युवर स्टोरी : मोबाइल स्पार्क २०१६

0

भारतात मोबाईल धारकांची संख्या लक्षणीय आहे. अलिकडे मोबाईलचा सर्वत्र होणारा वापर थक्क करणारा आहे, मात्र या वापराचे प्रमाण सामान्य स्वरूपाचे असताना पासूनच किवा मोबाइल तांत्रिकदृष्ट्या दृष्ट्या अधिकाधिक विकसित होण्यापूर्वीच युवर स्टोरी, ‘मोबाईल स्पार्क’ च्या माध्यमातून या क्षेत्रातील उद्भवणाऱ्या समस्या आणि उपयुक्त संशोधन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढे सरसावली. 

मोबाईल स्पार्क सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून या क्षेत्रात नव्याने काहीतरी संशोधन करू पाहणाऱ्या कंपन्यांसाठी हे व्यासपीठ निश्चितच उपयुक्त ठरताना दिसत आहे.

यावर्षी, आम्ही अॅप सारख्या संकल्पनेच्या पुढे जाऊन काय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येऊ शकतात ज्या भविष्यात भारतातील ५०० दशलक्ष ग्राहकांना समाधानकारक, सहजसोप्या, विश्वसनीय सेवा सुविधा उपलब्ध करून देतील या विषयावर या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत.