पोट भरण्यापासून ते पैसे कमवण्यापर्यंत चित्रकला: रचना प्रभूच्या यशाची कहाणी

पोट भरण्यापासून ते पैसे कमवण्यापर्यंत चित्रकला: रचना प्रभूच्या यशाची   कहाणी

Wednesday December 02, 2015,

6 min Read

"इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने कि कोशिश कि ही, हर झर्रे ने मुझे तुमसे मिलाने कि साजीश कि है." शाहरुख खानच्या एका चित्रपटातल्या या ओळी, तुम्हाला मनापासून आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीविषयी उत्कटता वर्णन करण्यासाठी या ओळींचा वापर केला जातो. ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला सगळं जग मदत करेल.

तुमच्या खऱ्या आयुष्यातही या ओळी लागू होतात आणि रचना प्रभू याचंच एक उदाहरण आहे. रचना प्रभू एक व्यावसायिक आणि 'डुड्ल डू' ची संस्थापिका. ती पेन्सिल हातात धरायला शिकल्या पासूनच चित्र काढते आहे.


image


" मी कधीच चित्रकलेच औपचारिक शिक्षण घेतलं नाही. शाळेत असताना मी माझ्या मित्र मैत्रिणींना चित्र काढून द्यायचे (ते पण कशाचा तरी मोबदल्यात) आणि हो माझ्या वहीतील पानांवर चित्र असायची. अगदी लहान असल्यापासून माझे आई वडील मला प्रोत्साहन देत होते. मी निरनिराळ्या पद्धतीने चित्र काढण्याचा प्रयत्न करत राहिले. अगदी वयाच्या २० व्या वर्षी माझ्या चित्रातून काहीतरी सांगण्याची शैली मला गवसली. ती अतिशय अभिनव होती आणि ती शैली मी अजूनही जोपासली आहे." तिच्या चित्रकलेच्या क्षेत्रातील तिचा प्रवास ती सांगते.

तिचं एक ऑनलाईन शॉप आहे. तिला ग्राहकांशी थेट संवाद साधायलाही आवडतो. यामुळे चित्राच्या विक्री संदर्भात प्रतिसाद तिला मिळतो.


image


महिला या तिच्या चित्रांच्या चाहत्या आहेत. आणि तरुणींना डोळ्यासमोर ठेऊन ती मिश्किलपणे चित्र रेखाटते, हे तिच्या चित्राचं वैशिष्ट्य आहे. " फ्रीज वर लावलेलं एखादं चित्र मिश्किल पद्धतीने सांगतं 'राजकन्या स्वयंपाक बनवत नाहीत.' हे माझं सगळ्यात लोकप्रिय चित्र आहे. पण जर त्याचं वर्गीकरण केलं तर खिशात ठेवण्याचे आरसे हे पण लोकप्रिय आहे." ती हसत हसत सांगते.

कुर्ग मधील ही २९ वर्षांची युवती मैसूर मध्ये आपल्या घरातील चित्रशाळेत (स्टुडिओ) बसून काम करते. तिच्या घरचे केरळ मधील एक बागायतदार होते. त्यामुळे तिचं शालेय शिक्षण उटीच्या बोर्डिंग शाळेत झालं. दोन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं आणि ती मैसूर मध्ये स्थायिक झाली.

रचनाने बिझिनेस मेनेजमेंट या विषयात पदवी घेतली असून बेंगळूरू च्या COMMITS संस्थेतून तिने जन संज्ञापन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.


image


"मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकत होते तेव्हा माझ्या एका प्राध्यापकांनी मला विचारलं कि महाविद्यालयाच्या मासिकासाठी चित्र काढशील का, त्यावेळी अनेक गोष्टी बदलल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चित्रांच्या माध्यमातून बरंच काही करू शकतो."

