नऊवर्षाच्या वयातच पारो कशा बनल्या, देशाच्या पहिल्या महिला हॉकर? का मिळाला राष्ट्रीय पुरस्कार ?

1

राजस्थानचे जयपूर शहर जेव्हा सकाळच्या झोपेत विसावलेले रहायचे, तेव्हा नऊ वर्षाची एक मुलगी थंडी, उन्हाळा किंवा पावसाळ्यात सकाळी चार वाजता, आपल्या लहान पायांनी सायकलचे मोठे मोठे पायडल मारून गुलाबबाग केंद्रात पोहोचायची. अरीना खान उर्फ पारो नावाची ही मुलगी येथून वर्तमानपत्र गोळा करायची आणि पुन्हा ती वाटण्यासाठी निघत असत. मागील १५ वर्षांपासून हे अद्यापही सुरु आहे. पारो यांनी तेव्हा हे काम मजबूरीने सुरु केले होते, मात्र आज ही त्यांची ओळख बनली आहे. पारो ज्या लोकांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचविण्याचे काम करायच्या, त्यात जयपूरचे राजघराणे देखील सामील आहे. 

देशातील पहिली महिला हॉकर अरीना खान यांच्या सात बहिणी आणि दोन भाऊ आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांचे वडील सलीम खानच उचलत होते, मात्र टॉयफाइडमुळे पारो यांचे वडील आजारी आणि कमजोर होते आणि कमजोरीमुळे ते सायकल चालवू शकत नव्हते. तेव्हा अरीना आपल्या वडिलांची मदत करण्यासाठी त्यांच्या सोबत जाऊ लागल्या. त्या आपल्या वडिलांच्या सायकलला धक्का मारत असत आणि घराघरात पेपर वाटण्यात त्यांची मदत करायच्या. आता घर चालायला सुरुवातच झाली होती, तेवढ्यात अचानक एक दिवशी अरीना आणि त्यांच्या कुटुंबावर संकटे आली. त्यांचे वडील सलीम खान यांचे आजारपणामुळे निधन झाले. अशातच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पारो यांच्यावर आली, कारण त्या आपल्या वडिलांसोबत पेपर वाटण्याचे काम करायच्या आणि त्यांना माहित होते की, कोणत्या घरात पेपर टाकायचा आहे. त्यावेळी नऊ वर्षांची मुलगी आपल्या भावासोबत सकाळी पाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत पेपर वाटण्याचे काम करू लागली. 

अरीना यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “तेव्हा मला पेपर वाटण्याचे काम सात किलोमीटरच्या क्षेत्रात करावे लागायचे. त्यात रुंद रस्ता, सिटी पँलेस, चौड पूल, दिलीप चौक, जौहरी बाजार आणि तीलपोलीया बाजारातील भाग सामील होते. तेव्हा मी जवळपास १००घरात पेपर वाटण्याचे काम करायची.”

सुरुवातील अरीना यांना हे काम करण्यास खूप समस्या येत होत्या, कारण नऊ वर्षांची ती मुलगी अनेकदा रस्ते विसरायची. सोबतच ती हेही विसरायची की, कुठल्या घरात पेपर टाकायचा आहे. लहान मुलगी असल्यामुळे लोक जेव्हा पारो यांना सहानुभूतीच्या नजरेने पहायचे, तेव्हा त्यांना वाईट वाटत होते. 

संकटाच्या वेळी कमी लोकच मदत करतात, अरीना यांची मदत देखील काही निवडक लोकांनी केली, जे त्यांच्या वडीलांना ओळखत होते. त्यामुळे आता अरीना सकाळी वर्तमानपत्र घेण्यासाठी जायच्या. तेव्हा त्यांना रांगेत उभे रहावे लागत नसे. त्यांना सर्वात पहिले वर्तमानपत्र मिळून जात होते. मात्र त्यांनतर सुरु व्हायची खरी समस्या. कारण पेपर वाटल्यानंतरच त्या शाळेत जायच्या. अशातच अनेकदा त्या शाळेत उशिरा जायच्या आणि एक दोन वर्ग पूर्ण होत होते. यामुळे त्यांना प्राध्यापकांकडून ओरडा खावा लागायचा. तेव्हा अरीना खान ५व्या वर्गात शिकायच्या. एक दोन वर्ष असेच निघून गेल्यानंतर एक दिवशी शाळेतल्या लोकांनी त्यांचे नाव काढून टाकले. ज्यानंतर अरीना एक वर्षापर्यंत स्वतःसाठी नवी शाळा शोधू लागल्या. कारण त्यांना एक अशी शाळा हवी होती, जी त्यांना उशिरा येण्याची परवानगी देईल. तेव्हा रहमानी मॉडल सिनियर स्कूलने त्यांना स्वतःकडे दाखला दिला. याप्रकारे पेपर वाटल्यानंतर १वाजेपर्यंत त्या शाळेत राहायच्या. 

