हस्तनिर्मित, पुनर्वापरायोग्य आणि महिलांना सक्षम बनविणा-या ‘चिंधी’!

1

जशा काही छान गोष्टी जुळून येतात तसेच चिंधी हा वेळ घालविण्याच्या उद्देशाने तयार झालेला प्रकल्प तनुश्री शुक्ला यांच्या मुक्तीच्या संकल्पनेतून साकारला. शिवणकामाची आवड असलेल्या मैत्रिणीसोबत या दोघींनी लहान सहान वस्तू टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून करण्यास सुरुवात केली. तनुश्री यांच्या कुटूंबाच्या कपडे शिवण्याच्या व्यवसायातील वाया जाणा-या चिंधी पासून या वस्तू बनविण्यास सुरुवात झाली. तेथे टनावारी कपड्यांचे तुकडे निघत त्यांना टेलर चिंधी म्हणत असत. त्या रोज तयार होत असत आणि बहुतेकवेळा हा वाया जाणारा कपडा कच-यात जात असे. तनुश्री यांनी अशा चिंधी पासून तयार केलेल्या वस्तूंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आणि त्यातून एक वेगळी चळवळ निर्माण झाली. मुंबईच्या मानखुर्द येथील झोपडपट्टीतून चिंधीचे काम वर्ष दीड वर्षापूर्वी सुरु झाले आणि तिचा विस्तार आज हस्तनिर्मित वस्तू आणि टाकाऊमधून टिकाऊ वस्तू तयार करणारा उद्योग असा झाला आहे. तनुश्री देखील हे मान्य करतात की त्यांच्या सारख्या उद्योगाला टाकाऊ पासून टिकाऊ सुंदर वस्तू तयार करण्याच्या व्यवसायात चांगले भवितव्य आहे. त्यातूंन संघटनात्मक चांगले काम उभे राहू शकते मात्र आम्ही त्यापासून खूप दूर असतो. स्लो टेक सोबत झालेल्या चर्चेतून तनूश्री यांनी सांगितले की, महिलांच्या छोट्या गटाने किती मोठे काम करून दाखवले आहे. त्यांच्या संकल्पना आणि सामुहिक निर्मितीच्या प्रयत्नांची ही कहाणी आहे.


उजवीकडे तनुश्री शुक्ला मानखुर्द येथे
उजवीकडे तनुश्री शुक्ला मानखुर्द येथे

मानखुर्द येथील महिलांच्या संपर्कात कशा आलात आणि हा व्यवसाय कसा सुरु झाला यावर आम्हाला काही सांगा.

कारखान्यात शिलाई यंत्रावर काम करणारी एक महिला हस्तकला करत होती. ती मानखुर्द येथील झोपडपट्टीत राहात होती. एक दिवस तिने मला कपड्यासोबत कापाकापी आणि जोडा जोडी करताना पाहीले आणि तिने सांगितले की तिलाही हे काम येते तसेच तिच्या शेजारी असलेल्या अनेक जणी ते करु शकतात. तिने तिच्या भागात मला चहाला बोलाविले आणि त्यांनी मला दाखविले की त्या चिंधी कपड्यापासून कशा प्रकारच्या वस्तू तयार करु शकतात. त्यात स्वेटर, टोप्या,  गोधड्या अशा वस्तू होत्या. या महिला उत्तर भारतातून आलेल्या होत्या आणि त्यांना शिवणकाम हस्तकाम माहिती होते. मात्र त्यांना या शहरात त्यांच्या कलेला कोणताही वाव नसल्याचे दिसत होते, त्यामुळे त्यांचे कौशल्य वाया जात होते. त्यामुळे नाईलाज म्हणून अनेकजणी त्यांच्या जुन्या कपड्याच्या गोधड्या करुन घरातच वापरत होत्या. त्यांची राहणी देखील चिंधीच होती! आम्ही त्यातुन काही जणींना निवडले आणि आमच्या वाया जाणा-या चिंधी कपड्यापासून हस्तकला निर्मित वस्तू तयार करण्याचा उद्योग सुरु केला.

तुमच्या सोबत किती महिला काम करत आहेत? त्यांच्याशी तुमचे दैंनदिन व्यवहार कसे आहेत? त्या घरीच काम करतात का? किवा एका जागी येवून काम करतात?

आमच्या हस्तकलाकार मानखुर्दच्या झोपड्यात राहतात, आम्ही चार महिलांची मुख्य चमू तयार करतो गरज लागेल तशी आम्ही इतर महिलांची मदत घेतो. जवळच आमची मध्यवर्ती जागा आहे, त्यांच्यापैकी बहुतेकजणींना घरातून बाहेर कामासाठी जाण्याची अनुमती नसते. जरी त्या चिंधीचे काम करत असतील तरी त्या घरातून फावल्यावेळात काम करतात. जवळच्या केंद्रात त्यांना संकल्पना, कल्पना यांची आदान प्रदान करता येते त्यातून नवीन वस्तू आणि नक्षीकाम केले जाते. त्या तेथून तुकडे घेवून जातात आणि घरातून त्या तयार करून घेवून येतात.


