बंगळुरूच्या महिलेने ऑनलाईन तक्रार नोंदविली, ‘पिंक होयसाला’ ने चालत्या बसमध्ये छेड काढणा-यांना पकडले!

0

बंगळुरू शहर पोलिसांनी गेल्या काही वर्षात चौफेर सुरक्षा कवच तयार केले आहे, त्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी ५१ ‘पिंक होयसाला’ म्हणजे गस्ती पथके स्थापन करून महिला आणि मुलांच्या बाबतीत सुरक्षित वातावरण तयार केले. ‘सुरक्षा पॅनिक अॅप’च्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० प्रमाणे तातडीने मदत देण्यास त्यानी सुरुवात केली. त्याला नाव दिले ‘पिंक होयसाला’.


याबाबत, बंगळुरू पोलिसांनी नुकतेच ४७ वर्षांच्या माणसाला अटक केली, ज्याने चालत्या बसमध्ये एका महिलेची छेड काढली होती. वृत्तानुसार या माणसाने २९ वर्षाच्या तरूणीला जी आघाडीच्या आयटी कंपनीत काम करते, रेटण्याचा प्रयत्न केला होता. ही महिला कामावरून घरी जात होती.

याबाबतच्या वृत्तांनुसार, हल्लेखोर संबंधित महिलेच्या मागच्या बाकावर होता, बसमध्ये गर्दी होती. त्यांने जे काही कृत्य केले त्यामुळे महिला सावध झाली आणि तिने नुकतेच सुरू करण्यात आलेल्या अॅपच्या मदतीने तक्रार केली, ‘नो युवर पोलिस स्टेशन’ (Know your Police Station) आणि बेलांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. संबंधित पोलिस अधिका-यांचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला, आणि त्यांना घटना कळविली. त्यावेळी विशेष गस्ती पथकाने बस रोखली आणि छेड काढणा-याला घेवून गेले.

या बाबतच्या बातमी नुसार, बेलांदुर पोलिस ठाण्याचे निरिक्षक व्हिक्टर सिमॉन यांना ‘पिंक होयसाला’ वरून संदेश मिळाला की, बाजूच्या बसमधून तक्रार आली आहे. आऊटर रिंग रोडला असलेल्या बसला शोधून गस्ती पथकाने ती थांबविली आणि महिलेने दाखविलेल्या माणसाला पकडून नेले. याबाबत बोलताना व्हिक्टर म्हणाले की, “ तक्रार मिळता क्षणीच आम्ही गस्ती पथक सक्रीय केले आणि व्होल्वो बस थांबविली, त्यातील महिलेने तक्रार केलेल्या इसमाला ताब्यात घेतले. यात केवळ दहा मिनिटे गेली, ज्यात तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार बस शोधून त्यातील व्यक्तीला पकडण्यात आले. त्यांनतर मधुसूदन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि भादंवि ३५४, अंतर्गत तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले आणि १४ दिवसांच्या कोठडीत टाकण्यात आले.