लोक ज्याला अशक्य म्हणतात त्यातूनच मला सर्वाधिक प्रेरणा मिळते : मिलेनी पार्किन्स.

0

‘त्या’ सुंदर आहेत, मृदूभाषी आहेत आणि त्यांच्यापर्यंत सहज पोहोचता देखील येते. मात्र, जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की, हे होणे अशक्य आहे. तेव्हा त्या तुम्हाला स्वतःमधील बलाढ्य इच्छाशक्ती दाखवतील. त्या सांगतात की, “ मला त्या गोष्टींपासून सर्वात जास्त प्रेरणा मिळते, ज्याबाबत लोक म्हणतात की, हे होऊच शकत नाही, हे अशक्य आहे किंवा हे तर अद्याप कधी केलेच नाही. तेव्हा मला वाटते की, मला हे केलेच पाहिजे. याच विचाराने 'कॅन्वा' (Canva) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह – संस्थापक मेलानी पर्किन्स यांना जीवनात दृढ निश्चयी बनविले. कॅन्वा संगणकाच्या माध्यमातून चित्रात्मक नक्षीकाम करण्याचे व्यासपीठ आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मध्ये जन्मलेल्या मेलानी यांच्याकडे एक नाही, तर दोन बहु दशलक्ष डॉलर स्टार्टअप्स आहेत. त्या नक्षीकाम करण्यातच आपले आयुष्य जगत असतात. ऑस्ट्रेलियामध्ये पर्यावरण व्यवस्थेच्या प्रारंभाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी, नक्षीकामाबद्धल त्यांचे असलेले प्रेम जाणून घेण्यासाठी आणि भारतात कॅन्वाच्या अनावरणाबाबत ‘हरस्टोरी’ ने त्यांचाशी संवाद साधला.

चित्रात्मक नक्षीकाम शिकणे

मेलानी यांनी नक्षीकाम शिकण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतले नाही. ऑस्ट्रेलियात संवादाचे शिक्षण घेताना त्यांना डिजिटल मिडिया आणि चित्रात्मक नक्षीकाम या क्षेत्रात आवड निर्माण होऊ लागली. या विषयासाठी त्यांची ओढ आणि समर्पण इतके होते की, विद्यापीठाने त्यांना पुढीलवर्षी आपल्या ज्ञानप्रसारासाठी निमंत्रित केले. त्यानंतर त्यांना नक्षीकाम अधिकाधिक पसंतीस पडू लागले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. २००७ मध्ये नक्षीकाम आणि फोटोशॉप शिकवताना त्यांना हे जाणवले की, विद्यार्थी शिकण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळेच त्यांनी ओळखले की, नक्षीकाम हेच भविष्य आहे आणि आता वेळ आली आहे की, त्याला योग्य सहकार्य, साधे आणि उपयोगपूर्ण बनविले जावे. त्यांनी क्लिफ ओबरेक्ट यांच्यासोबत मिळून फ्युजन बुक्सची सुरुवात केली. हे एक शाळेतील वार्षिक माहिती ठेवण्याचे संगणकीय माध्यम आहे. स्मितहास्य देत मेलानी सांगतात की, फ्युजन बुक्स अद्यापही चांगले काम करत आहे.

