नैसर्गिक सुंगधाच्या संकलनात गुरूग्रामच्या महिलेने प्रस्थापित केला जागतिक विक्रम!

0

रितीका जतिन अहूजा, ज्या गुरूग्रामच्या रहिवासी आहेत, त्यांना गोल्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स मिळाले आहे. त्यांनी मिनी फरफ्यूम क्षेत्रात प्रक्रिया करण्यात प्राविण्य मिळविले आहे.


२८ मे २०१७ रोजी रितीका यांनी प्रदर्शन भरविले होते, त्यात ५६३ प्रकारच्या अत्तरांचे प्रदर्शन होते, जे वेगवेगळ्या ब्रँन्डचे, आकारांचे, प्रकारांचे, सुगंधाचे होते. त्यांच्या या परफ्यूम संकलनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ आठ वर्षांच्या असताना पासून त्यांना या संकलनाचा छंद लागला. त्यांच्या या छंदाने आणि त्यातील महत्वाकांक्षेने त्यांनी नवा विक्रम साकारण्यापर्यंतचा अनोखा प्रवास केला.

एका वृत्तानुसार याबाबत बोलताना रितीका म्हणाल्या, “ गोल्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आल्याने एक टप्पा पूर्ण झाला. जे स्वप्न होते ते साकारले. मी नेहमीच अत्तरांची मोठी दर्दी खरेदीदार राहिले आहे. आणि त्यात जी गुंतवणूक करत गेले ती आज फळाला आली आहे”. रितिका यांच्याकडे यासाठी काचेच्या कपाटात स्वतंत्र जागा करण्यात आली आहे, त्यात मांडणी करण्यात आलेल्या अत्तर आणि सुंगधाच्या बाटल्यांची संगती देखील मोहक आहे.

एका वृत्ता नुसार त्या म्हणतात, “ मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, आणि माझा सन्मान समजते की हा पुरस्कार मला मिळाला. मी सा-या स्त्रियांना प्रेरणा दिली की त्यांनी यावे आणि त्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी व्यक्त कराव्या आणि स्वत:ला त्यात कुठे आहोत ते पहावे”.

याशिवाय, रितीका यांनी स्वतंत्रपणे व्यापारी पध्दतीने ‘बीग बॉय टॉइज’ या नावाने लक्झरी कारची डिलरशिप सुरू ठेवली आहे. त्यांच्या छंद आणि वेडातून नवे उदाहरणच समोर आले आहे की, एखाद्याचे छंद त्याला कोणत्या वेगळ्या यशाच्या मार्गाने घेवून जातील काही सांगता येत नाही.!