टीम चिंधी
टीम चिंधी

त्यांना प्रशिक्षण आणि डिझाईन तुम्ही कसे देता? तुम्ही सर्वात आधी काय तयार करायला सुरुवात केली?

आमच्या डिझाइन आणि प्रशिक्षणाचे धोरण त्यांचे कौशल्य पाहून पहिल्यांदा ठरविले जाते ते सारखे असते. पध्दत आणि उत्पादन पाहून त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यात त्यांना बदल सांगतो. त्यात गोधड्या आहेत ज्या महिलाच तयार करतात. कारण पहिल्या पासून महिला त्यांच्या जुन्या कपड्यापासून त्या तयार करत होत्या मात्र आम्ही त्यात विविधता आणि नक्षीकामाची भर घातली. आमच्या सा-या वस्तू त्यांच्याच संकल्पानतून तयार होत असतात त्यांच्या जीवनशैलीतून त्या येतात ज्यात वाया जाणा-या गोष्टी फारच कमी असतात.

हे केंव्हा पासून सुरु आहे? तुम्हाला यातून वाटते का की महिला चांगले जीवन जगू शकतात? तुम्ही पूर्ण वेळ काम करु शकता का? तुमचे काय विचार आहेत?

आम्ही या महिलांसोबत वर्ष दीड वर्षापासून काम करत आहोत. त्या कुटूंबासारख्या झाल्या आहेत. यासाठी आम्ही सुरुवातीला सा-या व्यवस्था केल्या, नमूने तयार केले, शिलाई काम केले, निराशा झाली, कुचंबणा सहन केली, आणि एकत्र राहून यश सुध्दा मिळवले. हा खूप वेगळा अनुभव होता.आमच्या सोबत काम करणा-या महिलांनी अशा प्रकारे कमाई देणारे काम कधीच केले नव्हते, मात्र ब-याच जणींना आता शिवणकलेचे शिक्षण घ्यावे असे वाटू लागले आहे, त्यातून घरात बसून त्यांना काम करता येते. हा त्यांच्यासाठी खूप काही केल्याची जाणिव देणारा व्यवसाय आहे. त्या कायम अर्धवेळ कामगार म्हणून काम करु शकतात. कारण त्यांना त्यांचे कुटूंब आणि घरच्या जबाबदा-या यांना महत्वाचे स्थान द्यायचे असते, त्यात व्यवधान येणार नाही याची काळजी घेवून त्या चार पैसे कमविण्याचा हा उद्योग करतात. चिंध्या बांधणे हा आनंददायक प्रकार असतो, पहिले वर्ष प्रयोग करण्यात आणि चुका करून दुरुस्त करण्यात गेले. त्यामुळे मला वाटते की, आता ती वेळ आली आहे ज्यात आम्ही निश्चीत दिशा घेवून प्रगती करू. आमच्या उत्पादनाची संकल्पना आता तयार झाली आहे, आमच्या डिझाईन्सची परिभाषा तयार झाली आहे, आणि आमचे अपेक्षित ग्राहकसुध्दा. त्यामुळे मला वाटते की, येणा-या काळात आम्ही आमच्या महिलाच्या मुख्य चमू मध्ये आणखी जास्त महिलांना सामावून घेवू शकतो त्यातून आमचा प्रभाव वाढणार आहे.

यांत्रिक पध्दतीने तयार केल्या जाण-या मोठ्या उत्पादनांशी किमतीची स्पर्धा करणे तुम्हाला शक्य होणार नाही, त्यामुळे त्यात कुठे भवितव्य आहे असे तुम्हाला वाटते? तुमचे म्हणणे काय आहे?

भवितव्य हस्त निर्मितीला आहे आणि टाकाऊतून टीकाऊलाच! ‘मी नेहमीच सांगते की चिंधीचे सर्वात मोठे यश आपल्या एकत्रीत काम करण्याला आहे. भविष्यात घर सजावट, ब्रँण्डस्, घरातील नक्षीकाम सारे काही टाकाऊतून टिकाऊचे असेल, लोकांना त्यांच्या जवळच्या टाकाऊ वस्तू पुन्हा वापरण्याजोग्या व्हाव्यात अशा कराव्या लागतील त्यावेळी आमच्या सारख्या संस्थाच कामी येतील!आम्ही नेहमी पाहतो की उद्योग जगत त्या दिशेने जाते आहे, आणि ते पाहून आमचा उत्साह वाढतो.’

