शोकगीत स्थगित ठेवून, स्टार्टअपचे गाणे पुन्हा वाजेल!

शोकगीत स्थगित ठेवून, स्टार्टअपचे गाणे पुन्हा वाजेल!

Saturday March 25, 2017,

11 min Read

अगदी स्टार्टअपच्या दफनविधीच्या मेजवान्या प्रसिध्द आहेत, ही पुन्हा वाचावी अशी मौल्यवान १६ वर्षांपूर्वीची कहाणी आहे; घंटा वाजत होत्या, ठीक आहे. शोकमग्न लोक गोळा झाले होते आणखी एका स्टार्टअपला मूठमाती देण्यासाठी, त्यामुळे असे वाटते की, सन २०१७ हे स्टार्टअपसाठी श्रध्दांजली वर्ष म्हणावे लागेल.


image


एका स्टार्टअपच्या संस्थापकाने मला काव्यात्म पध्दतीने सांगितले –- “ कबरीवर पडणा-या पानांनी माझे हृदय बंद पडले, पण मी स्वत:ला सावरत म्हणालो याचा अर्थ वसंत ऋतू फार दूर नाही ” त्याने केवळ निसर्गाच्या फिरत्या ऋतूचक्राचा दाखला दिला. परंतू ही अटळ अशी गोष्ट आहे, स्टार्टअप हा वेगाने वाढणारा प्रमाणित उद्योग आहे. दिनदर्शिकेतील एक महिना नवउद्योगात कदाचित चार महिन्याप्रमाणे किवा पारंपारिक व्यापाराप्रमाणे असतो. असे असले तरी नव्या यशाची गणिते तयार केली जातात, जेथे मुल्यांकनाला मुल्यनिर्मितीपेक्षा जास्त महत्व असते. तर मुल्यांकन होताना, अगदी मोजता येणा-या गोष्टी म्हणजे वाळवंटातील मृगजळ असण्याची शक्यता असते जे कल्पनेत असते, मुल्यनिर्मिती जी जास्त अवघड संज्ञा आहे, ती तुलनात्मक दृष्ट्या पहायला सोपी असते.

स्टार्टअपच्या तीन महत्वाच्या स्तंभाची शक्ति – ग्राहक, नियोक्ते (कर्मचारी), आणि गुंतवणूकदार—हे चांगले सुरूवातीचे बिंदू आहेत ज्यातून मुल्यनिर्मिती करता येते.


अरविंद कृष्णन 

अरविंद कृष्णन 


“ येथे एक आंतप्रेनर (व्यावसायिक) काही करण्याचा प्रयत्न करतो त्याला एक लय असते — त्याच्या ग्राहकांसाठी, त्यांच्या जीवनमानात नव्या मुल्यवृध्दी असतात; त्यांच्या नियोक्त्यांमध्ये कारकीर्द पूर्ण करण्याची जिद्द आणि काहीतरी नवे शिकण्याची उर्मी असते जी त्याला त्यांच्याकडून शिकता येते; त्याच्या गुंतवणूकदारांकडून त्यांच्या गुंतवणूकीचा परतावा असतो,” असे अरविंद कृष्णन सीइओ आणि संस्थापक ‘दि फुलर लाइफ’ म्हणाले. आणि ज्यावेळी या स्तंभापैकी कुणीतरी एक डगमगतो त्याने ही लय बिघडते आणि विनाशला कारण होते.

एक स्वप्न भरकटलेले

हे पाहणे कठीण नाही की काही चूक होते आहे का. वाढत्या महागाईमुळे वाढलेला खर्च आणि त्यासंबंधी कमतरता, गुंतवणूकीची सघनता, वाढलेल्या ग्राहक उपलब्धतेचे मूल्य आणि सर्वसमावेशक वणवा. त्याबाबत तुम्ही इथे, इथे आणि इथेच वाचू शकता. त्याला जसे म्हणतात की, ‘बडा घर पोकळ वासा’ तसे होता कामा नये.

परंतू अगदी स्टार्टअपच्या अंत्यविधीच्या मेजवान्यादेखील लोकप्रिय होत आहेत, चला १६वर्षापूर्वीच्या मागच्या काळात जावून डोकावूया काही धिरोदात्त लोकांच्या समूहाने भारतात पहिली पिंक-स्लिप पार्टी दिली होती.

