लहानपणी आईसोबत रस्त्यांवर बांगड्या विकणारा कसा बनला आयएएस अधिकारी...

0

असे म्हणतात की, अनेक अडथळे देखील कुणाची मेहनत, जिद्द आणि मनोधैर्याला रोखू शकत नाही. खरी मेहनत, प्रामाणिक प्रयत्न आणि ज्याच्याकडे काहीतरी करण्याची क्षमता असेल, ती व्यक्ती आपले ध्येय गाठ्तेच. भारताचे राष्ट्रपतीपद भुषविलेले मिसाईल मँन स्व. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनीदेखील म्हणूनच म्हटले होते “लहान स्वप्ने बघणे गुन्हा आहे. (Dreaming small is a crime)” कदाचित हीच ती मोठी स्वप्ने होती, जी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील वारसी तहसीलच्या महागावच्या रमेश घोलप यांना यशाच्या या मार्गावर घेऊन आली आहे. 

काचेच्या रंगीबेरंगी बांगड्यांप्रमाणेच रमेश यांचे लहानपण रंगानी भरलेले अजिबात नव्हते. प्रत्येक सकाळी जेव्हा तो लहानसा जीव आपल्या आईसोबत आग ओकणा-या उन्हात गावातल्या गल्लोगल्ली, रस्त्यांवर अनवाणी पायांनी बांगड्या विकण्यासाठी निघायचा, तेव्हा दोन वेळच्या जेवणासाठी त्याच्या संघर्षाची कहाणी प्रत्येक दिवशी प्रत्येकवेळेला एखाद्या युद्धासारखी असायची. आईच्या मागोमाग तो देखील रस्त्यांवर बांगड्या विकण्यासाठी खटाटोप करायचा. आई जेव्हा रस्त्यांवर ओरडायची की, चुडी ले लो... चुडी... तेव्हा तो मुलगा देखील पाठीमागून तोत-या आवाजात “तुली लो.. तुली” असे बोलायचा. 

भूक अशा परिस्थितीला जन्म देते, जेथे चांगल्यात चांगल्या व्यक्तीचे मनौधैर्य अनेकदा ढासळते. परंतु एक म्हण आहे नं, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. परिस्थिती त्यांना आयुष्यासाठी लढायला शिकविते, त्याच गरिबीने, वडिलांची मद्यपानाची सवय आणि भुकेने व्याकूळ या लहानशा जीवाच्या डोळ्यात एक स्वप्न जन्मले. खाली हात, डोक्यावर छप्पर नाही, लेखणीच्या बळावर कठीण परिश्रम आणि खरी इमानदारी आणि काहीतरी करून दाखविण्याची जिद्द यामुळे त्यांनी आपले स्वप्न सत्यात साकारले, जे आज लाखो लोकांसाठी प्रेरणा आहेत. त्यांचे नाव ‘आयएएस रमेश घोलप’ आहे. आयुष्याने प्रत्येक वळणावर परीक्षा घेतली, परंतु रमेश घोलप कधीच आपले लक्ष्य विसरले नाहीत.

सध्या रमेश घोलप झारखंड मंत्रालयाच्या उर्जा विभागात संयुक्त सचिव आहेत आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रेरणा बनून लाखो लोकांच्या जीवनात उर्जा निर्माण करत आहे. रमेश यांचे वडील मद्याच्या वाईट सवयीमुळे कधीच आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नव्हते. जगण्यासाठी रमेश आणि त्यांच्या आईला रस्त्यांवर जाऊन काचेच्या बांगड्यांची विक्री व्हावी म्हणून खूप त्रास घ्यावा लागत होता. त्यामुळे जे पैसे मिळतील, त्याला देखील रमेश यांचे वडील दारूवर खर्च करून टाकायचे.

