भारतातील स्थलांतरण उद्योगातील अनभिषिक्त सम्राज्ञी

29 वर्षीय आकांक्षाने दिले स्थलांतरण उद्योगाला नवे परिमाण

भारतातील स्थलांतरण उद्योगातील अनभिषिक्त सम्राज्ञी

Monday August 17, 2015,

8 min Read

तुम्हाला आठवत असेल एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट होताना तुमच्या आवडत्या काचेच्या बाऊलचे अनेक तुकडे झाले...किंवा अतिशय मौल्यवान असे तुमचे पेंटिंग स्थलांतरावेळी खराब झाले...कदाचित यामुळेच घर बदलणे ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा कुटुंबासाठी नेहमीच एक जिकिरीची बाब बनून जाते. त्यात महानगरांमधील अतिशय धावपळीच्या आयुष्यात असे स्थलांतरण करणे नेहमीच तापदायक ठरते. त्यामुळेच पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स हा उद्योग वेगाने फोफावत आहे. पण अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्यांची या क्षेत्रात निकड भासू लागली आहे. त्यातही काही कंपन्या जसे अग्रवाल मूव्हर्स ऍण्ड पॅकर्स, ईझी मूव्ह आणि डिटीडिसी पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स या घरगुती पॅकिंग ऍण्ड मूव्हिंगसाठी ओळखल्या जातात. परंतु या संपूर्ण उद्योग जगताचा विचार करता अजूनही हे क्षेत्र तसं विखुरलेल्या स्वरुपातच आहे. या क्षेत्रात आदरातिथ्याचेही खूप महत्व आहे. कदाचित त्यामुळेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना प्रशिक्षण आणि जागरुकतेचे धडे देण्याची गरज आहे.

गेल्या तीन दशकांपासून स्थलांतरण उद्योगात कार्यरत असलेली "पीएमआर" स्थलांतरण ही कंपनी नेमक्या याच मुद्यांवर जोर देत कार्यरत आहे. मैत्रीभाव जपत आणि उद्योगातील दर्जा हेच सूत्र त्यांनी अंगिकारलेले आहे. सुमारे 30 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीची धुरा सध्या 29 वर्षीय आकांक्षा भार्गव या अतिशय उत्साही तरुणीच्या हातात आहे. पुढच्या कारकीर्दीतही आपल्याला याच उद्योगाला अधिक पुढे नेत भरभराट करायची असल्याचा आकांक्षा यांचा मानस आहे.


आकांक्षा भार्गव, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएम स्थलांतरण उद्योग

आकांक्षा भार्गव, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएम स्थलांतरण उद्योग


आकांक्षा यांनी युअर स्टोरी सोबत पीएमआरचा स्थलांतरण उद्योगाची पायाभरणी आणि स्थलांतरण उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीयीकरण कसे साधले, या विषयी सविस्तर संवाद साधला.

पीएम स्थलांतरण उद्योग काय आहे?

पीएम स्थलांतरण म्हणजे तुम्हाला भारतात किंवा भारताबाहेर कुठेही स्थलांतरण करायचे झाल्यास आमच्याकडे वन स्टॉप सोल्यूशन उपलब्ध आहे. अर्थात एकाच ठिकाणी तुमच्या स्थलांतरणाविषयीच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता पीएमआरमध्ये आहे. यात घरगुती स्थलांतरणासह, कार्यालयाचे स्थलांतर, फाईन आर्ट्स व्यवसाय स्थलांतर, कोणत्याही स्थलांतरासाठी लागणारे मार्गदर्शन, आवश्यक सांस्कृतिक प्रशिक्षण, घरांचा शोध, सेवा उद्योगांची स्थापना तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार लागणारे इमिग्रेशन आणि कस्टम मॉड्यूलची सेवाही आम्ही पुरवतो. सध्याच्या घडीला भारतातील 13 प्रमुख शहरांमध्ये पीएमआर सेवा देत आहे. सध्या उपरोक्त सगळ्याच सेवा आम्ही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवण्याचा प्रय़त्न करत आहोत. तरी देखील सध्या आमचे लक्ष स्थानिक मार्केटवर अधिक आहे. 2009 मध्ये पॅकर्स उद्योगातून आम्ही स्थलांतरण या जगव्यापी उद्योगात प्रवेश केला.

पीएमआरचा सर्वाधिक खपाचा मुद्दा अर्थात यूएसपी

"पीएमआरची ओळख केवळ पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आम्ही गंतव्य सेवा पुरवठादार अर्थात जेथे तुम्हाला स्थलांतरीत व्हायचे आहे, तेथे पोहोचून सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असतो. आकांक्षा म्हणतात, या सर्व सेवा आम्ही उपकंत्राटदार नेमून अथवा एखादे पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स तात्पुरते सोबत घेऊन कधीही करत नाही. आमच्याकडे सर्व प्रकारचे तज्ज्ञ आणि सुपरव्हायझर्स उपलब्ध आहेत. आमचा यूएसपी म्हणजे आमची अत्यंत प्रशिक्षित अशी टीम, क्रू आणि संपूर्ण देशभर पसरलेले आमच्या सेवेचे जाळे आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आमच्याशी जोडले गेलेले आमचे ग्राहक हे देखील आमचे बळ आहे. काही ग्राहकांचा उल्लेख करायचा झाल्यास शेल, अमेरिकी दुतावास, अमेरिकन स्कूल, एमडॉक्स, एचपी, ब्रिटानिया, एसएपी, बॉस्च, आयटीसी, एचएसबीसी, नोकिया-सिमेन्स, बार्कलेज, भारती एअरटेल आणि एलजी ही नावे आवर्जून घ्यावी लागतील."

ट्रक्स पीएमआर

ट्रक्स पीएमआर


स्थलांतरण उद्योगाची वाढ कशी होत गेली...

स्थलांतरण उद्योग हे पूर्णपणे असंघटिक क्षेत्र आहे. एखादी पॅकिंग ऍण्ड मूव्हिंग कंपनी म्हटली म्हणजे ट्रकने सामानाची ने-आण करणारे लोक किंवा कामगारांनी भरलेले टेम्पो अशी या क्षेत्राची प्रथमदर्शनी ओळख. परंतु या क्षेत्राकडे आकांक्षा यांचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. या क्षेत्राकडे संवेदनशील पद्धतीने पाहण्याची गरज आहे. अनेक जण तर करिअरचा पर्याय म्हणून या क्षेत्राकडे पाहत देखील नाहीत. "पॅकिंगला कमी दर्जाचे संबोधून या क्षेत्रात अनेक लहान आणि अव्यावसायिक लोक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ज्याला आपण संवेदनशील वैयक्तिक लक्ष देणे म्हणतो, असे होतानाच दिसत नाही. हा उद्योग ट्रान्सपोर्ट आणि खास करुन न शिकलेल्या लोकांसाठी असल्याचेही मानले जाते."

कदाचित लोकांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आकांक्षा कार्यरत असून त्यांचे काम पुढेपुढे जात आहे. या क्षेत्रात पदार्पण करायचे झाल्यास कोणतीही पूर्वअट नाही, कारण प्रत्येक गोष्टीची सेवा तुम्ही अन्य लोकांकडून-कंपन्यांकडून घेऊ शकता.


पॅकिंग साईट

पॅकिंग साईट


स्थलांतरण उद्योगातील मोठ्या संधी

आकांक्षा म्हणतात, एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरीत व्हायचे झाल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास करुन न घेता तुमच्यासाठी सहाय्यकारी ठरणारी यंत्रणा उपलब्ध आहे, हे सर्वांना माहित होणे गरजेचे आहे. तसच या क्षेत्रात व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आकांक्षा यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण देशात स्थलांतरणासाठी वन स्टेप सोल्यूशन असणारी एकही कंपनी उपलब्ध नाही. त्यामुळेच पीएमआरचे वेगळेपण सिद्ध होते. स्थलांतरण उद्योगाची थोडी कल्पना काहींना आहे. पण येत्या काळात हा उद्योग प्रत्येकाची गरज ठरणार आहे.

पीएमआरने एफआयडीआय या आंतरराष्ट्रीय मानांकन कंपनीकडून अर्नेस्ट यंग हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रमाणिकरण प्राप्त केलेले आहे. पीएमआरला मिळालेली आयएसओ आणि डब्ल्यूई प्रमाणपत्रे देखील गुणवत्तेची साक्ष देणारी आहेत. जागतिक स्तरावरील अनेक पॅकिंग ऍण्ड मूव्हिंग कंपन्यांशी देखील पीएमआरने व्यावसायिक नाते प्रस्थापित केलेले आहे.

असे काय घडले की वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कुटुंबाच्या उद्योगात तुम्हाला सामील व्हावेसे वाटले...