ती २ नोव्हे. २००१ ची थंड संध्याकाळ होती, आणि बंगळूरूच्या इंडेया.कॉमच्या गच्चीतील कॅफेमध्ये, जे त्यावेळी बंगळूरूच्या उपनगर कोरामंगला मध्ये होते, तेथे इंडेया.कॉमच्या टी शर्ट परिधान केलेल्या माजी कर्मचा-यांनी गजबजले होते. त्यांनी बिंदूचा लाल रंग बदलून गुलाबी ठेवला होता जो त्यांच्या टी शर्टवर होता. ती संध्याकाळ या मेजवानीसाठी कठीण अशीच होती. आणि एकमेकाला एकमेकाकडे मदतीसाठी पाठवण्याची यादी कर्मचा-यांकडून दिली जात होती ज्यांना नवे काम हवे होते.

ज्या वाचकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी इथे हे सांगायला हवे की, Indya.com. काय होते.

इंडाया ची स्थापना मायक्रोलॅण्डचे प्रदिप कार यांनी सन २००० मध्ये डॉट कॉमच्या लाटेवर स्वार होण्यासाठी केली होती. इंडायामध्ये एकूण गुंतवणूक होती ५३ दशलक्ष डॉलर्स. त्यात सप्टेंबर २०००मध्ये मुल्यांकन केले त्यावेळी १५० दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढ झाली होती. आणि ऑगस्ट २००१पर्यंत ती केवळ १५ दशलक्ष डॉलर्सवर येवून पोहोचली होती. केवळ दीड वर्षांच्या कालावधीत ती गडगडली होती, आणि हा स्टार्टअप (त्यावेळी त्यांना पोर्टल म्हटले जात असे) वणव्यात सापडला होता. योगायोगाने रूपर्ड मर्डोक यांच्या स्टार टिव्हीमध्ये त्याचा विलय झाला. (जो इंडाया मधील मोठा भागधारक होता.)

“इंडाया ही अंधानुकरणाची टूम होती अशी टूम जी सुरूवातीपासून अंतापर्यंत घेवून गेली,” सुनिल लुल्ला म्हणाले, ज्यांना कार यांनी इंडायाचे सीईओ म्हणून नियुक्त केले होते.

युवर स्टोरीशी फोनवरून बोलताना मुंबईस्थित सुनिल म्हणाले की, आता ‘ग्रे ग्रुप ऑफ इंडिया’ चे कोण चेअरमन आणि कार्यकारी आहे, हे प्रातिनिधिक आहे, ज्याची इंडाया सोबत तुलना होवू शकत नाही किंवा आता तिथे जे काही होत आहे त्याच्याशी देखील. “ आम्ही आमचा पैसा कधीच उधळला नाही. त्या उलट त्यातील पै पै कशी गुंतवता येईल याचा आम्ही विचार केला.” त्यांनी सांगितले. त्यांच्या मते इंडाया बंद होण्याचे कारण गुंतवणूकदारांना जागतिक दबाव होता की त्यांनी माघार घ्यावी.


सुनील लुल्ला 

सुनील लुल्ला 


इंडाया मध्ये काय झाले होते त्याचा शोध घेत चर्चा करण्यात हशील नाही असे सांगत ते म्हणाले की, “ त्या छोट्याश्या कालावधीत इंटरनेटच्या व्यवसायात आम्ही एक ब्रँण्ड विकसित केला होता. तुम्हाला माहिती आहे का आम्ही २९ फेब्रुवारीच्या लिप वर्षात इंडाया डॉट कॉम सुरू केला होता. आणि त्यावेळी पहिल्यांदा आम्ही स्टेट बँक ऑफ कर्नाटकमध्ये ५० दशलक्ष डॉलर्स भरले होते. बँकेच्या व्यवस्थापकांचे हात थरथरत होते ज्यावेळी त्यांनी तो धनादेश स्विकारला.,” सुनील यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितले. माध्यम आणि दळणवळण क्षेत्रातील व्यावसायिक, सुनील यांची ख्याती या क्षेत्राचे पुढारी अशीच आहे ज्यांनी एम टिव्ही आणि सोनी एंटरटेनमेंट सारख्या ब्रँण्डची स्थापना केली.

अगदी आजही इतक्या वर्षांनी, इंडायाच्या माजी संबंधिताची भेट दर चार वर्षांनी होते त्यावेळी डॉट कॉम च्या जगातील उधाणाची आठवण जागवली जाते.

“ हरकत नाही जगात आम्ही जिथे असू, आम्ही दर चार वर्षानी येणा-या लिप वर्षात एकत्र येतो. त्या स्मृतींना उजाळा देतो की आम्ही काय मिळवले होते, आम्ही काय उभारले होते आणि कोण होतो.” सुनील पुढे म्हणाले. इंडाया डॉट कॉम ने एका क्षणात ऑनलाइन संपर्काचे स्थान मिळवले होते. शॉपिंग, प्रवास, नोक-या, व्यक्तिगत कर्ज, आणि बरेच काही. त्यांच्याकडे २५० मजबूत कर्मचारी होते, बहुतेक बाहेरून आलेले तरूण जे आय टी शहर बंगळूरूकडे इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी नवे उभारण्याचे स्वप्न घेवून रवाना झाले. अरविंद हे तसेच एक कर्मचारी होते. “ होय, ती एक छान सफर होती. आम्ही खूप मेहनत केली आणि मजाही.” अरविंद सांगतात. जे त्यापैकी एक आहेत ज्यांना या बंदीचा फटका बसला. त्यांनी त्यानंतर स्वत:चा उद्योग सुरू केला. दी फुलर लाईफ, आणि ते रनर फॉर लाईफचे देखील संस्थापक आहेत.

“ २००१मध्ये गोष्टी विपरीत घडू लागल्या होत्या. या त्याच्याच पाऊल खूणा होत्या की आम्ही भरकटू लागलो होतो. हे देखील बघण्यासारखे होते की महसूलाचा ताळमेळ, पेज व्हूज किंवा आयबॉलशी जोडण्यात आला नव्हता,” अरविंद सांगतात. ते सध्याच्या काळात देखील लागू होणार आहे. ते पुढे म्हणाले की, “ आम्ही लोकांनी एक रूपया मिळवण्यासाठी दोन घालविले, जे काहीसे अयोग्यच होते.”

“ न्यूज कॉर्प जे स्टारच्या मालकीचे होते इंटरनेटच्या व्यवसायाबाबत निश्चित धोरण घेवून चालत नव्हते. त्या ऐवजी त्यांना दूरचित्रवाणी व्यवसायात जास्त स्वारस्य होते.” असे राजीव विज म्हणाले. कार झोन रेंटचे संस्थापक आणि कार्यकारी जे इंडायाचे माजी सहकारी होते. राजीव यांची स्वत:ची प्रवास कंपनी ‘नेट२ट्राव्हल.कॉम’होती, जिचा विलय ‘इंडाया.कॉम’ मध्ये करण्यात आला होता आणि दुर्दैवाने ती २००१मध्ये बंद झाली.

राजीव म्हणाले की, “ यशाचे मापदंड पेजव्हूज आणि आयबॉल असतात. आजच्या जीएमव्ही सारखे आणि ग्राहकांचा ताबा ज्यांना ब्रँण्ड बाबत निष्टा नाही त्याच्या हाती”.

अंधानुकरणाची परिसीमा

सुनिल यांचे मत योग्यच होते की इंडाया ही अंधानुकरणाची टूम होती. त्याची परिसीमा म्हणजे ‘हे केवळ इंडाया मध्येच होवू शकते’ ब्रँण्डने टाइम्स ऑफ इंडिया मध्ये १६३ वर्षांच्या परंपरा तोडून पहिल्या पानावर पानभर जाहिरात केली. आणि इंडाया.कॉम सुरू झाल्याची उद्घोषणा झाली. मोठे फलक झळकवले गेले. लोगोमध्ये लाल ठिपका असे सांगत होता की थांबा आणि पहा. सांगितले जाते त्यानुसार, शुभारंभाच्या मेजवानीचा खर्च चार कोटी रूपये झाला होता. लक्षात घ्या हे सारे त्यावेळी घडत होते ज्यावेळी रिडिफ बाजारपेठेचा नेता होता, याहू वाहतूक सिग्नल औलांडून पुढे निघाला होता.


