इलॉन मस्क यांची येत्या उन्हाळ्यात भारतात टेस्लाच्या मॉडेल ३ इलेक्ट्रिक कार घेवून येण्याची योजना !

0

मुळची अमेरिकन असलेल्या इलेक्ट्रीक कार मधील प्रमुख कंपनी टेस्लाने, येत्या उन्हाळ्यात भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचे नियोजन केले आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी इलॉन मस्क यांनी सांगितले. “ अपेक्षा आहे या वर्षी भारतात दाखल होवू,” असे मस्क यांनी व्टिट केले आहे., टेस्ला  भारतात कधी दाखल होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यानी हा खुलासा केला आहे. 

Image : Tech Insider

मागील वर्षी एप्रिलमध्ये, कंपनीने म्हटले होते की, त्यांची योजना आहे की, ते भारतात त्यांच्या मॉडेल ३ कार घेवून २०१७ मध्ये दाखल होतील. त्यावेळी जगभरात त्यांच्या कारच्या नोंदणीला २०१६मध्ये सुरुवात झाली होती. मॉडेल ३ ही टेस्लाची आतापर्यंतची सर्वात परवडण्याजोगी कार आहे, आणि प्रत्येक चार्जिंग नंतर २१५ मैल प्रवास करते, जिची किंमत ३५ हजार अमेरिकन डॉलर्सने सुरु होते. कंपनीच्या इतर मॉडेल्स मध्ये मॉडेल एस आणि मॉडेल एक्स यांचा समावेश होतो.

मॉडेल ३च्या तपशिलाबाबत जी माहिती आली आहे त्यात :

मुळ मॉडेलमध्ये शुन्यापासून ६० एमपीएच (९७ किमी प्रतितास) सहा सेकंदात... इतकी क्षमता आहे, इतर मॉडेल यापेक्षा गतीमान आहेत.

यामध्ये ऑटोपायलट सुरक्षायंत्रणा सध्याच्या मॉडेलमध्ये आहे, ज्यामुळे कारला स्वत:हून चालण्याची आणि धडक टाळण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होते.

त्यात सर्वसाधारणपणे सुपरचार्जिंगची यंत्रणा आहे, ज्यात कार विशेष स्टेशनला त्वरीत जलद गतीने चार्ज होतात. टेस्लाचा प्रयत्न आहे की यांची संख्या दुपटीने वाढावी, २०१७च्या अखेरीस जगभरात ७२०० ठिकाणी सुपरचार्जची व्यवस्था देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यामध्ये पुढच्या आणि मागच्या बाजुला सामान ठेवण्याची जागा देण्यात आली आहे.

कंपनीच्या कारखान्याला मागील वर्षी भेट दिल्यानंतर रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाला महत्वाच्या बंदराजवळ जमीन देण्याची तयारी दर्शवली जेणे करून त्यांना दक्षिण आणि दक्षिणपूर्वेच्या देशात निर्यात करणे शक्य होईल. जेणेकरून भारताला आशियाचे मार्केटिंग हब निर्माण करण्यास मदत होईल, असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

सप्टेंबर २०१५, मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्लाला सँन जोस येथे भेट दिली, आणि स्वारस्य दाखविले की त्यांच्या प्रमुख प्रकल्पांपैकी काही अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील प्रकल्प राबवावेत जेणे करून ग्रामीण भागात त्यांना दुप्पट प्रतिसाद मिळेल.

२०१४मध्ये, टेस्लाने म्हटले आहे की, भारतीय बाजारात प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय नक्की झाला आहे, त्यांना असा देश सापडला आहे की जेथे त्यांना त्यांच्या आशियातील उत्पादनासाठी जागा सापडली आहे. मात्र असे म्हटले जाते की, निर्यात केलेल्या वाहनांवरील जास्तीचे कर आणि इलेक्ट्रिक कारसाठी वेगळी श्रेणी नसल्याने येथे कार विकण्यास चांगली संधी असताना त्या विकता येत नाहीत.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया