'सुरखपूर' दिल्लीतील पहिले डिजीटल गाव

'सुरखपूर' दिल्लीतील पहिले डिजीटल गाव

Tuesday February 21, 2017,

2 min Read

सुरखपूर दक्षिण-पश्चिम दिल्लीतील गाव, देशाच्या राजधानीमधील पहिले डिजीटल पेमेंट करणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहिती नुसार या गावातील सर्व ११३ घरात किमान एक तरी आधार संलग्न बँके खाते असून ते मोबाईल फोनशी जोडले गेले आहे. त्यामुळे हे गाव शंभर टक्के डिजीटल गाव झाले आहे. दिल्लीत एका कार्यक्रमात उपविभागीय जिल्हाधिकारी (नजफगड) अंजली शेरावत यांनी ही घोषणा केली. त्या म्हणाल्या की, लोकांना माहिती देण्यात आली आहे की,आधारपत्राशी त्यांचे बँक खाते जोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना त्यातून त्वरीत कँशलस व्यवहार करता येतील. त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मोबाईलचा वापर करता येणार आहे.


Source: Shutterstock

Source: Shutterstock


याबाबतच्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील अधिका-यांनी एलइडी स्क्रिनच्या माध्यमातून निती आयोगाच्या कँशलेस अभियानाची माहिती दिली आणि लोकशिक्षण केले आहे. शेरावत यांनी अधिकृत घोषणापत्रात नमूद केले आहे की, पीओएस मशिन दोन किराणा दुकानात लावण्यात आली असून डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या मदतीने तेथे व्यवहार सुरु आहेत. दारोदार सर्वेक्षणातून अभियान घेवून राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी बँकिंग बाबत लोकशिक्षण केले आहे. लोकांना माबईल वॉलेट बद्दल माहिती देण्यात आली आहे. युएसएसडी, तसेच भिम ऍप्लिकेशन बाबतही अवगत केल आहे. त्यामुळे सहजपणे डिजीटल व्यवहार शक्य अहेत. लोकांना छोटे व्यवहार त्यामुळेच करणे शक्य झाले आहे.

सुरखपूर हे काही देशातील पहिलेच असे गाव नाही यापूर्वी अकोदरा हे अहमदाबाद गुजरात जवळच्या साबरकाठा जिल्ह्यातील गांवही डिजीटल झाले आहे. यागावात कोणत्याही गोंधळाशिवाय व्यवहार सुरु झाले आहेत आणि देशातील नोटबंदीच्या वातावरणातही या गावात सुरळीत व्यवहार सुरु होते. आता कोणतेही दुकान आणि व्यक्ती रोख व्यवहार करत नाहीत. अकोदरा मध्ये सारे काही नेटबँकीगने होते. अगदी मजूरी देण्यापासून ते दुध भाज्या खरेदी पर्यंत सारे काही मोबाईलव्दारे पैसे अदा करतात.