एसपी जैन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पदवी संपादन करणाऱ्या आकांक्षा या प्रश्नावर म्हणतात, निश्चितच "हा आमच्यासाठी कुटुंबाचा उद्योग आहे. हा उद्योग वेगळ्या उंचीवर नेण्याचे स्वप्न मी आधीपासूनच पाहिले होते. स्थलांतरण उद्योगाने मला नेहमीच भूरळ घातली आहे. जेव्हा 2007 मध्ये मी या उद्योगात पदार्पण केले तेव्हापासून माझे अनुभवविश्व अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाले आहे."

आकांक्षा या सतत देशभर भ्रमण करत असतात. पीएमआर उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी काही शहरांमध्ये सहा-सहा महिने थांबून त्या प्रयत्नशील असतात. आकांक्षा पीएमआरमध्ये सक्रिय झाल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांची संख्या देखील 40 हून वाढून 370 हून अधिक झाली आहे.

पीएमआरची आकड्यांमधील वाढ

आकांक्षा यांनी उद्योगाचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत 2 कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगाची उलाढाल 30 कोटींपर्यंत पोहोचली आहे. पीएमआरमधील मनुष्यबळाची विभागणी म्हणजे 130 हे व्हाईट कॉलर अर्थात खरेदी विभाग, विक्री विभाग, मार्केटिंग विभाग, कार्यकारी विभाग आणि ग्राहक सेवा यांचा यात समावेश आहे. उर्वरित कर्मचारी हे ब्लू कॉलर अर्थात कामगार वर्गात मोडणारा आहे.

सध्या पीएमआरकडून देण्यात येणाऱ्या सेवा या सर्वसाधारण मूव्हर्स आणि पॅकर्सपेक्षा दीडपट महाग आहेत. पण त्या आंतरराष्ट्रीय दर्जाची बरोबरी करणाऱ्या असून त्या तुलनेत स्वस्त आहेत. कंपनीला सध्या 10 ते 15 कोटींचा निधी नजिकच्या भविष्यात उभारायचा आहे.

पुरुषसत्ताक उद्योगातील आकांक्षा...

महिला उद्योजिका म्हणून आकांक्षा भार्गव यांचा लौकीक वाढत आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी या उद्योगात उडी घेतली. "हा संपूर्ण उद्योग पुरुषांनी काबीज केलेला आहे. पीएमआरसारख्या देशभर विस्तारलेल्या स्थलांतरण उद्योगाचे नेतृत्व करणारी एकमेव महिला म्हणून आकांक्षा ओळखल्या जातात, याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे त्या सांगतात. खरे तर हा उद्योग म्हणजे कामगारांशी संबंधित आणि महिलांसाठी अयोग्य असेच लौकीक असणारा आहे. "

आकांक्षा नम्रपणे म्हणतात...

आकांक्षा भार्गव

आकांक्षा भार्गव


पुरवठादारांशी बोलणे, कामगारांशी संवाद साधणे किंवा मोठ्या ग्राहकांशी व्यवहार ठरवणे ही पुरुषांची कामे असल्याचं मानले जाते. ही बाब माझ्यासाठी आव्हानात्मक होती. पण याची दुसरी बाजू म्हणजे, यासाठी लागणारे अत्युच्च दर्जाचे समर्पण, सतत प्रवास, कमी क्षमतेच्या व्यवस्थापनाशी तडजोड करणे, वेळोवेळी कामगार संघटनांकडून उपस्थित केले जाणारे मुद्दे, त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबी आणि वेळप्रसंगी स्थानिक राजकारण्यांशी संवाद साधून गुंता सोडवणे हे देखील कौशल्याचेच काम आहे. अनेकदा तुम्ही तरुण असल्याने सुरुवातीला कोणी तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे टीम म्हणून काही गोष्टी समजून घेणे, टीम मेंबर्सची निवड करताना या गोष्टीही ध्यानात घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे प्रत्येक पायरीवर तुमची कसोटी लागत असते.

उद्योजक असल्याचा आनंद...

आपण उद्योजक असल्याचा अभिमान तर आहेच, पण त्याचा आनंदही मोठा असतो. सुमारे साडेतीनशे कुटुंब चालवण्यात तुमचे योगदान असते, ही बाब देखील आनंद देणारी असल्याची भावना आकांक्षा यांनी बोलून दाखविली. "प्रत्येक सकाळी या जबाबदारीची जाणीव तुम्हाला होते. त्यातून या लोकांच्या चरितार्थासाठी तुम्हाला आशीर्वाद मिळतात, आणि हयातूनच मला बळ मिळते. मला अजूनही अनेक लोकांना रोजगार द्यायचा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला व्यावसायिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या काहीतरी शिकायला मिळावे, हा माझा उद्देश असल्याचेही आकांक्षा म्हणाल्या."

