या कुटूंबाला भेटा ज्यांनी एकत्रितपणे बारावीची परिक्षा दिली 

1

नादिया जिल्ह्यातील लहानशा गावात, वडील आई आणि मुलगा असे तिघेही एकत्रितपणे  बारावीच्या परिक्षेला बसले. नुकत्याच जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षेच्या निकालात काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे पहायला मिळाले. कल्याणी मंडल (३२) बलराम मंडल (४२) यांनी त्याचा मुलगा बिपलाप मंडल (१७) यांच्या सोबत बारावीची परिक्षा दिली.

“ त्यांना अभ्यास करावासा वाटला. त्यामुळे आम्ही मुख्याध्यापकांची परवानगी घेतली, माझ्या पालकांनी गणवेश घातला, सुरूवातीला माझ्या शाळाशिक्षकांनी विरोध केला. नंतर ते देखील माझ्या पालकांचे मित्र झाले,” बिपलाप यांनी सांगितले.

आर्थिक कारणांमुळे बलराम आणि त्यांच्या पत्नी कल्याणी यांना शिकता आले नाही, नंतर त्यांनी बारावीची परिक्षा मुलासोबतच देण्याचे ठरविले. कल्याणी ज्यांना आठवीनंतर शाळा सोडावी लागली होती, आणि बलराम ज्यांना नवव्या वर्गानंतर शिकता आले नाही, दोघेही रोजंदारी मजूर आहेत.  कल्याणी आणि बलराम दोघेही २२८आणि २५३ गुण घेवून उत्तिर्ण झाले आहेत. या दोघांनाही हे सहज शक्य झाले नाही. दोघाही पालकांनी रबिंद्र मुक्तो विद्यालय मध्ये प्रवेश घेतला, बलराम शेतात काम करतात कल्याणी बक-या चरायला नेतात.

“ माझ्या आईचे लग्न झाले म्हणून आणि वडीलांना आर्थिक कारणाने शाळा शिकता आली नाही. पण त्यांना पुढे शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही मुख्याध्यापकांची परवानगी घेतली. माझ्या पालकांनी गणवेश घातला. सुरूवातीला माझ्या शिक्षकांनी विरोध केला, नंतर ते माझ्या पालकांचे मित्र झाले.”

तिघेही कला शाखेत प्रवेश घेत आहेत, आणि पुस्तके मिळून वापरत आहेत, शिवाय इतर साहित्य देखील, त्यामुळे बचत होते. ज्यावेळी निकाल जाहीर झाले, कुटूंबाच्या भावना संमिश्र होत्या. वडील बलराम यांना याबाबत व्यक्त होता आले नाही,

८४.२ टक्के विद्यार्थी बारावीच्या परिक्षेत यंदा उत्तिर्ण झाले, गेल्या १५ वर्षातील उत्तिर्णांची ही चांगली टक्केवारी आहे.