चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरच्या मालिकांचे रसग्रहण करणारे आगळेवेगळे लेख !

0

'ज़िंदगी गुलज़ार है' आणि आपल्या मालिका : सायली राजाध्यक्ष

'ज़िंदगी गुलज़ार है' ही पाकिस्तानी मालिका भारतात इतकी लोकप्रिय का झाली? किंबहुना जगात ज्यांना-ज्यांना हिंदी भाषा कळते, त्या सगळ्या लोकांमध्ये ही मालिका इतकी प्रचंड लोकप्रिय का झाली? ‘जिंदगी’वर ही मालिका अनेकदा दाखवली गेली आणि प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रेमाने बघितली गेली. त्यात एरवी मालिकांना तुच्छ समजणारे उच्चभ्रू, बुद्धिजीवी वर्गातले लोकही होते ....


मालिकांच्या यशाचं रहस्य आणि आपण : सायली राजाध्यक्ष

मालिकेतली पात्रं स्थिरस्थावर करणं, नंतर त्यातल्या मुख्य पात्रांनी प्रेमात पडणं, त्या प्रेमाची मजा, मग त्यात काही कारणानं येणारं वितुष्ट, ते आणणारी विघ्नसंतोषी पात्रं, मग ते वितुष्ट दूर होणं, कदाचित त्यांचं लग्न, लग्नानंतरच्या समस्या असं सगळं झालं नाही तर मालिकेत रंगत कशी येणार? पण रोज आपण मालिका पाहताना आपल्याला त्या शेवटचा दिस गोड व्हायचीच आस असते. मालिकांमध्ये प्रेक्षकांचं इतकं गुंतून जाणं हेच मालिकांच्या यशा.......


उंदीर-मांजराचा जीवघेणा खेळ : चिंतामणी भिडे


हा वर्गसंघर्ष दुर्लक्षित करूनही निव्वळ उत्कंठावर्धक थरारपट म्हणून ‘स्ल्यूथ’ कमालीचा एन्जॉय करता येतोच. तद्दन व्यावसायिक चित्रपटातही अभिजात चित्रपटाच्या खाणाखुणा कशा प्रकारे मिरवता येतात आणि तरीही मनोरंजनाची कास न सोडता सामाजिक भाष्य कसं करता येतं, याचं ‘स्ल्यूथ’ हे उत्तम उदाहरण आहे...

‘कौल’ डोक्याला झिणझिण्या आणतो! : यश कदम


‘कौल’चा अनुभव त्यातील दृश्यांचा कालावधी, त्यांची पडद्यावरील योजना, त्यातील परिणामकारक पार्श्वसंगीत, अभिनय आणि एडिटिंग यांच्या मिश्रणातून आपल्यापर्यंत पोचतो. त्यासाठी एकच करावं लागतं. ते म्हणजे स्वतःला ‘कौल’च्या स्वाधीन करणं! चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर चित्रपट हा अर्धा दृश्यांचा आणि अर्धा आवाजांचाच असतो. ‘कौल’मधल्या आवाज आणि नादांमध्ये खरोखर इतकी ताकद आहे की, चित्रपट पाहताना मळमळायला लागतं.

‘आलिया भटा’शी असावे सादर! : मिताली तवसाळकर


‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सहभागी झालेल्या आलियाने तारे तोडले आणि ती सोशल मीडियावर ‘फेमस’ झाली. तिच्या सामान्य ज्ञानाचे वाभाडे काढणारे अनेक जोक्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. सामान्य ज्ञानाच्या अभावामुळे लोकांच्या हसण्याचा, टिंगलीचा विषय बनलेली आलिया भट वयाबरोबर आता शहाणी बनते आहे. वयाच्या २३ व्या वर्षी तिच्या गाठीशी चार वर्षांत आठ चित्रपट (त्यातले सात हिट, एक फ्लॉप) आहेत. ....