पंतप्रधानांनी चंद्रलेखा यांना स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमुखपदी नेमले, जाणून घ्या त्यांच्या बद्दल!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी चंद्रलेखा या महिला सनदी अधिकारी ( आय ए एस) यांना स्वच्छ भारत अभियानाच्या संचालक पदावर नियुक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात चंद्रलेखा यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. या ठिकाणी त्यांना राज्यभरातून चांगल्या कामासाठी नावाजण्यात आले आहे. येथे त्यांच्या बद्दल काही तपशीलात जाणून घेवूया.


त्या २००८च्या तुकडीमधील सनदी अधिकारी आहेत, सार्वजनिक कामात भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्यांनी भ्रष्टाचार करण्यास अटकाव केला आणि शिक्षा दिल्याने त्या चर्चेत आल्या.

त्यांचा जन्म २७ सप्टे १९७९ मध्ये झाला, मुळच्या त्या आंध्रप्रदेशातील आहेत. त्यांची मातृभाषा लांबडी ही आहे. हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे. स्वच्छ भारत अभियानात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे, ज्यावेळी त्या बुलंद शहर बिजनौर आणि मेरठ मध्ये जिल्हाधिकारी होत्या.

बिजनौर जिल्हाला त्यांनी स्थलांतर बंदीचा जिल्हा बनविण्यात यश मिळवले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर वक्तव्य आणि कृती करण्यासाठी त्या प्रसिध्द आहेत.