पर्थ मध्ये मेलानी यांना ‘इनोवेटर ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेव्हा मेलानी आणि त्यांचे सह – संस्थापक फ्युजन बुक्स प्रस्तुत करत होते. तेव्हा त्यांची भेट ‘मायताई’चे संस्थापक आणि सॅन फ्रान्सिस्कोचे गुंतवणूकदार बिल ताई यांच्याशी झाली. बिल यांनी त्यांना भेटीचे वचन देण्यासोबतच सॅन फ्रासिस्कोला येण्याचेही निमंत्रण दिले. सिलिकॉन वॅली मध्ये घालवलेल्या दिवसांची आठवण काढत त्या सांगतात की, “त्यांनी सांगितले की, जर मी सॅन फ्रान्सिस्कोला आले तर ते खूप खूष होतील. मी विमानात बसले आणि त्यांची भेट घेण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला गेले. तेथे स्टार्टअपच्या जगाचे ज्ञान घेण्यासाठी तीन महिने व्यतीत केले आणि जे शक्य होते ते शिकले.” सॅन-फ्रान्सिस्कोमध्ये राहताना त्यांची भेट गुगल मॅप्स चे सह-संस्थापक लार्स रास्मुसेन यांच्याशी झाली. तसेच त्यांनी व्हॅलीमध्ये गुंतवणूकदार आणि अभियंत्यांची भेट घेऊन कॅन्वाबाबत चर्चा केली. २०१३ च्या सुरुवातीस कंपनीला ३ दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला आणि त्याचे २०१३ मध्ये अनावरण करण्यात आले. लार्स, बिल आणि मॅट्रिक्स पार्टनर्स काही गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. २०१४ च्या सुरुवातीस अॅप्पलचे माजी कार्यकारी गाय कावासाकी इवॅन्जलिस्ट  ( नव्या कराराच्या लेखकांपैकी एक ) म्हणून कॅन्वामध्ये सामील झाले. मेलानी यांच्यामते काही वर्षात नक्षीकामाचे जग बदलले आहे. त्या सांगतात की, “आज प्रत्येक व्यक्ती नक्षीकामाबाबत जागरूक आहे. प्रत्येक कामात आज नक्षीकामाची गरज आहे. मात्र नक्षीदाराची नाही. उदाहरणच सांगायचे झाले तर, विक्री, विपणन आणि समूहसंपर्क माध्यमातील तज्ज्ञ चित्रात्मक गोष्टींकडे येत आहेत.” मेलानी सांगतात की, आज प्रत्येकाचे लक्ष स्पष्ट संवादावर केंद्रित आहे आणि हिच बाब आज नक्षीदारावर दबाव आणते की, नक्षीकाम हे संवादावर आधारित असले पाहिजे. हे असे एक कौशल्य आहे की, जे प्रत्येकाकडे असले पाहिजे आणि येथेच आम्ही आमचे कार्यस्थळ बनविले आहे. निधीच्या विषयावर मेलानी सांगतात की, “अनेक असे स्टार्टअप्स आहेत, जे निधी उभारण्याला एखाद्या लक्ष्याप्रमाणेच घेतात. तर उलट त्यांना स्थायी कंपनी बनविण्याबाबत विचार केला पाहिजे. विशेषकरून सिलीकॉनव्हॅली मध्ये असे होते. गुंतवणुकीत प्राथमिकता नसावी, त्यांची प्राथमिकता समस्या सोडविण्यात असली पाहिजे, ज्यामुळे लोकांना वास्तवात फरक जाणवेल. त्यांचा स्वतःचा प्रवास खूप सोपा राहिलेला नाही. मेलानी यांनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. त्या सांगतात की, “कंपनीत घेण्यात आलेल्या प्रत्येक लहान निर्णयासाठी, आम्हाला अनेक अस्विकृतींना मान्य करावे लागले. बरखास्त झाल्यानंतर माझी स्वाभाविक प्रतिक्रिया असेल की, तुम्हाला असे वाटेल की, तुम्हाला पुन्हा प्रयत्न करणेच सोडले पाहिजे. मात्र, जेव्हा तुमच्याकडे अशी कंपनी असेल तर, तुम्हाला समजेल की, हा एक प्रक्रियेचा भाग आहे.” मेलानी यांचे सह- संस्थापक त्यांचे प्रियकर देखील आहेत. त्या सांगतात की,” आम्ही अनेक वेळ महत्वाच्या गोष्टींची चर्चा करण्यात व्यतीत करतो. एक वर्ष शोधल्यानंतर त्यांना तंत्रज्ञानाचे सह-संस्थापक म्हणून कॅमरन एडम्स २०१२ मध्ये भेटले. 

ऑस्ट्रेलिया मध्ये पर्यावरण व्यवस्थेच्या प्रारंभाबाबत मेलानी सांगतात की, जेव्हा आम्ही २००७ मध्ये सुरुवात केली तर, मला काहीच माहित नव्हते. मात्र, आता हे वास्तवात जोमाने गती पकडत आहे. साधारणतः लोक या व्यवसायाने प्रेरित आहेत आणि स्टार्टअप सुरु करत आहेत. मिडियामध्ये देखील सामान्य जागरूकता वाढत आहे. लोक आता यात आपली कारकीर्द घडविण्याचा विचार करत आहेत. मला वाटते की, हे अधिक सामान्य होत आहे. जेथे महिलांच्या उत्साहाचा मुद्दा आहे, तेथे देखील गती वाढत आहे. माझे मत आहे की, अधिकाधिक लोक हे म्हणतात की, हे शक्य आहे वास्तवात अधिक शक्यता याच्या होण्यानेच आहे.”


लेखक : तन्वी दुबे

अनुवाद : किशोर आपटे.