बेंगळूरूच्या एका जनसंपर्क (PR) संस्थेत तिला नोकरी मिळाली, हीच तिची पहिली नोकरी होती. त्यावेळी ती कोणासही नकळत काही प्रकाशन संस्थांना तिची चित्र इमेल ने पाठवायला सुरवात केली. " मला एका प्रकाशकाकडून उत्तर आलं की मला ज्या पदासाठी काम करायचं आहे असं पद सध्या उपलब्ध नाही, आणि त्यांनतर मी माझ्या पद्धतीने कामाला लागले."

तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलामुळे तिला तिची चित्र डिजिटल माध्यमातून पाठवण्यास सांगण्यात आलं. " सॉफ्टवेअर वापरून चित्र कशी काढायची हे मला माहित नव्हतं, त्यामुळे मी युटूब वर फोटोशोप शिकून घेतलं आणि त्यानंतर रात्री जागून मी चित्र कढायला लागले. त्या वर्षात मी लहान मुलांच्या तीन पुस्तकांना चित्र काढून दिली. त्यांनतर आतापर्यंत मी मागे वळून बघितलंच नाही. इंटरनेटच्या माध्यमातून मी अनेक गोष्टी शिकले पण तरीही काम करत असताना बऱ्याच गोष्टी अवगत झाल्या. पण खूप मोठं काही मिळवलंय असं अजिबात वाटत नाही." असं रचना अभिमानाने सांगते.

रचनाने नोकरी बदलली आणि ती एका कंटेंट किंवा मजकूर संदर्भात काम करणाऱ्या संस्थेत काम करायला लागली. त्यांनतर आयटी कंपनीत कॉर्पोरेट कम्युनिकेशनच कामंही तिने केलं. तिचं चित्र काढण्याचं काम सुरूच होतं. रोज ९ ते ५ नोकरी करून ती चित्र काढून देण्याचं काम करतच होती शिवाय काही मोठी अधिकृत कामंही तिला मिळाली होती. दोन वर्षा पूर्वी पर्यंत ती रात्री जागून आणि साप्ताहिक सुट्ट्यांना ती चित्र काढण्याचं काम करत होती.

तिचं लग्न झालं आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. माझ्या कामासाठी मला सदैव पाठींबा देणाऱ्या माझ्या नवऱ्यामुळे मी अर्धवेळ चित्रकार म्हणून काम करायचे ते आता मी पूर्णवेळ काम करायला लागले. माझं डूडल डू सुरु झालं. डूडल डू सुरु करणे हा माझा सर्वोत्तम निर्णय होता."

रात्री चित्र काढत असताना रचनाच्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे चित्रांच्या प्रिंट काढून ती विकायची. "छोट्या आरशांची कल्पना माझ्या डोक्यात होती. मला आकर्षक असा छोटा आरसा आवडायचा. पण मी जेव्हा दुकानात आरसा विकत घ्यायला जायचे तेव्हा मला पाहिजे तसा आरसा मिळाला नाही. सर्वात पहिल्यांदा मी आकर्षक छोटा आरसा तयार करून तो बाजारात आणण्याच ठरवलं. माझं पाहिलं उत्पादन मी बेंगळूरूच्या जुन्या बाजारात विकण्याचं ठरवलं. कारण नेहमी जुन्या बाजारात जायचे."

जेव्हा रचनाने नोकरी सोडली तेव्हा नक्की काय काम करायचं हे तिला माहित होतं. यातूनच डूडल ची सुरवात झाली. तिने तिचा आवडता छोटा आरसा तयार केला, फ्रीज वर लावायचं लोहचुंबक असलेलं चित्र, डूडल किचन टॉवेल, लेपटॉपचं कव्हर, कुत्र्यापासून सावध रहा च्या पाट्या आणि पाककलेची पुस्तकं ती पण आकर्षक मुखपृष्ठासह. २०१६ ची डेस्क कॅलेंडरही तिने नुकतंच बाजारात आणलं आहे.