असे मानले जाते की हस्त निर्मित  आणि यंत्र निर्मित वस्तूंना त्यांची त्यांची जागा असते, मला नाही वाटते की त्यांच्यात काही स्पर्धा असेल ती असूच शकत नाही किमतीच्या बाबत तर नाहीच, वस्तू तयार करण्याच्या वेळेबाबतही नाही, पुरवठा करण्याची क्षमता या बाबतही.आमची एक वस्तू तयार होण्यास कित्येकदा काही दिवस किंवा सप्ताह लागतात, आम्ही मागणी नुसार आमच्या प्रत्येक सदस्याला पैसे देतो, आमचा कच्चा माल हा नगण्य असा भाग आहे, आमची नक्षीकाम करण्याची पध्दत मागास आहे, त्यामुळे आमच्याकडे ज्या प्रकारचा कच्चा माल असेल तसे काम आम्हाला करावे लागते. त्यामुळे इतरांशी तुलनाच करता येणार नाही आम्हाला तसा पर्यायच राहात नाही. त्यामुळे बहुतांश वेळ आमच्या वस्तू तयार करण्यात आणि ब्रँण्ड तयार करण्यात जातो. परंतू दुसरीकडे, आमचे खर्च देखील कमी असतात. कारण काम करायला काही सुया लागतात आणि धागे त्यात साधेपणा आणि प्रामणिक प्रयत्न असतात. मला वाटते की, ग्राहकांनाही हा फरक समजतो, त्यामुळे ते योग्य मुल्यमापन करतात. आम्ही मोठ्या उत्पादक आणि किमतीशी स्पर्धा करत नाही. मात्र आम्ही त्यांच्या दर्जा आणि नक्षीकामाशी नक्कीच स्पर्धा करतो. ग्राहक नेहमीच पैसे त्यावर खर्च करतात ज्यात त्यांना समाधान मिळते, त्यांच्यासाठी आमच्या वस्तू खरेदी करणे म्हणजे वेळ आणि पैसा वाया जाणे कधीच नसते, कधीचे नसेल. जेव्हा ते पिशवी खरेदी करतात त्यातून ते समाजाच्या त्या घटकाला पाठिंबा देतात जो मेहनत करून कौशल्यातून त्यांना ती बनवून देत असतो. टाकाऊ वस्तू पासून ते तयार केले असते. त्यामुळे आम्ही आमच्या वस्तूंच्या उपयोगिता आणि नक्षीकाम यावर लक्ष देतो. त्यातून आमचा वेगळा हक्क तयार होतो.

येथे मोठे आव्हान आहे ते प्रमाणाचे—आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार  करुन ते दररोज बाजारात आणू शकत नाही.? होय आम्ही तेही करु शकतो. पण आमचे ते लक्ष्य आहे का? नाही मुळीच नाही. मला प्रमाणाबाबत विचार करताना त्यांच्या खोलीबाबत विचार करायला योग्य वाटते त्यांच्या संख्याबाबत नाही. आम्ही काही निवडक डिझाइन्स तयार करतो, नेमक्या पण दर्जेदार ज्या आमचे ग्राहक प्रेमाने घेतात आणि वापरतात. आमच्या महिलांना रास्त भाव मिळतो, त्याशिवाय त्यांना काहीतरी काम केल्याचे समाधान मिळते. त्यामुळे त्यात खोलवर समाधान आहे. हे तेच आहे जे आमचे लक्ष्य.

सध्या चिंधी काय करते आहे? भविष्यातील योजना काय आहेत?

आम्ही एका लहान डिझाइन उद्योगासोबत जोडलो गेलो आहोत, त्यातुन तुकडे जोडून नक्षीकाम करण्याचे काम केले जाते. वर्षभराच्या प्रयोगानंतर आम्ही आमच्या उत्पादनांच्या वेगवेगळ्या वर्गवारी करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातून आमचा ब्रँण्ड विस्तारीत करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या धिम्या लयीकडे आम्ही आमचे सामर्थ्य म्हणून पाहतो, त्यामुळे एक वस्तू तयार करण्यासाठी आम्ही आमचा वेळ घेतो. हस्तकला निर्मिती करणा-या महिलांना संगठीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्यातून काही टेलर्स सोबत काम सुरु झाले आहे, त्यातून उत्पादनाचा विस्तार शक्य आहे. तसेच वाया जाणा-या वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे, समाजातील त्या महिलांच्या उत्पन्नात भर घालून त्यांना समाजात उभे करण्याचे काम सुरु आहे

Website: Chindi

लेखक : जुबीन मेहता