यशस्वी स्त्री उद्यमींकडून सफलतेचा मूलमंत्र

यशस्वी स्त्री उद्यमींकडून सफलतेचा मूलमंत्र

Tuesday December 22, 2015,

2 min Read

प्रत्येक मनुष्याच्या मनात एक उत्कट इच्छा लपलेली असते की काहीही करून आपल्या हातात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली सापडली पाहिजे. महिला उद्योजिका दिवसा निमित्त युवर स्टोरी ने पाच यशस्वी स्त्रियांसमोर एक प्रश्न मांडला.

आम्ही त्यांना विचारले एक यशस्वी व्यापार निर्मितीसाठी सगळ्यात महत्वपूर्ण गुण काय असतात उत्तरादाखल आमच्या समोर बरेच सुंदर विचार आले.


image


स्वाती भार्गव या निधी व्यवस्थापन करणाऱ्या कॅशकरो कंपनीच्या सह्संस्थापिका आहे. त्यांची कंपनी कल्लारी कॅपीटल यांच्या कडून २५ करोडचे ए सिरीज ची गुंतवणूक मिळविण्यास यशस्वी झाल्या. स्वाती सांगतात की, मल्टीटास्किंग हे यश मिळवण्यासाठी सगळ्यात अचूक आणि प्रभावी उपाय आहे. त्या सांगतात की स्त्रियांना घर आणि कुटुंबातील अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या उचलून त्याचे निवारण करावे लागते. त्या आपल्या क्षेत्रात कितीही उच्च पदावर विराजमान असल्या तरीही या जबाबदा-या त्या टाळू शकत नाही. कोणत्याही उद्योगात जम बसविण्यासाठी आपला २००% सहभाग आवश्यक असतो आणि स्त्रियांसाठी वेळेचे बंधन हे एक मोठे आव्हानच असते. त्या आत्मविश्वासाने सांगतात की, ‘स्त्री ही मल्टीटास्किंग मध्ये निसंशय सक्षम आहे तसेच अनेक क्षेत्रामध्ये ती पुरुषाच्या बरोबरीने खंबीर नेतृत्व पण करू शकते’.

स्वाती बेडेकर या आपल्या वास्तलय संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भातील स्वच्छ वातावरण निर्मितीच्या दिशेने कार्यरत आहेत. स्वाती यांच्या मतानुसार, ‘कोणत्याही महिला उद्यमीला स्वतः शिवाय आपली दृष्टी, क्षमता आणि माहिती या प्रती आत्मविश्वास असणे महत्वाचे आहे’.

बीटगिव्हिंग (BitGiving) च्या २६ वर्षीय सह्संस्थापिका आणि सीइओ इशिता आनंदाने सांगतात की, दृढता आणि जाड कातडी हे एक यशस्वी होण्याचे मुख्य सूत्र आहे. त्या सांगतात की, ‘बऱ्याच वेळा स्त्रिया या स्वतःवर कामाचा व्याप अधिक वाढवून घेतात आणि एका उद्यमीचा प्रवास हा बराच कठीण असल्यामुळे आपण स्वतःवरचा आत्मविश्वास टिकवून ठेवला पाहिजे व तसेच आपल्या विद्वत्तेवरचा विश्वास दुरापास्त होणे रास्त नाही.’

जॉब्सफॉरहर (Jobsforher) च्या संस्थापिका नेहा बगारिया सांगतात की, ‘आपण आपल्या आयुष्यात काही नियम ठरवतो आणि आपल्या आयुष्यात त्यालाच महत्व देतो व ज्या उद्यमी स्त्रिया स्व: विकास साधण्यासाठी व मोठे स्वप्न बघण्याला स्वतःच बंधन घालतात त्यांच्यासाठी हे अतिशय केविलवाणे आहे. यासाठी कोणत्याही महिला उद्यमीला एका स्टार्टअपच्या यशाच्या संचालनासाठी प्रथम आपल्या विद्वत्तेवर दृढ विश्वास पाहिजे. आपण स्वतःच्या पालनपोषण आणि समाजाद्वारे आपल्यासाठी निर्धारित केलेल्या बंधानांना झुगारून व पाठीमागे सोडून यशाचे दावेदार बनू शकतो.’ त्यांचा हा उद्योग स्त्रियांच्या घटस्फोटानंतर, मातृत्वानंतर वयस्कर लोकांची काळजी इ. संबंधित असलेली कामे देवून त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत करतो.

हायजीन अँड यू ची संस्थापिका प्रियांका जैन सांगतात की, ‘कोणत्याही महिला उद्यमीला आपल्या गुणवत्तेप्रती दृढ विश्वास असणे गरजेचे आहे कारण अनेक आव्हानांनी परिपूर्ण असलेला उद्यमींच्या प्रवासात असे अनेक क्षण येतात जिथे आपण स्वतः हरवून जाण्याची शक्यता असते.’

तर यशस्वी होण्यासाठी तुमचा आवडता उपाय कोणता आहे ते तुम्हीच ठरवा? 

लेखिकाः तन्वी दुबे

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close