अंतरात्म्याचा आवाज ऐकून ह्रदयरोग तज्ज्ञ झाले डॉ संजय अग्रवाल त्यांनी सिध्द केले की वेगळ्या वाटेने गेल्यावरच मिळते ओळख!

अंतरात्म्याचा आवाज ऐकून ह्रदयरोग तज्ज्ञ झाले डॉ संजय अग्रवाल त्यांनी सिध्द केले की वेगळ्या वाटेने गेल्यावरच मिळते ओळख!

Thursday June 02, 2016,

7 min Read

माहिती होते की परिस्थिती वेगळी आहे, आव्हाने खूप आहेत. तरीही घेतला मळलेल्या वाटेने न जाण्याचा निर्णय. . .घरचे, बाहेरचे सा-यांनी हिणवले. . . . मात्र निश्चय जो केला होता त्यापासून नाही ढळले. . . .संजय अग्रवाल यानी दोन दशकांपूर्वी निर्माण केली कार्डियाक सर्जन ही आपली वेगऴी ओळख. . . . आपल्या यशातून लोकांना हाच धडा दिला की, काही वेळा मळलेल्या वाटांवर चालून काही काळ बरे वाटेल पण त्या चाकोरीबाहेरच्या मार्गाने गेल्यास कायमची स्वत:ची ओळख बनते. . . . पाच हजार पेक्षा जास्त ह्रदय रोग शस्त्रक्रिया केल्या आहेत डॉ संजय अग्रवाल यांनी . . . . सगळ्यांना हाच सल्ला देतात. ‘तुमच्या मनाचे ऐका’!

डॉ संजय अग्रवाल ते प्रसिध्द नाव आहे ज्यांनी आधीपासूनच चाकोरीबाहेरच्या मार्गाने जाण्याचे ठरवले होते. तो निर्णय धाडसाचा होता. सा-यांनीच विरोध केला. निराश करणा-या गोष्टी सांगितल्या. पण या सा-यांची पर्वा न करता त्यांनी मार्ग निवडला ज्यावर त्यांच्या आधी खूपच कमी लोक गेले होते. रस्ता सोपा नव्हता. पावलो पावली अाव्हाने होती. संकटे आ वासून उभी होती.पण पुढे जाऊन याच मार्गावर त्यांना यश मिळाले. समाजात त्यांचे वेगळे नाव झाले. ते अनेकांचे प्रेरणास्थान झाले. अनेकांनी मग त्यांचे अनुकरण केले ज्या मार्गाने संजय अग्रवाल कधी विरोध सहन करत गेले होते.

image


संजय अग्रवाल यांनी ऐंशीच्या दशकातच कार्डियाक सर्जन होण्याचे ठरवले. हा निर्णय आव्हानात्मक होता पण आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर त्यांनी तो जिकंला. त्यांच्या सारख्या धाडसी लोकांमुळेच आज देशात कार्डियाक सर्जनची फौज तयार झाली आहे. आणि ह्रदय रोगाच्या मोठ्या शस्त्रक्रिया देशातच होत आहेत. संजय अग्रवाल यांच्या सारख्या डॉक्टरांच्या मेहनतीने ह्रदय रोगाचा आता फारसा बाऊ केला जात नाही. भारतात ज्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत नव्हता अश्या सा-या तंत्राचा वापर आज केला जात आहे.

एक विशेष भेटीत स्वत: डॉ संजय अग्रवाल यांनी त्यांच्या यशाची ह्रदयद्रावक कहाणी आम्हाला सांगितली. आपल्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती देताना अनेक आठवणी ताज्या केल्या. ते म्हणाले की, नवव्या यत्तेत असतानाच ठरवले होते की, डॉक्टर व्हायचेच. निर्णय स्वत:च घेतला. या निर्णयामागे त्यावेळच्या स्थितीचाही हात होता. त्यावेळी प्रत्येक जण डॉक्टर किंवा अभियंता होण्याचे स्वप्न बघत होता. जे गणितात कच्चे आहेत ते डॉक्टर होण्याची स्वप्ने बघत. जेंव्हा संजय यांनी १९७७मध्ये आई-वडीलांना हे संगितले तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. जणू काही त्यांना हेच ऐकायचे असावे इतके ते आनंदी झाले. सा-यांनीच संजय यांना शुभेच्छा दिल्या. पण डॉक्टरकीच्या शिक्षणाच्यावेळी त्यांनी पुन्हा एक निर्णय घेतला तेव्हा सा-यांना धक्काच वसला. सर्वानीच विरोध केला आणि निराश करणा-या गोष्टी सांगितल्या. असे असले तरी यावेळी देखील त्यांनी जे आपल्या मनात आहे तेच ऐकण्याचे ठरवले. यावेळी त्यांचा निर्णय पूर्णत: स्वत:चा होता. जो सर्वांच्या मनाविरुध्द होता. तो होता कार्डियाक सर्जन होण्याचा, ह्रदयाचा डॉक्टर होण्याचा! !

image


त्यावेळी या निर्णयावर सगळे हैराण होण्याची स्थिती असणे सहाजिकच होते. त्यावेळी लोक ह्रदयाचा रोग हा सर्वात जीववघेणा समजत असत. जर कुणाला हा रोग झाला तर त्याचे अंतिम जीवन जवळ आले असे समजले जात असे. आणि शस्त्रक्रिया म्हणजे तर साक्षात मृत्य़ूला आमंत्रण! जीव वाचला तर वाचला. अश्यावेळी डॉ संजय यांनी कार्डियाक सर्जन होण्याचे ठरविले.

