चेन्नईस्थित या विणकराला भेटा, ज्याने केळीच्या तंतूपासून जीन्सचे कापड तयार केले!

0

सी सेकर, हे चेन्नईस्थित विणकर आहेत, त्यांच्यामुळे बातमी तयार झाली की, त्यानी केळीच्या तंतूपासून जिन्स कापड तयार केले आणि स्कर्ट शिवले. तामिळनाडू मधील अनकापूथूर येथील सेकर यांनी खात्रीने विशेष कापड तयार केले जे डेनिमपेक्षा जास्त पाणी शोषून घेते. या जिन्सला पाच हजार रूपये इतका भाव मिळाला आहे.


जरीही अनकापूथूर हे चेन्नईचे छोटेसे उपनगर असले तरी त्याची ओळख मात्र विणकरांचे गाव अशीच आहे. याबाबत बोलताना सेकर म्हणाले की, “ हे कापड नैसर्गिक रंगाने रंगविले आहे, आणि नारळाच्या करवंटीपासून त्याची बटने तयार केली आहेत, त्यातील धातूचा भाग आणि झीप डेनीम जिन्सची लावण्यात आली आहे. उन्हाळ्यात सिंथेटिक कापडाला हा चांगला पर्याय होवू शकतो”.

अंदमान आणि निकोबार मधून एक खास पथक आले आणि त्यानी या विणकराच्या कलाकृतीची पाहणी केली, त्यांनी सेकर यांना विनंती केली की, यासाठी प्रशिक्षित  कलाकारांकडून नक्षीकाम करावे  कारण त्यात नैसर्गिक विणकामाच्या तंतूचे गुण आहेत.

सेकर यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे केळी आणि बांबूच्या तंतूपासून साडी विणणे. ते अशा प्रकारच्या २५ नैसर्गिक तंतूपासून साड्या किंवा कपडा विणू शकतात.