पीएमआरमुळे आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करणे अतिशय सहज, सोपे आणि ताणविरहित झाल्याचे अनेकांनी बोलून दाखविले आहे. ही बाब आपल्यासाठी आणि आपल्या टीमसाठी एक निराळा आनंद आणि समाधान देणारी असल्याचे आकांक्षा आवर्जून नमूद करतात. दर्जेदार सेवा हाच आमचा गौरवाचा भाग असून त्यातून पीएमआर सातत्याने पुढे जात आहे. आपल्या टीमसोबत छोटे छोटे यशाचे क्षण साजरे करण्यातूनही आकांक्षा यांना आनंद मिळतो.

वडिलांपासून मिळाली उद्योगाची प्रेरणा...

एवढे मोठे साम्राज्य उभे करण्याची प्रेरणा आकांक्षा यांना कशी मिळाली? यावर त्या म्हणतात, "माझे वडिल माझे सर्वांत मोठे प्रेरणास्थान आहेत. ते माझे शिक्षक, पालक आणि मित्र देखील आहेत. माझ्या क्षमतांवर त्यांची श्रद्धा आणि विश्वास असल्यानेच मी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करु शकले आहे. मला सतत पुढे जाण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात. माझ्या दृष्टिकोनातील विश्वास आणि श्रद्धा सतत माझे मनोबल उंचावत आले आहेत. त्यातही अधिक महत्त्वाचे म्हणजे तुमच्या सहकाऱ्यांचा तुमच्यावर असलेला विश्वास, ही तुमची ताकद बनून जाते."

पीएमआर टीमच्या जमेच्या बाजू...

टीम पीएमआर

टीम पीएमआर


आकांक्षा यांचा अत्युच्च दर्जाची सेवा देण्यावर आणि त्यासाठीची योग्य यंत्रणा निर्माण करण्यावर भर आहे. मग त्यांचे ग्राहक हे वन बीएचके मधील असोत अथवा फाइव्ह बीएचके मधील. या सर्वांना समान सेवा मिळायला हवी, यासाठी त्या आग्रही असतात. आकांक्षा यांना पीएमआरच्या विस्तारीकरणासाठी अनेक शहरांमध्ये वास्तव्य करावे लागले. त्यामुळे विविध प्रकारचा अनुभव आता त्यांच्या गाठिशी आहे. त्यात अगदी मोठ्या उद्योगांशी केलेल्या व्यवहारांचाही समावेश आहे.

काहीवेळेस लोकांची निवड करताना चुका झाल्या का...

या प्रश्नावर आकांक्षा म्हणतात, "मोठ्या ब्रॅन्ड्सशी संबंधित लोक तुमच्या फार उपयोगी ठरत नाहीत. नव्या कंपनीत अथवा उद्योगांमध्ये पदार्पण करताना त्यांना आधीच अनेक शंकांनी ग्रासलेले असते. काही वेळेस महिला बॉस असल्याने ग्राहकांना आणि सहकाऱ्यांना जुळवून घेणे कठीण जाते. "

भविष्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता....

पीएमआरची ओळख संपूर्ण देशभर वन स्टेप सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून व्हावी, असा मानस आहे. नजिकच्या भविष्यात कंपनी आपली मूव्ह टू दिल्ली डॉट कॉम ही वेबसाईट लॉन्च करणार आहे. तसेच मूव्ह टू बॉम्बे डॉट कॉम ही देखील स्वतंत्र वेबसाईट असेल. यातून ज्यांना कोणाला कुठेही स्थलांतर करायचे झाल्यास त्यांच्या गरजा आम्ही अत्युच्च दर्जा टिकवून करु शकू. आमची आणखी तीन स्वतंत्र कार्यालये सुरु होणार आहेत. शिवाय फाईन आर्ट्स मूव्हिंगच्या क्षेत्रातही आम्हाला विस्तार करायचा आहे, हे क्षेत्र सध्या फार विस्तारलेले नाही. पीएमआरचे ऍप्स आणण्याचाही विचार असल्याचे आकांक्षा भार्गव यांनी सांगितले.