शाळेत जर एखादा तास सुटून गेला, तर अरीना यांना स्वतःच त्याचा अभ्यास करावा लागायचा. अशाच प्रकारे अनेक समस्यांनंतर जेव्हा त्या ९वीच्या वर्गात पोहोचल्या, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्यासमोर आपल्या आणि स्वतःच्या लहान बहिणीच्या शिक्षणाला कायम ठेवण्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. घरातील आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की, काही केल्याशिवाय आपले शिक्षण त्या पुढे सुरु ठेवू शकतील. अशातच अरीना यांनी आपल्या घराजवळ असलेल्या नर्सिंग होममध्ये पार्ट टाइम परिचारिकेची नोकरी केली. हे काम त्या संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत करायच्या. अरीना सांगतात की, “त्या दरम्यान जेव्हा मी मोठी होत होती, तेव्हा अनेक मुले मला बघून मस्करी करायचे, जेव्हा प्रकरण थोडे वाढायचे, तर अनेकदा मी त्यांना ओरडायची आणि तेव्हा देखील त्यांनी ऐकले नाही तर मी त्यांना मारत देखील होती.” 


एकीकडे पारो यांनी पेपर वाटण्याचे काम सुरु ठेवले, तर दुसरीकडे आपल्या शिक्षणात देखील बाधा येऊ दिली नाही. संघर्षांचा सामना करताना त्यांनी १२वीचे शिक्षण संपवले आणि त्यांनतर आपल्या पदवीचे शिक्षण ‘महाराणी महाविद्यालयातून पूर्ण केले. हळू हळू त्यांनी संगणक चालवायला शिकले आणि आज २४वर्षांची पारो जेथे पहिले सकाळी पेपर टाकायच्या, तेथेच त्यांनतर एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. इतकेच नव्हे, त्या गरीब मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्यांना शिकवितात आणि अनेक संस्थेसोबत मिळून त्यांच्यासाठी काम करतात. अरीना यांची समाजसेवेसाठी असलेली ओढ बघता, त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहे. हेच कारण आहे की, देशातील पहिली महिला हॉकर असण्यासोबतच समाजसेवेसाठी लागलेल्या अरीना यांना राष्ट्रपती यांनी देखील सन्मानित केले. अरीना सांगतात की, “जेव्हा मला समजले की, राष्ट्रपती मला पुरस्कार देऊन गौरविणार आहेत, तेव्हा मला इतका आनंद झाला की मी ते शब्दात सांगू शकत नाही, मी जणू हवेत उडत होती.” 

अरीना यांना आज समाजात खूप सम्मान मिळत आहे, जे कालपर्यंत त्यांच्यावर टीका करायचे, तेच लोक आज आपल्या मुलांना त्यांचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की, आज जेव्हा त्या कुठे जातात तेव्हा लोक त्यांना ओळखतात आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. त्यांच्या मते, ज्या कामाला त्यांनी आपल्या विवशतेने सुरु केले होते, ते काम आज त्यांची ओळख बनली आहे. आपल्या या कामाला त्यांनी आजही सुरु ठेवले आहे. त्या सांगतात की, "कुठलेही काम मोठे किंवा लहान नसते, मुली प्रत्येक काम मुलांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकतात.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

लहानपणी आईसोबत रस्त्यांवर बांगड्या विकणारा कसा बनला आयएएस अधिकारी...

वीटभट्टीवर मजुरी करून ‘मिस्टर दिल्ली’ चा पुरस्कार पटकावणा-या ‘विजय’ यांच्या संघर्षाची यशोगाथा  

सर्व अडचणींवर मात करत अंध सिद्धूची कमाल, ९९ कोटीपर्यंत पाढे तोंडपाठ, आता तयारी आयएएसची...

लेखक : गीता बिश्त
अनुवाद : किशोर आपटे