१६ वर्षाच्या मुलाने पर्यावरण रक्षणासाठी सुरु केले स्वतःचे स्टार्टअप ‘टायरलेसली’

0

पर्यावरणाच्या रक्षणासाठी मदत करणारे ‘टायरलेसली’...

टायरची सुरक्षित पद्धतीने लावते विल्हेवाट...

स्टार्टअपच्या या युगात आजकाल मोठी माणसे काय, लहान मुले सुद्धा नाव कमावत आहेत. अनुभव वाधवा असाच एक होतकरू आणि गुणी मुलगा आहे. ज्या वयात मुलं आपल्या करिअरविषयी विचारही करु शकत नाहीत त्या वयात त्याने स्वतःचे स्टार्टअप सुरु केले आहे. १६ वर्षाचा अनुभव गुडगावमधील आरावली येथील पाथवे वर्ल्ड स्कूलमध्ये अकरावीत शिकतो आहे. अनुभवने आपल्या कामाची सुरुवात २०१२ मध्ये ‘टेकऍप्टो’पासून केली. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये त्याने ‘टायरलेसली’चा पाया रोवला आणि जानेवारी २०१६ मध्ये अनुभवने ‘टायरलेसली’ लाँच केले.

ही कंपनी सुरु करण्याविषयी अनुभवने युअरस्टोरीला सांगितले की एक दिवशी जेव्हा तो शाळेतून घरी परत येत होता तेव्हा त्याने रस्त्यावर जुने टायर पसरलेले आणि जळत असलेले पाहिले. “मला वाईट वाटले. कारण त्यामुळे वातावरणात सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण वाढत होते, ज्यामुळे हवा प्रदूषित होत होती. या घटनेनंतर जेव्हा मी घरी पोहचलो तेव्हा सर्वप्रथम मी गुगलवर सर्च केलं की जुने टायर कसे नष्ट केले जाऊ शकतात. मात्र देशामध्ये अशी कुठलीही प्रभावी पद्धत नाही हे पाहून तेव्हा मी निराश झालो. त्याचवेळी मी निश्चित केले की या क्षेत्रात काही तरी काम करणे गरजेचे आहे.”

‘टायरलेसली’ जुने टायर जमा करते आणि सुरक्षित पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावते. ‘टायरलेसली’चे दोन मुख्य उद्देश आहेत, मटेरिअल रिकवरी आणि एनर्जी रिकवरी. ‘टायरलेसली’ला जर तुम्ही जुने टायर देऊ इच्छित असाल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर तुमचा मेसेज सोडू शकता. ज्यानंतर तुम्ही सांगितलेल्या जागेवरुन ते जुने टायर घेऊन जातात. ही सेवा ते सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्ये देत आहेत. लवकरच ते आपल्या या सेवेचा विस्तार देशातील इतर १२ प्रमुख शहरांमध्ये करणार आहेत.

जुने टायर जमा करण्यासाठी त्यांनी गुडगावमध्ये एक गोदाम घेतलेले आहे आणि त्यांच्याकडे एक वॅन आहे, जी वेगवेगळ्या ठिकाणांहून टायर जमा करण्याचे काम करते. ‘टायरलेसली’ची पाच लोकांची टीम आहे. लवकरच ही संख्याही वाढविण्यात येणार आहे. अनुभव सांगतो की ते जेव्हा लोकांकडून जुने टायर घेतात तेव्हा त्या बदल्यात काही किंमत तर नाही देत, मात्र टायर घेऊन जाण्याची सेवा मोफत देतात. विशेष म्हणजे एक टायर असो वा १०० टायर, ते सर्व ठिकाणी सेवा पुरवितात.

आतापर्यंत जुन्या टायरचा वापर चिनी उद्येग आणि यासारख्याच इतर अन्य उद्योगांमध्ये बऱ्याच प्रमाणावर केला जातो. ज्यामुळे वायु प्रदूषण होते. ‘टायरलेसली’ हवा प्रदूषित होऊ न देता टायरची विल्हेवाट लावून त्यापासून तेल, ग्रीस आणि इतर उत्पादने घेतात. कंपनीमध्ये सुरुवातीची गुंतवणूक अनुभवने जुन्या उपक्रमातील गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या पैशातून केली. कंपनीच्या आर्थिक उत्पन्नाबाबत अनुभव सांगतो की वेबसाईटवर आलेल्या जाहिराती त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहेत.

इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या अनुभवला जेव्हा युअरस्टोरीने विचारले की तो अभ्यासाबरोबरच या कामासाठी वेळ कसा काढतो ? तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी दैनंदिन कामांसाठी माझी वेळ ठरवलेली आहे. त्यामुळे मी अभ्यासाबरोबरच ‘टायरलेसली’साठीही वेळ काढू शकतो.”

त्याचं म्हणणं आहे की तो दिवसभर अभ्यास केल्यानंतर जास्त करुन संध्याकाळच्या वेळी आपल्या या उपक्रमाकडे लक्ष देतो. या प्रकारे ना अभ्यास बाजूला पडतो आणि ना त्याच्या या कामावर काही परिणाम होतो. त्याच्या या कामात सर्वात जास्त मदत त्याचे आई-वडिल करतात, जे नेहमीच त्याच्या कामाबाबत त्याचे मनोबल उंचावत असतात. अनुभव सांगतो की विविध समुदायांच्या मदतीने लोकांना टायर जळल्याने होणाऱ्या हानीविषयी जागृत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. नुकत्याच सुरु केलेल्या या व्यवसायाचा देशभरात विस्तार करण्याची त्याची योजना असल्याचे अनुभव सांगतो.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...

गुगल गुरूचा ग्रेट प्रवास...

‘गाना.कॉम’चा स्पर्धक... ‘फ्लॅट.टू’चा पहिला सहकारी

लेखक – हरिश
अनुवाद – अनुज्ञा निकम