संजय अग्रवाल म्हणाले, “ मला वेगळे काहितरी करायचे होते. मनात वेगळीच ओढ होती. मी विचार केला की ह्रदयाच्या ज्या शस्त्रक्रयेसाठी लोक मोठे आव्हान समजतात त्या कामात मी प्राविण्य मिळवावे. माझ्या मनात त्यावेळी दोनच विचार येत. पहिले शस्त्रक्रिया करण्याच्या मार्गाने जाण्याचा आणि तेही ह्रदयाच्या शस्त्रक्रिया करण्या-या डॉक्टरांच्या!” संजय अग्रवाल पुढे म्हणाले की, “ त्यावेळी यासाठी फारसे कुणी उत्साही नसायचे. देशात केवळ दोनच ठिकाणी ह्रदयाच्या शस्त्रक्रिया केल्या जात. त्यावेळी दिल्लीत एम्स आणि वेल्लोरच्या क्रिश्चीयन मेडिकल महाविद्यालयात ते शक्य होते. शस्त्रक्रयेची पध्दतही जुनी होती. सर्वात मोठी अडचण प्रशिक्षणाची होती. ही सुविधा फारच थोड्या ठिकाणी होती. त्यामुळे नव्याने लोक त्यासाठी तयार होत नसत.”

एका प्रश्नाच्या उत्तरात संजय म्हणाले की, त्या्च्या सोबत १९६ विद्यार्थी एमबीबीएसला होते. त्यातील केवळ चार जण नंतर सुपर स्पेशालिटी साठी गेले त्यापैकी ते एक होते. संजय यांनी कार्डियाक निवडले तर दुस-यांनी प्लास्टिक सर्जरीची निवड केली. म्हणजे १९९६ मध्ये केवळ चारजणच वेगळ्या वाटेने गेले. खरंच संजय यांच्यासाठी पुढचा मार्ग आव्हांनांचा होता. ज्यावेळी त्यांनी ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली त्यावेळी रुग्णांना देखील त्यावर विश्वास नसायचा. एकतर यासाठी खूप कमी रुग्णालये असायची आणि जिथे ती होत असत तिथली पध्दत जुनीच असायची. आजच्या सारख्या आधुनिक सुविधा तेंव्हा नसायच्या.

हैद्राबादच्या अपोलो रुग्णालयाच्या परिसरात झालेल्या या चर्चेदरम्यान डॉ संजय यांनी सांगितले की, नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला स्थिती बदलण्यास सुरुवात झाली. नवे तंत्रज्ञान आले. अनेक देशांत तंत्रज्ञानाची देवाण घेवाण सुरू झाली. जस जसे भारतीय डॉक्टर नव्या नव्या गोष्टींचा अवलंब करत गेले तस तसे भारतातही कार्डियाक सर्जरीवर लोकांचा विश्वास बसू लागला. त्यामुळे अश्या डॉक्टरांचा सन्मानही वाढला. संजय अग्रवाल सांगतात की, “ आधी हा आजार इलाज नाही असे समजून लोक येत पण आता कठिणातील कठीण स्थितीतही उपचार होतात. भारतातही अत्याधुनिक पध्दतीची साधने उपलब्ध झाली आहेत.”