राजीव विज 

राजीव विज 


परंतू इंडाया ने जे काही केले त्या सर्वथा नव्या चूका होत्या अनेक कारणांनी--- एक अलिशान कार्यालय, प्रमाणापेक्षा जास्त वेतनमान, मोठे बाजारपेठीय खर्च, आणि सुखासीन मेजवान्या. असे सांगतात की दरवर्षी ५० रूपये कमाविताना इंडायाने ३०० रूपये खर्च केले. जर गुंतवणूकदारानी – स्टार हा प्रमुख गुंतवणूकदार होता आणि त्यांनीच कार यांच्याकडून ही कंपनी विकत घेतली — त्यांनी यावर पांघरूण घातले नसते तर अमेरिकेच्या त्यांच्या डॉट कॉम व्यवसायात त्यांना डोके वर काढता आले नसते. (युवर स्टोरीच्या विनंती नंतरही कार यावर प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध झाले नाहीत.) ऑक्टोबर २००१पर्यंत, २५ कर्मचारी उरले होते. स्टारने इंडायाच्या ऑनलाइन व्यवसायापेक्षा दूरचित्रवाणीच्या त्यांच्या व्यवसायात जास्त लक्ष घातले होते.

अनू शर्मा, या महिला ज्यांनी त्यावेऴी एचआर प्रमुख म्हणून सर्वाधिक लोकप्रियता मिळवली होती, म्हणाल्या की,“ पुढच्या तीन महिन्यांसाठी मी काहीच करू शकत नाही किंवा नव्याने काम देवू शकत नाही. इतकी मी मानसिक दृष्ट्या खचले होते.” त्यांनी देखील त्यानंतर बंगळूरूमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केला. ‘दी एच आर प्रँक्टिस’,

सुनील आणि अन्नू यांच्या दाव्यानंतरही त्याना वाईट पध्दतीने काढून टाकण्यात आले, तेथे दोन्ही बाजूने नुकसान झाले. “ अशाप्रकारे कुणाला टाकून देणे योग्य नाही. पण आम्ही चमूला सांगितले की, त्यांना काढून टाकण्याचे कारण त्यांच्या अकार्यक्षमता किंवा अव्यावसायिकता नव्हेत.” त्या म्हणाल्या. प्रत्येक कर्माचा-याला चांगले पुनर्वसनाचे पॅकेज देण्यात आले आणि सकारात्मक संदर्भ देण्यात आले.

नव्या सहयोगी व्यावसायिक संस्थाचा उदय

बरेच कर्मचारी नव्या संस्थामध्ये नोकरीला लागले, तर काहीजण स्वत:च्या व्यवसायात गेले.“ चौ-याण्णव व्यावसायिक इंडाया कोसळल्यामुळे तयार झाले”. सुनील मोठ्या गर्वाने आणि अभिमानपूर्वक सांगतात.

“ इंडाया हा माझ्यासाठी सकारात्मक अनुभव होता. मला समजले की जेथे सुरक्षित वातावरण असते तेथे विकास होत नाही. उद्योजकाची कातडी खेळात सोलून निघाली पाहिजे,” अरविंद म्हणतात. तेथे खूप काही नोक-या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी नंतर एक चांगली गोष्ट केली. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यांनी पन्नास जणांना रोजगार दिला. आणि मागील वर्षी रूपये दहा कोटीपेक्षा जास्त महसूल मिळवला. ते उपाध्यक्षांच्या मार्गाने गेले नाहीत त्यानी मित्रांकडून किंवा कुटूंबातून पैसे उभारण्याशिवाय यश मिळवले.



लोवई नवलाखी

लोवई नवलाखी


लोवई नवलाखी यांच्यासाठी, जे बंगळूरू मध्ये ‘इंटरनॅशनल मनी मॅटर्स’चे संस्थापक कार्यकारी आहेत, इंडाया मध्ये सहभाग म्हणजे शेवटचा इंटरनेट संस्थेतील वाईट अनुभव होता. “ त्यावेळी, मी चाळीशीच्या जवळपास होतो. आणि नेहमी पारंपारीक अर्थविषयक सेवांमध्ये काम करत होतो. मला वाटले इंडाया म्हणजे माझ्या साहसाचा विषय असेल,” त्यांनी सांगितले.

