बुंदेलखंडचे एक माजी पत्रकार दररोज दारोदार जाऊन हजारो लोकांना भरवतायेत घास!

बुंदेलखंडचे एक माजी पत्रकार दररोज दारोदार जाऊन हजारो लोकांना भरवतायेत घास!

Wednesday October 26, 2016,

2 min Read

तारा पाटकर यांनी सन २०१४मध्ये आपली पत्रकारितेची कारकिर्द सोडून देत रोटी बँक सुरु केली. अनाथ भुकेल्यांना अन्न देणारी अभिनव मोहिम त्या बुंदेलखंडच्या मोहोबा जिल्ह्यात चालवतात. दारोदार जाऊन तारा आणि त्यांचे स्वयंसेवक भाजी- भाकरी जमा करतात आणि रोज सुमारे हजार जणांना ती पुरवितात. हा प्रकल्प, ज्यात या भागातील कुणीही रात्री उपाशी झोपू नये यासाठी बुंदेली समाज या सेवाभावी संस्थेने हाती घेतला आहे. त्याची सुरुवात या ४६ वर्षांच्या माजी पत्रकार आणि तिच्या सहका-यांनी केली आहे. आज हजार स्वयंसेवकांनी रोटी बँकेचे हे कार्य याच जिल्ह्यातील छिकारा आणि मुल्लाह खोढा या दोन गावात विस्तारले आहे.

रोटी बँक पूर्णत: धर्मादाय चालविली जाते. जी कुटूंब यासाठी भाजी-भाकरी देतात त्यांनाही या चांगल्या कामावर श्रध्दा आहे. “यामध्ये कोणत्याही स्तरावर पैश्याचा व्यवहार होत नाही. आम्ही काही डॉक्टरांना सोबत नेतो आणि आरोग्य चिकीत्सा करतो, तेही मोफत,” तारा यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

image


या रोटी बँकचा विस्तार तारा यांना बुंदेलखंडच्या जिल्ह्यात आणि बाजुच्या उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील आणखी तेरा जिल्ह्यात करायची इच्छा आहे. “ मी अनेक ठिकाणच्या मित्रांना या साठी भेटते त्यात बांडा,अटारा, ललितपूर, आणि ओराई यांचा समावेश आहे. आम्ही इतरही गावांचा विचार करत आहोत.” तारा यांनी सांगितले.

तारा आणि त्याचे सहकारी आता ८० दिवसांपासून उपोषण करत आहे, या भागाला भेट देणा-या पंतप्रधानांनी गरजूंसाठी एम्स रुग्णालय यासाठी त्यांची मागणी होती. केवळ मोहोबा जिल्ह्यातच पाहिले तर दोन लाख खाण कामगार आहेत, ज्यांना श्वसनाचे गंभीर आजार आहेत जे येथील सिलीका धुळीच्या प्रदुषणाने होतात. या भागातील आरोग्याच्या प्रश्नांची कशी हेऴसांड सुरु आहे या बाबत सांगताना तारा म्हणतात की, “ या भागात २० पेक्षा कमी डॉक्टर्स आहेत जे असुविधा असलेल्या आरोग्य केंद्रात काम करतात. या भागातील इतर रुग्णालयांच्या बाबतीत हीच स्थिती आहे.” जर सरकारने त्यांच्या या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर तारा आता आमरण उपोषण करुन निर्णायक लढा देण्याच्या तयारीत आहेत.