मुलींनी शाळा सोडून जाऊ नये म्हणून या दोन शाळकरी मुलींनी केले त्यांच्या समस्येचे निराकरण

0

काळासोबतच, शिकणा-या लहान मुलांवरील लक्ष देण्यात वाढ होत आहे, खास करून लहान मुलींबाबत ही वाढ लक्षणीय अशीच आहे. सरकारच्या बेटी बचावो बेटी पढावो या अभियानातून एक पाऊल पुढे टाकत जास्तीत जास्त लोकांना जाणिव होवू लागली आहे की, या देशाच्या विकासाचे महत्वाचे आयुध शिक्षण हेच आहे. असे असले तरी राजधानीच्या शहरात सन २०१६मध्ये मध्येच शाळा सोडून जाणा-या विद्यार्थीनींच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याची कारणे शिक्षकांची अपूरी संख्या, आणि स्वच्छता गृहांचा आभाव ही आहेत. सरकारी शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलींच्या गळतीला हे घटक जबाबदार आहेत. दिल्लीची शाळकरी मुलगी  शरण्यादास शर्मा, या आकडेवारीने हैराण झाली.


Image source: The Better India
Image source: The Better India

जेंव्हा तिला जाणिव झाली की, शाळा सोडण्यामागे आरोग्यकारक सुविधांची कमतरता हे एक कारण आहे, तिने यामध्ये स्वत: लक्ष देण्याचे ठरविले. शरण्याने याबाबत तिची एक मैत्रिण अमेया विश्वनाथन हिच्याशी चर्चा केली. तिला तिच्या कामात मदत करण्याची विनंती केली, आणि त्यातूनच ‘सशक्त’ हा प्रकल्प तयार झाला. या दोघीजणी श्रीराम शाळेच्या मौलसारी कॅम्पस डिएलएफ, गुरगाव मध्ये अकरावीच्या वर्गात शिकतात.

याबाबत सांगताना शरण्या म्हणाली की, “ मी स्वत:ला महिलांची चांगली प्रवक्ता समजते, मी पाहिले की मुली खरेतर शाळा सोडतात कारण त्यांच्या शाळेत प्रसाधनगृहाची चांगली सोय नाही,आणि तेथे सँनिटरी नँपकिन्स सारख्या मुलभूत सुविधा नाहीत. मी देखील एक शाळकरी मुलगी आहे म्हणून मला देखील हे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीशी चर्चा केली आणि ठरविले की, या मुलींच्या प्रश्नात आम्ही मदत करून त्यांना यातून बाहेर काढू.” शरण्याने तिच्या  मैत्रिणी सोबत सप्टेंबर २०१६ मध्ये सँनिटरी पँडचे वाटप सुरु केले, आणि दोघी जणींनी यावर लक्ष दिले की मुली आणि महिलांना वर्षभर ते मिळू शकतील. आणखी एक गोष्ट या दोघींना नीट माहिती होती ती अशी की, या मुली आणि महिलांना आरोग्यकारक सवयी कशा असतात त्याची जाणिव आणि त्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यशाळा देखील घेतल्या. शरण्या यांनी त्याबद्दलही सांगितले, त्या म्हणाल्या, “ सुरुवातीला, आम्ही एकत्र बसलो आणि ठरविले की कार्यशाळेचा अभ्यासक्रम काय असायला हवा, आम्ही या मुलींना शिकवण्यास सुरुवात केली की सॅनिटरी नॅपकिन कसा वापरला पाहिजे. नंतर आम्ही त्यांच्याशी रोजच्या आरोग्यकारक सवयींबाबत बोलण्यास सुरुवात केली जसे की, रोज अंघोळ करणे किंवा हात धुणे. आम्ही न्यूनगंड किंवा गुप्त समजल्या जाणा-या विषयांवरही चर्चा केली आणि त्यावर दुर्लक्ष न करण्याबाबत इशारा दिला. आम्ही त्यांना काही संसर्गाबाबतही माहिती देतो, त्यांच्याशी कसे दोन हात करावे हे देखील सांगतो.”

पर्यावरणावर सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराने काय परिणाम होतात ते देखील त्यांनी जाणले आणि जैविक पध्दतीने तयार करण्यात येणा-या नँपकिन्सच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करतात. या मुली खूप धडपड्या आहेत आणि त्यांनी त्यांना हवी असलेली माहिती बरोबर मिळवली, जसे की नजिकचे डॉक्टर्स, आणि इतरांना माहिती दिली, जसे की सरकारी शाळेत जाण्यापूर्वी कार्यशाळेत कसे गेले पाहिजे इत्यादी. या कामगिरी नंतर त्यांनी त्याच्या आसपास प्रथम नँपकिन्स वाटले आणि नंतर इतरांना मासिक तत्वावर पुरवठा केला. या कार्यशाळा प्रथम त्यावेळी सुरु झाल्या जेंव्हा त्यांनी नुकतेच दहावीची परिक्षा दिली होती. त्यांना जाणिव आहे की, महाविद्यालयात शिकताना पदवीसाठी त्यांना खूप मेहनत केली पाहिजे, मात्र तरीही या मुलींना याची देखील जाणिव आहे की त्यांचा हा कार्यक्रम सुरु असताना या कारणांसाठी कुणा मुलीला शाळा सोडून जावे लागू नये. त्यांच्या या अभियानाची ओळख आता या भागातील काही सेवाभावी संस्थानाही झाली आहे, आणि त्यांच्या नॅपकिन वाटपला हातभार लावत आहेत. त्यांच्या भविष्यातील नियोजन आणि निश्चयानुसार या मुलींना आणखी काही सरकारी शाळांपर्यंत पोहोचायचे आहे आणि अधिक जोमाने हे काम भविष्यात करायचे आहे!

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी marathi@yourstory.com वर संपर्क साधा.