समाजातील बदलांत सहभागी होऊ इच्छिता तर ---- ‘हल्लाबोल’!

समाजातील बदलांत सहभागी होऊ इच्छिता तर ---- ‘हल्लाबोल’!

Friday November 06, 2015,

7 min Read

आमच्या वाचकांपैकी अनेकांना अनेकदा एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायचे असते, जेणेकरून आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेची पूर्तता होईल. परंतू त्यामध्ये अनेकदा समर्थन, निधी आणि मदत करणारी चांगली मंडळी यांच्या अभावाने आपले हे विचार मूर्त स्वरुपात साकार होत नाहीत. तुमच्यापैकी जो कोणी या श्रेणीतील असेल त्याच्यासाठी एक चांगली बातमी आहे. हा लेख वाचून झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही सबब न सांगता ते परिवर्तन करता येईल जे तुमच्या मनात आहे. आज आम्ही तुम्हाला परिचय करून देत आहोत ‘हल्लाबोल’चा! जे विशेषकरून तुमच्यासाठीच तयार करण्यात आले आहे. हे व्यासपीठ अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे जे आपल्या विचारांनी आणि महत्वाकांक्षेच्या बळावर दुनिया बदलण्याची हिंमत ठेवतात आणि आतापर्यंत अश्याप्रकारच्या व्यासपीठा अभावे आपल्या महत्वाकांक्षाना आवाज देण्यात असफल राहिले आहेत.

‘हल्लाबोल’ समान विचारधारा आणि विचारांच्या लोकांना आपसात आपले विचार आदान-प्रदान करण्याचे, एकमेकांना मदत करण्यासाठी आणि समाजावर प्रभाव पाडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये एकमेकांना समर्थन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते. ‘हल्लाबोल’च्या संकेतस्थळावर आपले खाते सुरू करून तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या सामाजिक उद्यमीं आणि कार्यकर्त्यांपर्यंत सहजपणाने पोहोचता येते किंवा त्यांच्यापैकीच एक बनू शकता. या ब्लॉगवर आपले विचार लिहिणे, अभियान सुरु करणे, याचिका किंवा खटल्यांची सुरुवात करणे, किंवा त्यासाठी स्वाक्ष-या करणे, प्रतिज्ञा घेणे किंवा एखादा कार्यक्रम आयोजित करणे अशा संधी मिळवून देतो. याबरोबरच आतातर एक धर्मादाय प्रोफाईल तयार करण्याची अनुमतीही देतो. या प्रोफाईलच्या मदतीने तुम्हाला उपलब्ध रोजगाराची माहिती घेणे-देणे याशिवाय स्वयंसेवकांना आपल्याशी जोडण्यात किंवा आपल्या योजनांसाठी दानाच्या माध्यमातून निधी संकलन करण्यासाठी करता येऊ शकतो.

अलीकडेच ‘हल्लाबोल’चे संस्थापक अंकूर गुप्ता यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी या उपक्रमाची त्यांनी विस्ताराने माहिती दिली. याशिवाय भविष्यात समाजात परिवर्तन आणण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना सल्ला देखील दिला आहे.

अंकूर गुप्ता

अंकूर गुप्ता


योर स्टोरी: ‘हल्लाबोल’ ची सुरूवात करण्याचा विचार आपल्या मनात केंव्हा आणि कसा आला? आणि आपली टँगलाईन ‘बदलाची सुरुवात करा’ च्या मागची कहाणी काय आहे?

अंकूर गुप्ता: प्रत्येकवेळी जेंव्हा कुणीही मला ‘हल्लबोल’च्या प्रारंभाबाबत विचारणा करतात, तेंव्हा ते मला माझ्या या प्रवासाला पुन्हा जीवंत करतात आणि या उद्योगातील माझ्या आत्मविश्वासाला प्रोत्साहित करतात. मला सन २००९मध्ये जे जाणवले तशीच मनोदशा सध्याच्या काळात अधिकांश भारतीयांची देखील झाली आहे. सारे जगच खूप अडचणीच्या आणि आव्हानांच्या कालखंडातून चालले आहे. प्रत्येकजण या वातावरणात शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी स्वत:चे काही ना काही प्रयत्न करीत आहे, यात आपले योगदान देण्याची त्यांची धडपड आहे. काही लोक हे कार्य वेगवेगळ्या समूहसंपर्क माध्यमातून (सोशल साईटस्) आपले विचार मांडून करीत आहेत. काहीजण इंडियागेटवर धरणे धरुन, आंदोलने करुन, काहीजण आपल्या घरात छोट्या-मोठ्या पुजा-पाठांच्या माध्यमातून. पण शेवटी एकच गोष्ट अशी आहे की, जी या सर्वाना एकमेकांशी जोडते ती म्हणजे काहीतरी योगदान देण्याची इच्छा! आणि बदल करण्यासाठी काहीतरी करावे अशी हिंमत. प्रत्येक व्यक्ती आपल्या वतीने कसे योगदान करता येईल याचे मार्ग शोधत असते. मग तो लहान असो किंवा मोठा, मागे वळून पाहिले तर वर्ष २००९ मध्ये मी देखील अश्याच मनोस्थितीतून गेलो होतो. मला त्यावेळी समाजाचे काही देणे द्यावे अशी तीव्र इच्छा होती.त्यासाठी सामाजिक स्थितीचा एक हिस्सा होऊ इच्छित होतो. परंतू मी असे करण्यासाठी मला त्यावेळी योग्य व्यासपीठाचा शोध घ्यायचा होता. आणि आपल्या जीवनातील शून्य भरण्यासाठी ‘हल्लाबोल’ च्या स्थापनेला मूर्त स्वरुप मिळाले आणि मला बदल घडवण्याची एक संधी!

