ऑनलाईन हॉटेल बुकिंगमधून हॉटेल मालकांना फायदा मिळवून देणारं ‘रुम सेंट्रल’

ऑनलाईन हॉटेल बुकिंगमधून हॉटेल मालकांना फायदा मिळवून देणारं ‘रुम सेंट्रल’

Tuesday November 24, 2015,

2 min Read

आजच्या काळात ग्राहकांना प्रवास आणि हॉटेल बुकिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तसंच तांत्रिक बाबींवरील समस्यांचे उपायही २४ तासात उपलब्ध होतात. पण तरीही या क्षेत्रात अजूनही व्यावसायिकेतचा शिरकाव झालेला नाही असं रुमसेंट्रल (Room Central) चे संस्थापक अतुल प्रभू आणि रुपम मुजुमदार यांना वाटतं. रुमसेंट्रल हे छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या हॉटेल्ससाठी तयार केलेलं क्लाउडवर आधारित बुकिंग इंजिन आहे. आदरातिथ्य आणि वाहतूक उद्योगातील काम सुरळीत व्हावं तसंच त्यात दक्षता असावी आणि लाभही मिळावा या हेतूने प्रभू आणि मुजुमदार या जोडीने हे बुकिंग इंजिन बनवलं आहे.

या इंजिनच्या माध्यमातून हॉटेल मालकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहकांचं समाधान करण्यासाठी सर्व आवश्यक सोयी आणि कार्यक्षमता वाढवण्याची संधी मिळते. या सोप्या इंटरफेसच्या माध्यमातून सर्व कामं एकत्रित पद्धतीनं नियंत्रित करता येतात, उदा. हॉटेल मालकांना कमी वेळेत त्यांच्या जास्तीत जास्त रुम्सचे बुकिंग तसंच व्यवस्थापन आणि यादीचं वितरण करण्याचं स्वातंत्र्य मिळतं, असं अतुल सांगतात. हॉटेल मालकांना फायदा मिळावा यासाठी रुम्सचं बुकिंग आणि व्यवस्थापन कौशल्यानं करु शकेल अशा तांत्रिक प्रणालीची गरज असल्याचं या दोघांना जाणवलं होतं आणि त्यातूनच ही संकल्पना जन्माला आली.

रुमसेंट्रल हे बंगळुरूमधील होस्ट्रा सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचं सर्व सोयींनी युक्त आणि स्वयंचलित रियल टाईम बुकिंग इंजिन आहे. याद्वारे एकत्रितपणे एक यादी तयार होते आणि वेबसाईटच्या माध्यमातून बुकिंग करता येतं. प्रत्यक्षात याद्वारे तयार केलेली यादी ऑनलाईन बुकिंग इंजिन, हॉटेल व्यवस्थापन आणि ओटीएला जोडली जाते.


image


फ्रंट डेस्क इंटिग्रेशनच्या माध्यमातून कोणत्याही वेळेला हॉटेलमधील आऱक्षणाची माहिती मिळवता येते. त्याशिवाय हॉटेलमध्ये वॉक इन किंवा चेक इन करण्याबाबतही माहिती मिळवता येते. तर या इंजिनद्वारे सिंगल स्क्रीन इंटिग्रेशनच्या माध्यमातून हॉटेलमधील सर्व हालचालींवर लक्ष ठेवता येतं.

या टीमच्या कामासाठी नुकतीच हॉटेल आणि आदरातिथ्य क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या कर्णपाल सिंह यांनी २० लाख अमेरिकेन डॉलरची गुंतवणूक केली आहे. कर्णपाल सिंह यांच्या दिल्ली, गोवा आणि ओरिसामध्ये अनेक हॉटेल्स आहेत. अनेक वर्ष काम केल्यानंतर या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचं जाणवत होतं आणि रुमसेंट्रलच्या रुपानं मला योग्य साथीदार सापडला, असं कर्णपाल सिंह सांगतात.

सध्या भारताच्या बाजारपेठेत विस्तार करुन भक्कमपणे उभं राहण्यासाठी रुमसेंट्रलचं काम वेगानं सुरू आहे आणि लवकरच जागतिक बाजारपेठेत उतरण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. आमचं तंत्रज्ञान वापरण्याऱ्या प्रथम वापरकर्त्याची प्रतिक्रिया आम्हाला सुधारणेसाठी उपयुक्त पडते, असं अतुल सांगतात. वाहतूक आणि हॉटेल क्षेत्रात एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार असल्याचं अतुल सांगतात.

हॉटेल मार्केटिंगच्या माहितीनुसार ऑनलाईन हॉटेल बुकिंगच्या या क्षेत्रावर गुगलचीही नजर आहे. आयबीबो या समुहाने नुकताच क्लाउडवर आधारित एक बुकिंग इंजिन क्रनइव्हचा हिस्सा खरेदी केला आहे. जागतिक पातळीवरही ओटीए आणि बुकिंग इंजिनच्या क्षेत्रात स्पर्धा वाढलीये. या क्षेत्रात रुमसेंट्रलशिवाय रुमकी आणि हॉटेलविकलीसारखे इतरही स्पर्धक यशस्वीपणे काम करत आहेत.


लेखक - निशांत गोयल

अनुवाद- सचिन जोशी