सध्या डूडल डू च्या यशामागे एका महिलेचा हात आहे. डूडल चा सगळा व्याप एकटी महिला हाताळत आहे. चित्र काढण्यापासून ते ईमेलन उत्तरं देणं, तसंच ऑनलाईन ऑर्डर घेण्यापासून ते ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या वस्तू त्यांना पोहोचवण्यापर्यंतची सगळी कामं रचना करते. तिला चित्र काढायला एक तास किंवा काही दिवसही लागतात. चित्रात किती कलात्मकता आहे यावर ते अवलंबून आहे. " मी चित्र रेखाटते आणि नंतर फोटोशॉप मध्ये ते पाहिजे तसं सजवते. आणि हे काम मी मोठ्या आवाजात संगीत ऐकत करते." ती सांगते," काही वेळा मला चित्र काढणं सुचत नाही."

हा व्यवसाय सुरु करणं रचनासाठी सोपं नव्हतं. एखादा व्यवसाय कसा सुरु करायचा आणि कसा चालवायचा याची कल्पना नसताना, व्यवसाय सुरु करणं हेच तिच्या समोर मोठं आव्हान होतं. माझ्या चित्रातून काहीतरी व्यक्त होत असतं तरीही ती विकली जातात. "माझ्या उत्पादनांवर मी जी चित्र वापरते ती सामान्य माणसाला आवडतील का असा प्रश्न मला पडतो. पण मी जेव्हा माझ्या वस्तू जुन्या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या तेव्हा माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. माझ्या वस्तूंना ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझं पाहिलं पाऊल योग्य दिशेने पडलं याची खात्री पटली. इंटरनेट हे माझा चांगला मित्र आहे आणि सोशल मिडियाची मी आभारी आहे मुख्यतः फेसबुकचे. माझ्या ऑनलाईन स्टोर ला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो."

" मला असं वाटतं जे कलाकार व्यवसाय सुरु करतात किंवा बाहेरून काम करतात त्यांच्या साठी सुरवातीचा काळ हा संघर्षाचा असतो पण नंतर संघर्ष संपतो आणि तुमच्या आवडीचं काम सुरु होतं. असा माझा अनुभव आहे." असं ती सांगते.

रचनाचा व्यवसायाचा कानमंत्र म्हणजे," तुमचं वेगळेपण नेहमी जपा, यश तुमच्या मागे येईल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या वाटचालीत मिळणारं यश साजरं करा."

आपण स्वतःचेच बॉस असल्याचा तिला फार आनंद होतो. काम आणि सुट्टी या दोन्ही गोष्टीचं संतुलन साधणं थोडं अवघड जातं. या दोन्हीमध्ये एक अंतर राखण्याचं मी हळू हळू शिकत आहे. दिवसा आणि काहीवेळा रात्री काम करणं योग्य आहे." माझ्या कामाला सुरवात केल्यावर काम आणि घर या दोन्ही गोष्टी कशा सांभाळतेस या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर.

रचना तिचं काम अतिशय उत्साहाने आणि मजेत करत आहे. ती या कामामुळे अतिशय आनंदी आणि समाधानी आहे. ती तिच्या योजनांबद्दल सांगते," येत्या काळात काही नवीन उत्पादनं मी बाजारात आणणार आहे. तसंच माझ्या कामात काही बड्या व्यक्ती आणि माझ्या काही ग्राहकांना कामात सहभागी करून घेण्याचा माझा विचार आहे. नवीन वर्षात हे माझ्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे."

तिच्या उत्पादनांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद यामुळे तिला प्रेरणा मिळते. यामुळे तिच्या वाटचालीला आत्मविश्वास मिळतो. ती इतर व्यावसायिकांना सल्ला देते," मला असं वाटतं तुमच्या उत्पादनांना ग्राहक मिळेपर्यंत तुम्ही कष्ट करण्याची, वाट बघण्याची तयारी ठेवा, तुमच्या उत्पादनानाची आवड ग्राहकांमध्ये निर्माण व्हायला आणि तुमच्या ग्राहकांचा तुम्हाला प्रतिसाद आणि पाठींबा मिळायला थोडा वेळ लागेल."


लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : श्रद्धा वार्डे