image


त्यांच्या जीवनातील पहिली ह्रदय शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव ते सांगतात, “ बावीस वर्षांचा एक तरूण होता. त्याच्या ह्रदयात छिद्र होते. मी दोन तास शस्त्रक्रिया केली. ते छिद्र बंद केले शस्त्रक्रिया यशस्वी झाली.” संजय ज्यावेळी त्या पहिल्या अनुभवाबाबत सांगत होते त्यावेळी त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. हसतच त्यांनी संगितले की, “ त्या गोष्टीला आज वीस वर्षे झाली. तो रुग्ण आजही माझ्याकडे येतो. त्याला पाहून खूपच आनंद होतो”. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, पूर्वी शस्त्रक्रिया करताना वेगळ्याच प्रकारच्या साहसाची अनुभूती होत असे, थोडी धाकधुकही असायची. जेंव्हा यश मिळायचे तेंव्हा त्यांना मैलो दूर निघून गेल्याचे समाधान मिळत असे. त्यातून त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळत गेले. आणि आनंद मिळाला. त्यांनी आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांचा उत्साह आजही पहिल्यासारखाच कायम आहे. यशाची घोडदौड सुरूच आहे. ते म्हणतात की, “थांबणे दुसरे काही नाही घसरण आहे. सतत चालत राहणे आणि पुढे जाणे म्हणजेच यश आहे. त्यामुळे मला थांबायचे नाही. माझा प्रयत्न आहे की मी सातत्याने चालावे. ज्या स्तरावर आहे त्याच्यावर जाऊन किमान जाण्याचा प्रयत्न करत राहू”. एका प्रश्नाच्या उत्तारात ते म्हणाले की, “ त्यांच्यासाठी यशाचा अर्थ उपचारानंतर रुग्णाच्या चेह-यावर आनंद पाहणे आणि जीवनाचा उद्देश हाच की जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार व्हावेत, जेणे करून त्यांच्या जीवनात आनंद यावा”.

डॉ संजय अग्रवाल अमेरिकेच्या डेंटन कुली आणि भारतातील डॉ नरेश त्रेहान यांच्या यशाने प्रभावित आहेत त्यांनाच ते आपला आदर्श मानतात. आजच्या काळातील डॉक्टरांना सल्ला देताना ते सांगतात की, “ तुमच्या मनात आहे ते करून दाखवा” फॉलो युअर पँशन! याची पर्वा करु नका की दुसरे काय म्हणतात. लोकांचे काम सांगणे आहे. ते सांगत राहतात. दुस-यांचे ऐकून स्वत:ला कधी मागे खेचू नका.आपले उद्दीष्ट गाठा”.

संजय अग्रवाल यांनी जीवनातील खूप मोठा भाग त्यांच्या शिक्षणाच्या काळातील वैद्यकीय महाविद्यालयाशी जुळला आहे. त्यांनी एकाच ठिकाणी एमबीबीएस एमएस आणि एमसीएचचा अभ्यास पूर्ण केला. संजय अग्रवाल यांनी कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल महाविद्यालयातून या तीनही मोठ्या पदव्या मिळवल्या. आपले शिक्षण पूर्ण होताच त्यांनी १९९४ मध्ये हैद्राबादच्या एकाच रुगाणालयात आपल्या सेवा देऊ केल्या आहेत. सुमारे बावीस वर्षापूर्वी त्यांचे अपोलो रुग्णालयाशी नाते जुळले आहे आणि ते कायम आहे. चर्चे दरम्यान त्यांनी त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण शस्त्रक्रियेबाबतही सांगितले, “कँथ लँब मध्ये एका रुग्णाचे कॉरोनरी एंजियोग्राम सुरू होते. अचानक त्याचे ह्रदय बंद पडले, सगळे हैराण झाले. आम्ही कृत्रिम श्वास यंत्रणा सुरू करून त्याच्या ह्रदयाला सुरू करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात आम्ही त्याला शस्त्रक्रिया कक्षात घेऊन गेलो. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दुस-या दिवशी तो रुग्ण बरा झाला. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. हा प्रसंग मला नेहमीच लक्षात राहिला.”

डॉ संजय यांच्या पत्नी कविता या देखील डॉक्टर आहेत. त्या बालरोग तज्ज्ञ आहेत. संजय आणि कविता यांच्या दोन मुली आहेत. मोठी मुलगी बिट्स पिलानीच्या हैद्राबाद सेंटर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. छोटी मुलगी नवव्या यत्तेत आहे. संजय यांचे वडील एक के अग्रवाल उत्तर प्रदेशातील वीज मंडळात काम करत होते. वितरण व्यवस्थेतील मोठ्या पदावरून ते सेवा निवृत्त झाले.आई ऊषा या गृहिणी होत्या. त्याचे मोठे बंधू अनुप यांनीही अमेरिकेत संगणक शास्त्राचे प्रोफेसर म्हणून लौकीक मिळवला आहे. वडील सरकारी नोकरीत असल्याने बदल्या होत असत. त्यामुळेच संजय यांचे शिक्षण गोरखपूर, लखनौ, कानपूर अश्या वेगवेळ्या ठिकाणी झाले. पहिल्याच प्रयत्नात ते इंटरमिजीयेट परिक्षा उत्तिर्ण झाले त्यावेळी ५४ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परिक्षेला बसले होते. आणि एमबीबीएसच्या केवळ ७०० जागा होत्या. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑटोरिक्षाचालकाच्या मुलाची युपीएससीच्या परीक्षेत गगनभरारी,जालन्याच्या अन्सार शेखची यशोगाथा

जंगलबुकच्या मोगलीकडून प्रेरणा घेतलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘निखिल मोगली’ची प्रत्यक्ष कथा; वाघांच्या संवर्धनासाठी कार्यरत!

    Share on
    close