मी पाहिले की, भारत इतक्या सगळ्या छोट्या-छोट्या प्रश्नांशी लढतो आहे, अश्यावेळी माझ्याकडे असा योग्य मार्ग नव्हता ज्याचा मी भाग बनावे आणि आपले योगदान द्यावे. मी स्वत:ला आणि माझ्यासारख्या इतर लोकांना योगदान देता यावे यासाठी काहीतरी साधन देऊ इच्छित होतो. एक असे साधन जे आमच्या आजच्या जीवन आणि पर्यायांना दाखवू शकेल. एक असे साधन जे उदारता आणि सामाजिक परिवर्तन यांच्या भाषेला एक नवे रुप देत त्यांना उपोषण, गलिच्छ वस्त्यात काम करणे, दान-पुण्य करण्याकडे घेऊन जाईल. आणि आमच्या सीमा तसेच शक्तीचे आकलन होण्यास मदत करेल ज्यामुळे आम्ही सामजिक आंदोलनांचा भाग बनून अधिक चांगले मार्ग शोधून काढू.

प्रश्नाच्या दुस-या भागाच्या उत्तरात मला सांगायचे आहे की, ‘हल्लाबोल’ बदलांच्या दिशेने पुढे जाण्यास प्रेरित करते. एक अशी संधी जी तुम्हाला खडबडून जागे करील आणि ताजेतवाने करुन थेट मैदानात उडी घेण्यासाठी प्रेरीत करते. मी कोणी दार्शनिक नाही परंतू तरीही मी या सरळ शब्दांवर विश्वास ठेवतो की, आम्हाला जो बदल हवा आहे तो आणण्याचे माध्यमही फक्त आम्ही स्वत:च असू शकतो. आणि जर आमच्यात प्रत्येकजण बदलांची सुरूवात करेल आणि फक्त एका बदलाची निवड करेल तर आम्ही सारे मिळून खूप मोठा बदल आणण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

योर स्टोरी: आपणांस आतापर्यंत वापरकर्त्यांकडून कसा प्रतिसाद मिळाला? त्यांनी आपली महत्वाकांक्षा व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक बदलाचा प्रयत्न करताना आपल्या व्यासपीठाचा कसा वापर केला?

अंकूर: आम्हाला कार्य सुरू करणे आणि त्याला संचालित करणे यात येणा-या स्वत:च्या अडचणी होत्या. त्यांच्याशी आम्ही निर्धाराने सामना करत होतो. त्यातून बरेच काही शिकून स्वत:ला मजबूत बनविण्यात सफल झालो. कोणत्याही प्रामाणिक कामात सुरुवातीला प्रतिसाद मिळण्यास वेळ हा लागतोच. आणि विशेषत: यामुळेच कारण आम्ही आमच्या कामाला एका अश्यावेळी मूर्त स्वरुप देत आहोत ज्यावेळी सामाजिक परिवर्तनासाठी इतर काही लोकही आमच्या सारखेच मंचाचा उपयोग करून घेत आहेत. जो एक चांगला संकेत आहे. अश्यात आम्ही ज्या कामाला हाती घेतले आहे ते फार मोठे कार्य आहे आणि त्यासाठी आणखी काही हात पुढे आले तर हे काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकते. मी ‘हल्लाबोल’ला मिळालेल्या प्रतिसादाला चांगला किंवा वाईट अश्या वर्गवारीत विभागणार नाही, पण मी त्याला एका सातत्याने करायच्या प्रक्रियेची उपमा देईन आणि हेच आमचे सर्वात मोठे इनाम असेल.

आमच्याकरीता तेच रास्त असेल की ते लोक (कर्मचारी, स्वयंसेवक, मित्र, पोर्टलवर येणारे अनामिक, मत निर्माते, स्वयंसेवी संस्था इत्यादी.) जे आमच्या सोबत २६ जानेवारी २०१२ रोजीच्या औपचारिक ‘हल्लाबोल’च्या सुरुवातीपासून साथ देत आहेत, आजही आमच्यासोबत आहेत, हीच आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. जसे की मी आधी सांगितले आमच्यात प्रत्येकाला आपल्या महत्वाकांक्षा, दु:ख, निराशा, रचनात्मकता आणि अन्य भावनाना व्यक्त करण्यासाठी एका मंचाची गरज होती. आणि ‘हल्लाबोल’ असे करण्यात यशस्वी होतो. लोक आमच्या पोर्टलवर येतात आणि आमच्याशी संपर्क करण्याव्यतिरिक्त एकमेकांशी चर्चा देखील करतात. ते या ठिकाणी आपल्या कहाण्या, अनुभव, दु:ख, यश,अपयश यांच्यासह बरेच काही वाटून घेतात. लोकांकडून सातत्याने मिळणा-या प्रतिक्रिया हीच आमच्यासाठी मोठी प्रतिक्रिया आहे. आम्ही लोकांसाठी प्रेरणास्त्रोत असलेले व्यासपीठ असल्याचा अभिमान वाटतो.