“ इंडाया मध्ये अद्भूत उर्जा होत्या. माझ्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात माझी बायको मला म्हणत असे की, तुम्ही तरूण दिसायला लागला आहात. ते म्हणाले की, मी नेहमी हे ऐकून स्मितहास्य करत असे”.

लोवेली यांनी इंडायामध्ये पर्सनल फायनान्स सांभाळले. आणि ते सांगतात की ते एक महसूल मिळवण्याचे साधन असते. “आम्ही गुंतवणूकदरांच्या मनोवृत्तीचा अभ्यास करतो,” ते म्हणाले. पिंक स्लिप मिळाल्यानंतर लोवेली यांनी विचार केला की दुसरी नोकरी मिळवावी. पण “ मी माझ्या माजी सहका-यांशी चर्चा करणे बंद केले. आणि विचार केला की पर्सनल फायनान्स क्षेत्रातच माझा स्वत:चा व्यवसाय करावा”.

त्यांची दोन शाळेत जाणारी मुले होती, त्यावेळी स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार म्हणजे धोका स्विकारणे होते. “ ज्यावेळी आम्ही बाहेर जेवायला जायचा विचार करत असू कुटूंबातून सुखसागरला जाण्याची सूचना येई. मला नंतर समजले की ते पैसे वाचविण्यासाठी तसे सांगत असत.” ते हसत सांगत होते. प्रत्येक व्यावसायिक व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांचा दहा वर्षांचा लहानगा विचारणा करी की ते समभाग होते की कर्ज होते. “ ते संघर्षाचे दिवस होते, परंतू आम्हाला कुटूंब म्हणून खूपकाही शिकायला मिळाले. बचत कशी करावी आणि एकमेकांना मदतही. त्यानी पुढे सांगितले. त्यांनतर हे सांगणे नवलाईचे नाही की त्यावेळचा लहानगा नंतर व्यावसायिक झाला. राशिद नवलाखी २६. रिफोरीइंडाया.ओआरजीचे संस्थापक आणि मुख्य डिझाइन थिंकर. जे विद्यार्थी आणि व्यावसायिकांना कौशल्य आणि मानसिकता यासाठी सक्षम करतात ज्यातून त्यांची कारकिर्द त्यांना घडविता यावी. 

काल्पनिक संपूर्ण सुखी जमात

संपूर्णपणे वणव्यात जाणे हे जरी स्टार्टअप मधील भयाण वास्तव असले तरी ती सुध्दा एक बातमी आहे, पण आम्ही पाहिले तसे इतकीच त्याची ओळख नाही.


Anu Sharma

Anu Sharma


“ याचे कारण स्टार्टअपच्या कर्मचा-यांच्या मनात असलेल्या सुरक्षिततेच्या भावना ज्यांना हेच माहिती असते की जणू काही ते मालकांना जे हवे तेच करत आहेत. ते असे करतात कारण चुकीचे निर्णय जे मालक घेतात त्यांच्या माथी मारले जातात”. अनू सांगतात.

ज्यावेळी बहुतांश संस्थामध्ये टाळेबंदी होते त्यावेळी, तो काही सार्वत्रिक निर्णय नसतो. माहिती दिली जाते आणि करारानुसार जे काही ठरले असेल त्यानुसार नोटीसचा वेळ दिला जातो. त्यापेक्षा निर्णय घेणा-यांचा चेहराच नसतो. काहीवेळा हजारोमैल दूर राहणा-या व्यक्ती हा निर्णय घेत असतात. मात्र स्टार्टअपमध्ये संस्थापक आणि कर्मचारी यांच्यात जवळीक असते आणि कर्मचा-यांना निर्णय घेताना होणा-या चूका समजत असतात. “ ज्यावेळी स्टार्टअप किंवा स्थापित कंपनी, बंद करण्याचे ठरते. नेहमी प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नात येते की दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काही उपाय आहे का. आणि ब-याचदा विपणन आणि पगारांना कात्री लावली जाते.” त्या म्हणाल्या.

दिप कारला, संस्थापक आणि समूह कार्यकारी मेक माय ट्रिप ज्यांनी डॉट कॉमचे उधाण अनुभवले आहे आणि ओहटीतून यशस्वीपणे बाहेर आले आहेत, संस्थापकांना पथदर्शक सल्ला देतात ज्यामुळे सध्याच्या काळात निभाव लावता येईल.

