त्या सनदी अधिकारी झाल्या आणि वडिलांच्या मृत्यूचा ३१ वर्षांनी संघर्षातून न्याय मिळवला!

0

खोट्या चकमकीत होणारे मृत्यू हे आपल्या देशातील जळजळीत वास्तव आहे. अनेकदा या चकमकीतून निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचे पहायला मिळते. ३५ वर्षांपूर्वी अशाच एका खोट्या चकमकीत उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात १३ जणांना टिपण्यात आले. त्यात एक होते जिल्हा पोलिस उपप्रमुख के पी सिंग. या घटनेमागे ज्यांचा हात होता त्यांना शिक्षा देण्याचा आणि त्यांना गजाआड करण्याचा प्रयत्न किंजल सिंग आणि त्यांच्या आईनं केला. 


Image source: Viral Blog
Image source: Viral Blog

अगदी लहान वयात, जेंव्हा सारी मुले बाहेर खेळत असत, किंजल त्यांच्या आई विभा यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील लहानश्या गावातून दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा काटत होत्या. विभा या एकटी आई आणि समर्पित पत्नी होत्या त्यांना नंतर वाराणसी येथे कोषागार विभागात नोकरी मिळाली आणि मुलीचे शिक्षण आणि पतिच्या मृत्य़ूनंतर त्याला न्याय मिळवून देण्यात त्यांचे जीवन व्यतीत झाले. हा संघर्ष ३१ वर्ष सुरु होता त्या नंतर त्यांना न्याय मिळाला.

जिल्हा पोलिस उप प्रमुख केपी सिंग यांच्या सहका-यांनीच त्यांचा खून करून त्यांचा चकमकीत मृत्यू झाल्याचे भासविले होते. कारण या प्रामाणिक अधिका-याकडून त्यांच्या कुकृत्यांचा पर्दाफाश होण्याची त्यांना भिती होती. सरोज- ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाच घेतल्याच्या अनेक गुन्ह्याचे खटले होते, त्यांनी आणि इतर काही जणांनी माधवपूर येथे काही संशयीत हालचाली दिसल्या असल्याचे सांगत सिंग यांना बोलावून घेतले, दोन पोलिस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले जेथे राम भुलावन आणि अर्जून पासी हे दोन गुन्हेगार लपले होते. सिंग यांनी दरवाजा वाजविल्यानंतर कुणीच प्रतिसाद दिला नाही त्यावेळी, ते मागे वळले आणि सरोज यांच्याकडे जावू लागले, त्यावेळी सरोज यांनी त्यांच्या छातीवर गोळ्या घातल्या, रुग्णालयात नेईपर्यंत सिंग यांची प्राणज्योत मालवली होती. १२ इतर गावकरी देखील या बनावट चकमकीत मारले गेले होते. किंजल, ज्यांनी जवळपास रोजच त्यांच्या गावातून सर्वोच्च न्यायालयात दिल्लीला फे-या मारल्या, मन लावून अभ्यास करत. त्यांना दिल्लीच्या प्रतिष्ठीत लेडी श्रीराम महाविद्यालयात प्रवेशही मिळाला परंतू वडीलांचे छ्त्र नाहीसे झालेल्या त्यांना आणि त्यांच्या लहान बहिणीला त्यावेळीच एक भयानक माहिती समजली. त्यांच्या आईला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्या रोगाशी लढता लढता त्यांचा मृत्यू त्यावेळी झाला ज्यावेळी त्यांना त्यांच्या दोन्ही मुली सनदी अधिकारी होणार, आणि वडिलांच्या मृत्यूला न्याय मिळवणार याची खात्री झाली होती. किंजल यांनी त्यांच्या पालकांबद्दल बोलताना सांगितले की, “ माझे वडील एक प्रामाणिक पोलिस अधिकारी होते आणि माझी आई एकटी समर्थ पालक आणि त्यांच्या निधनानंतर विधवा होती, जी पतीवरील अन्यायाशी लढण्यासाठी उभी राहिली होती”.

के पी सिंग यांचे सनदी अधिकारी व्हायचे स्वप्न होते जे त्यांच्या मुलींनी नंतर पूर्ण केले. आईच्या निधना नंतर किंजल त्यांच्या अंतिम परिक्षेसाठी महाविद्यालयात परतल्या. त्यांच्या पदवी परिक्षेनंतर त्यांनी त्यांची लहान बहिण प्रांजल यांना देखील दिल्लीत आणले. त्या दोघींनी त्यांच्या केंद्रीय सेवा परिक्षेच्या अभ्यासात लक्ष दिले. २००७मध्ये त्या दोघी या परिक्षेत उत्तिर्ण झाल्या, त्यात किंजल यांना २५व्या तर प्रांजल यांना २५२व्या श्रेणीत यश मिळाले.

किंजल आणि प्रांजल या दोघींनी नंतर त्यांच्या वडिलांच्या खून्यांना शिक्षा देण्याच्या कामी सारी शक्ति पणाला लावली. त्यांचा निर्धार होता की त्या सारी न्याय व्यवस्था हलवून टाकतील, शेवटी त्यांच्या बाजूने न्याय झालाच. २०१३मध्ये ३१ वर्षानी त्यांच्या संघर्षाला यश आले, लखनौ येथील विशेष सीबीआय न्यायालयात या हत्याकांडात दोषी असलेल्या १८ जणांना शिक्षा सुनावली जे डिसीपी सिंग यांच्या खुनात सहभागी होते.

“ माझ्या वडीलांचा खून झाला त्यावेळी मी केवळ अडीच महिन्याची होते, मला ते कसे होते आठवतही नाहीत. पण २००४मध्ये कर्करोगाने ग्रासे पर्यंत माझी आई विभा यांनी त्यांच्या खूनाच्या मारेक-यांना शिक्षा देण्यासाठी कसा संघर्ष केला ते मी जवळून अनुभवले होते. आज ती हवी होती, मला खात्री आहे, हा क्षण ती जगली असती. 

किंजल सिंग या प्रामाणिक आणि समर्पित सनदी अधिकारी आहेत, त्यांच्या जीवनात घडलेल्या सा-या वाईट गोष्टीतूनच त्यांनी नव्या जगण्याची प्रेरणा घेतली आहे.

- थिंक चेंज इंडिया