मी आपल्याला काही उदाहरणाच्या माध्यमातून समाजावून सांगू शकतो. सर्वात प्रथम आमचा यशस्वी प्रयत्न, तेजाब हल्ल्याची शिकार झालेल्या व्यक्तीची याचिका होती, ज्यात सा-या देशभरातून लोकांनी आमच्या कामाला समर्थन देण्यासाठी हात पुढे केले. झारखंडच्या सोनाली मुखर्जी यांच्यासाठी ‘हल्लाबोल’च्या याचिकेला जगभरातील सुमारे ५७००लोकांच्या स्वाक्षरी मिळवण्यात यश आले. त्याशिवाय त्यांना १५००पेक्षा जास्त सदस्यांकडून मिलर आणि विशबैरिडाइटन यांच्या सहयोगातून एक चांगली रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळाली. ‘हल्लाबोल’ दूरचित्रवाणीवर त्यांच्या विडिओला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. त्यानंतर लगेचच सोनाली मिडियाच्या व्यापक कवरेज आणि स्टार प्लस वर येणा-या प्रसिध्द कार्यक्रम केबीसी मध्ये उपस्थितीमुळे खूप प्रसिध्द झाली. दसरा दिवाळीच्या सणांच्या काहीकाळ आधी एका एनजीओने आम्हाला हरित दिपावली अभियानाबाबत संपर्क केला. ज्या मध्ये घेतल्या जाणा-या प्रत्येक प्रतिज्ञासाठी दहा रुपये मिळणार होते. ज्यांचा उपयोग वंचित वर्गातील लोकांना सौरऊर्जा देण्याच्या कामात केला जाणार होता. हे अभियान खूपव प्रभावी पध्दतीने तेरा हजार रुपयांचे योगदान देण्यात यशस्वी झाले.

सध्या ‘हल्लाबोल’सक्रिय पध्दतीने दोन याचिका चालवतो आहे, आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात लोकांचे समर्थन मिळते आहे. यामध्ये पहिली तेजाब हल्ल्यातील शिकार झालेल्यांना न्याय देण्यासाठी आहे तर दुसरी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी ‘असे प्रकार थांबवा’ असा प्रयत्न आहे.

योर स्टोरी: आपल्या मताने सध्याच्या काळात सामजिक कार्यातील लोकांसमोर सर्वात मोठी आव्हाने काय आहेत? आपल्या मतानुसार एका अश्या जगाच्या निर्मितीसाठी प्रत्येकजण माध्यम बनू शकतो तर ते माध्यम काय असू शकेल?

अंकूर: प्रामाणिकपणाने, मी कोणत्याही आव्हानाबाबत विचारही करु शकत नाही. जेंव्हा आपण एखाद्या रस्त्यावर निघतो तेंव्हा रस्त्यात येणा-या अडचणी कुणाला मंद चालण्यास बाध्य करतात तर काहींसाठी रस्ता सुकर करून देतात त्यामुळे ते वेगाने पुढे निघून जातात. सामाजिक उद्यमींनाही रस्त्यात येणा-या बाधांशी दोन हात करावे लागतात.

माझ्यासमोर जवळपास दररोज कोणता ना कोणता असा क्षण असतो जो मला पुढे जात राहण्यासाठी प्रेरित करत राहतो. जेंव्हा कुणी तरूण व्यावसायिक माझ्या कार्यालयात येतो आणि या चमूचा भाग होण्याची इच्छा व्यक्त करतो तेंव्हा मलाही प्रेरणा देतो. वास्तविक आता व्यावसायिक देखील सामाजिक क्षेत्राला रोजगारांच्या संधीत पाहण्याच्या प्रयत्नात आहेत. हे वास्तव आहे की ते देशाला एकावेळी जेसिका लाल आणि आरुषी तलवारच्या प्रकरणात हात मिळवून उभे करण्यात सफल राहिले होते. आज एका २३वर्षाच्या युवतीसाठी पुढे येतो आहे. आणि हे पाहणे खूपच सुखद आहे. आपल्या फेसबूकच्या प्रोफाईल छायाचित्राला ‘काळ्याडागा’त परिवर्तीत करणे बदलासोबतच जागृती आणि वाढती संवेदनशिलता यांचे प्रतिक आहे. आम्हाला आमच्या झोपेतून जागे होण्यासाठी कोणत्याही घटना होण्याची वाट पहात बसायचे नाही.तर आम्हाला पहिल्यापासूनच त्याबाबत काळजी घ्यायची आहे. काय हे सारे प्रेरणास्त्रोत आणि बदल नाहीत का?