आमच्या आकाराच्या कंपनीला पूर्णवेळ विक्रेत्यांची भर्ती करणे हे शहाणपणाचे काम नाही. म्हणून आम्ही बॉयोबँकेचा अनुभव असलेल्या वितरक आणि भागीदारांच्या माध्यमातून काम करणे सुरू केले. उदाहरणार्थ, जर कुणी बॉयोबँक्सला फ्रीजर्स किंवा इतर उपकरणे विकत असेल तर आमच्यासाठी तो एक चांगला भागीदार सिद्ध होऊ शकतो.” ‘ओपनस्पेसीमेन’ने नुकतेच एका ऑस्ट्रेलियातील भागीदारासोबत टाय-अप केले आहे. शिवाय इतर देशांमधील काही संभाव्य भागीदारांसोबतही ‘ओपनस्पेसीमेन’ची चर्चा सुरू आहे.


विकासाची संधी


पुढील एक वर्षाच्या कालावधीत १०० ‘बॉयोबँक्स’ पर्यंत पोहोचण्याची श्रीकांत अडिगा यांची योजना आहे. ‘बॉयोबँक्स’ला आकर्षित करता यावे या साठी ते सास ( SaaS) आणि क्लाऊडवर आधारित ऑफरींग्जची शक्यता चाचपून बघत आहेत. ते सांगतात, “ आम्ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आमच्या पुढील पिढीची( next generation) आवृत्ती लाँच करणार आहोत. जागतिक पातळीवर आमच्या विस्तारण्यात ही आवृत्ती मोठी भूमिका वठवेल याची आम्हाला खात्री आहे.” OpenSpecimenv2.0 मध्ये नवीनतम वेब तत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे पूर्वीपेक्षा अधिक युजर फ्रेंडली आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories