अमिताभ बच्चन यांची जागतिक आरोग्य संघटनेने हेपाटायटिस साठी सदिच्छा दूत म्हणून केली नेमणूक!

अमिताभ बच्चन यांची जागतिक आरोग्य संघटनेने हेपाटायटिस साठी सदिच्छा दूत म्हणून केली नेमणूक!

Wednesday May 24, 2017,

2 min Read

नुकतेच, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नेमणूक दक्षिणपूर्व आशिया विभागाचे सदिच्छादूत म्हणून हेपीटायटीस जागृती कार्यक्रमासाठी केली. बच्चन यांनी स्वत:च हेपीटायटस बी च्या विषाणूशी दोन हात केले आहेत.


image


जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केले आहे की बच्चन आता त्यांच्या सोबत असतील आणि हेपिटायटसच्या विळख्यातून सुटका करण्याच्या त्यांच्या जागृती कार्यक्रमांसाठी व्यापक प्रमाणात बळ देतील.

एका वृत्तानुसार, या महान अभिनेता आणि विचारवंताने म्हटले आहे की, हेपिटायटीसच्या लढ्यात मी पूर्णत: बांधील आहे, असा माणूस ज्याने हेपिटायटीस बी भोगला आहे, मला माहिती आहे त्याचे दु:ख आणि वेदना, इतक्या वेदना संसर्गजन्य हेपिटायटस मुळे कुणाला झाल्या नसतील.” या लोकजागृती अभियानात या नायकाचा आवाज वापरला जाणार आहे, ज्यात ते भारदस्त आवाजात या मोहिमेचे उद्देश आणि कोणती काळजी घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन करतील. त्यामुळे हेपीटायटसला वेळीच रोखता येणार आहे.

या बाबतच्या वृत्ता नुसार आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले की, “बच्चन यांचा आवाज असा आहे की जो देशभर लोकांच्या परिचयाचा आहे, त्यात संस्कृती, समाज, किंवा आर्थिक स्थिती यांचा अडसर येत नाही, त्यामुळे अपेक्षित बदल घडून येतो.”

पूनम क्षेत्रपाल सिंग, विभागीय अधिकारी, डब्ल्यूएचओ दक्षिणपूर्व आशिया, यांनी सांगितले की, “ संस्थेच्या अपेक्षा आहेत की, त्यांनी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नाला दृढ करावे आणि संसर्गजन्य हेपीटायटसमुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण किंवा आजारी पडण्याचे प्रमाण कमी करण्यास हातभार लावावा, जेणेकरून व्यक्तींच्या आणि कुटूंबाच्या जीवनात येणारे कठीण प्रसंग टाळता येतील, आणि या विभागातील आरोग्य सुधारण्यात त्याचा परिणाम दिसून येईल.”

या बहुमानाशिवाय, बच्चन हे भारतातील पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमाचे देखील सदिच्छा दूत आहेत, आणि यासाठीच्या अनेक समर्थन प्रचार मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले आहे, ज्यात देशाच्या आरोग्याचा मुद्दा सांगितला आहे.