त्यांनी युवर स्टोरीला सांगितले की, "स्टार्टअपने योग्य तेच घ्यावे आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून व्यवसायाच्या लक्ष्यापर्यंत जावे. विनाकारण अनावश्यक कठीण जबाबदा-यांचे ओझे लादून घेता कामा नये ज्यात खूप गुंतवणूक होईल ज्यातून चांगला काळ असतानाही पैश्याचा तुटवडा निर्माण होईल”.

ते पुढे म्हणाले की, “लढवय्येपणाने आणि नकारात्मक पध्दतीने आपला चमू निवडला पाहिजे. गोष्टी वेगाने वळणे घेत असतात त्याची अनेक कारणे असतात. सुदृढ आणि पारदर्शक वातावरण तयार करा, जेथे प्रत्येक चमू सदस्याला कंपनीच्या लक्ष्याची, उद्दीष्टांची आणि पध्दतींची कल्पना असेल. त्यात त्याचा तिचा सहभाग काय असावा याचे ज्ञान असेल. त्यामध्ये काहीना त्यांच्या सुरूवातीला कंपनीच्या लक्ष्याचे माइलस्टोन सापडल्याचा भास होईल मात्र त्याना योग्य प्रशिक्षण आणि सुरूवातीपासून योग्य दिशा देण्याची गरज आहे. यातून हेच सुनिश्चित होते की, कंपनी त्यांच्या चमूला समजूतदारपणे हाताळून नव्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करू शकते.”


Deep Kalra: 'Be prudent and conservative while building the team.'

Deep Kalra: 'Be prudent and conservative while building the team.'


एऑन बाबत मी अलिकडेच निबंध वाचला ज्याचे शिर्षक ‘युटोपिया इंक’, ज्यात प्रश्न विचारण्यात आला होता की, युटोपियन समाजात यश आणि अपयश यात कोणता फरक आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, ते सारे मला पुन्हा तपशिलातून वाचणे गरजेचे आहे. माझे लक्ष ज्यावर गेले ते हेच की, स्टार्टअपशी तुलना. त्यात म्हटले आहे की, “. . . . जितक्या योग्य चालकांच्या हाती ते असेल तितक्या प्रकारच्या वेगवेगळ्या आवाजांचा गदारोळ होत असतो तश्याच प्रकारे आजच्या काळातल्या संस्थासमोरच्या समस्या आहेत: भांडवलाची अनिश्चितता, भाजल्याच्या जखमा, खाजगी मालमत्तेचे वाद, आणि संसाधनांचे नियोजन, वादातून मार्ग काढण्यासाठी असलेल्या कमकुवत सुविधा, सिध्दांतवाद, संस्थापकांचे प्रश्न, व्यवस्थापनाची विश्वासार्हता, कौशल्याचा आभाव, आणि नव्या पिढीतल्या उमद्या हुशार लोकांचा शोध घेण्यात अपयश.”

“असे म्हणतात की, युटोपियन समाज स्टार्टअप सारखे असतात – अल्पायुशी.”

जर काही, इंडाया.कॉम च्या उदाहरणातून दिसत असेल तर ते हेच आहे की, कसे अल्पायुशी स्टार्टअप्स स्वत:चे लक्ष्य युटोपियन समाजासारखे ठेवतात, आणि अचानकपणे बिजारोपण करतात ज्यातून मुल्यनिर्मितीला बाधा निर्माण होते, केवळ जर त्यांनी मुल्यांकना पलिकडेच पहायचे ठरविले तर.

“ आज, तरूण लोक इतरांच्या निधी उभारणी बाबत वाचतात आणि स्वत: देखील व्यावसायिक होण्याचे ठरवितात. हे अश्याप्रकारे काम होत नसते. तुम्हाला तुमच्या गरजेबाबत खोल ज्ञान असावे लागते, झोकून काम करण्याचा छंद असावा लागतो, आणि त्यातून तुम्हाला काय मिळते याबाबत सदैव जागरूक असायला हवे.” राजीव म्हणाले. 

लेखिका -दिप्ती नायर