लारिस्सा वॉटर्स, ठरल्या ऑस्ट्रेलियाच्या संसदेत बाळाला स्तनपान देणा-या पहिल्या माता!

0

महिला संसद सदस्या, ज्या संसदेत आपल्या बाळाला स्तनपान देत आहेत, सध्या चर्चेचा विषय झाल्या आहेत, त्यामुळे कामाच्या ठिकाणी नवमाताना हा हक्क मिळाण्याच्या चळवळीला बळ आले आहे.

ऑस्ट्रेलियन सिनेटर  लारिस्सा वॉटर्स, यानी इतिहास घडविला ज्यावेळी त्यांनी संसदेच्या सभागृहातच आपल्या बाळाला स्तनपान करून दुध पाजले, त्यावेळी असे करणा-या त्या पहिल्याच राजकीय नेत्या ठरल्या! फेसबूक वर लारिस्सा यांनी म्हटले आहे की, “ मला खूप अभिमान वाटला की, माझी मुलगी आलिया ही सर्वात पहिले बालक ठरली जिला सार्वभौम सभागृहात स्तनपान करता आले! आणि आम्हाला आणखी कौंटुबिक- जिव्हाळ्याच्या आणि लवचिक कामाच्या जागा मिळायला हव्या, जेथे परवडेल असे पाळणाघर देखील असेल.”


लारिस्सा वॉटर्स दहा आठवड्यानंतर संसदेत परतल्या, त्यांच्या दुस-या अपत्याला(मुलीला) त्यांनी जन्म दिला होता, आता त्यांनी स्तनपान करण्याबाबतच्या नियमांचा पूरेपूर फायदा मिळवला होता ज्यासाठी मागीलवर्षी त्यांनी त्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. स्तनपान आता सभागृहात देखील करण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र याचे श्रेय लारिस्सा यांना देवून धन्यवाद दिले पाहिजेत, कारण ,मागील वर्षीच त्यांनी नियमातील ही सुधारणा घडवून आणली. नवमाता किंवा पिता यांना सभागृहात असताना देखील आपल्या बाळाची काळजी घेण्याची परवानगी देण्यात आली. 

२००९ मध्ये खासदार सराह हसन या तरुण महिलेला त्यांच्या दोन वर्षाच्या मुली सोबत पाच मिनिटे वेळ घालवायचा होता,  मात्र ज्यावेळी त्यानी मुलीला सोबत सभागृहात नेले त्यावेळी संसदेचे अध्यक्ष जॉन हॉग यांनी त्यांना ‘संसद ही गंभीर विषयाचे कामकाज करण्याची जागा आहे’ असे म्हणत आक्षेप घेत प्रवेश घेण्यास मनाई केली. त्या लहानग्या मुलीने हंबरडा फोडला ज्यावेळी तिला तिच्या आईपासून विभक्त करून बाहेर नेण्यात आले आणि दरवाजाला कुलूप लावण्यात आले.

आईस लॅन्डिक ची सुरूवात

आईस लॅन्डिकच्या खासदार ऊनूर कनाराऊसडोटीर या बातम्यात झळकल्या जेव्हा मागील वर्षी त्यानी त्यांच्या नवजात बाळाला संसदेच्या चर्चे दरम्यान स्नपान करविले, “ ही जगातील सर्वात नैसर्गिक गोष्ट आहे,” त्या म्हणाल्या.

ऊनूर,ज्या मध्य- उजव्या इंडिपेन्डन्स पक्षाच्या आहेत, त्यांनी त्यांच्या सहा आठवड्याच्या मुलीला अलपिंगीच्या संसदेत सोबत आणून सांभाळले होते, त्यावेळी त्यांनी नव्या इमिग्रेशन कायद्यासाठी झालेल्या चर्चेनंतर मतदानही केले होते. असे असले तरी युरेपियन देशांमध्ये याबाबत सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याबाबत तणावाची स्थिती नाही, ही पहिलीच वेळ होती जेंव्हा महिला खासदारांनी प्रत्यक्ष सभागृहातच कामकाज सुरू असताना बाळाला दूध पाजले होते.

“ तिला भूक लागली होती, आणि मला पोडियम वर जाणे अपेक्षित नव्हते,” उन्नूर म्हणाल्या की, “ ज्यावेळी अन्य खासदार विधेयकावर मत मांडत होते, मी पुढे झाले आणि जे मला करायला हवे होते ते केले. म्हणजे मी एकतर बाळाला रडू द्यायाला हवे होते किंवा तिला घेवून बाहेर जायला हवे होते, किंवा माझ्या बाजूला बसलेल्या खासदारांकडे तिला देवून बाहेर न्यायला सांगायला हवे होते, मात्र त्या पेक्षा मी तिला तेथेच दुध पाजण्याने सर्वाना कमी व्यत्यय झाला असता.”

बहुतांश देशात अनुमती नाहीच

दृढपणे पश्चिमी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे सार्वजनिक जागी स्तनपान करण्यास विरोधच आहे, तुलनात्मक दृष्ट्या आशियाई किंवा आफ्रिकन देशांतील समाजांपेक्षा. मात्र या लेखाच्या लेखिकने त्यांच्या गृहराज्य केरळात हे अनुभवले आहे की कशाप्रकारे माता त्यांच्या बाळांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून जातानाही किंवा सार्वजनिक जागेतही सहजपणे स्तनपान करवितात.

परंतू युके किंवा यूएस मध्ये बहुतांश मातांना त्यांच्या बाळाना स्तनपान देताना सार्वजनिक जागी विरोध केला जातो, विज्ञानाने देखील हे सिध्द झाले आहे की आईचे दूध बाळाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असते. स्तनपान करणारे बाळ इतरांच्या तुलनेत जास्त निरोगी आणि सुदृढ असते.

पण युके मध्ये स्तनपान करण्याचा दर जगातील सर्वात कमी नोंदविला जातो, हाऊस ऑफ कॉमन्सच्या सभागृहात आजही खासदारांना बाळाला दूध पाजता येत नाही. वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या पाहणीतून हेच दिसून आले की, जेथे लिंगभेदाच्या बाबतीत संसदेत कायदे करण्यात आले तेथेच महिला खासदारांना त्यांच्या बाळाला दूध पाजण्यास मज्जाव केला जातो.

ज्येष्ठ डियूपी राजकीय नेता सॅमी विल्सन यांनी टीका केली आहे की, त्या म्हणाल्या की हे प्रदर्शनकारी आणि महिलांना लाज आणणारे कृत्य आहे की, संसदेच्या सार्वजनिक जागी स्तनपान करविणे. माजी खासदार जो कॉग्ज म्हणातात की, “ बालकांसाठी हे चांगलेच आहे, त्यामुळे आपण त्यांचे समर्थन केले पाहिजे.” सॅमी विल्सन यांच्या विधानाने महिला राजकारण्यांना राग आला, त्यात त्यांच्याच पक्षाच्या महिला होत्या. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, “आम्ही सॅमी यांच्याशी सहमत नाही, ज्या पक्षात आम्ही आहोत तेथे स्तनपानाला महत्व दिले जाते”.

महिलांना स्तनपान देता यावे म्हणून वातावरण तयार झाले पाहीजे, कुण्या देशाने तरूण नागरिकांच्या या हक्कासाठी पाया रचला आहे, जेणे करून येणारी पिढी निरोगी रहावी.

लेखिका : शकिरा नायर