रमेश यांच्याकडे राहण्यासाठी घर तर नव्ह्तेच, शिवाय शिक्षणासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. होते ते केवळ मनौधैर्य, जे त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुरेसे होते. रमेश यांचे लहानपण त्यांच्या मावशीला मिळालेल्या सरकारी योजनेमार्फत इंदिरा आवासमध्ये व्यतीत झाले. ते तेथे जगण्यासाठी मेहनत तर घेतच होते, शिवाय शिक्षण देखील घेत होते. मात्र आयुष्याने रमेश यांना अजून एक मोठा धक्का दिला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी काहीच दिवस शिल्लक होते, तेव्हा रमेश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेला त्यांना मनापासून खूप हळवे केले, मात्र आयुष्याशी इतके झगडूनही रमेश यांनी आपले मनौधैर्य सोडले नाही. विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली आणि ८८.५० टक्के गुण मिळवले. 

रमेश घोलप सांगतात की, “आपल्या संघर्षाच्या वेळी मी ते दिवस देखील पाहिले होते, जेव्हा घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता. त्यामुळे शिक्षणासाठी रुपये खर्च करणे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एकदा आईला सामुहिक ऋणयोजनेमार्फत गाय विकत घेण्यासाठी १८हजार रुपये मिळाले, ज्याचा उपयोग मी शिक्षणासाठी केला आणि गाव सोडून या विचारांनी बाहेर पडलो की, ते काहीतरी बनूनच गावात परतेन. सुरुवातीस मी तहसीलदाराचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि तहसीलदारची परीक्षा पास करून तहसीलदार बनलो, मात्र काही काळानंतर मी आयएएस होण्याचे लक्ष्य निश्चित केले.” 

असे म्हणतात की, प्रयत्न करणा-यांचा कधीच पराभव होत नाही. या गोष्टीला पुन्हा सिद्ध करणा-या रमेश घोलप यांची कहाणी आता महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या वारसी तहसील आणि त्यांच्या गावातील मुलांसहित वडीलधा-या व्यक्तींच्या तोंडावर आहे. संघर्षाची कहाणी लहान लहान मुलगा जाणतो. कठीण प्रसंगी रमेश यांनी भिंतींवर मंत्र्यांच्या निवडणुकीचे नारे, वचने आणि घोषणा इत्यादी, दुकानांचा प्रचार, लग्नात पेंटिंग करायचे. या सर्वातून जे थोडे बहुत देखील पैसे मिळायचे, ते पैसे ते शिक्षणासाठी खर्च करायचे.

कलेक्टर बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन रमेश पुण्याला पोहोचले. असे असूनही, पहिल्या प्रयत्नात रमेश अपयशी झाले. असे वाटले की, पुन्हा एकदा आयुष्याने रमेश यांच्या विचारांना अखेरचे आजमावण्याचे मन बनविले आहे. मात्र, मजबूत विचार आणि उच्च मनौधैर्य यामुळे ते कधीच स्वतःची हिम्मत हारले नाहीत. वर्ष २०११मध्ये पुन्हा एकदा युपीएससीची परीक्षा दिली. त्यात रमेश यांना २८७वे स्थान मिळाले. याप्रकारे त्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

रमेश आपल्या गावात व्यतीत केलेल्या आठवणींना उजाळा देत सांगतात की, “मी आपल्या आईला २०१०च्या पंचायती निवडणुकीत लढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. मला वाटत होते गावातल्या लोकांचा सहयोग मिळेल, मात्र आईला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी मी निश्चय केला होता की, या गावात मी तेव्हाच आपले पाय ठेवील जेव्हा, अधिकारी बनून येईल.”

आयएएस बनल्यानंतर जेव्हा ४ मे २०१२ला अधिकारी बनून पहिल्यांदा गावी परतलो, तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. अखेर का होणार नाही? त्यांचे उदाहरण आता लहान लहान मुलांना दिले जात होते. त्यांनी आपल्या मनोधैर्याच्या बळावर हे सिद्ध केले होते, जेथे इच्छा आहे तेथेच रस्ता आहे. त्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्न केले पाहिजे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एक चहा बनविणारा बनला चार्टर्ड अकौंटंट, महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रांड एम्बेसडर !

सर्व अडचणींवर मात करत अंध सिद्धूची कमाल, ९९ कोटीपर्यंत पाढे तोंडपाठ, आता तयारी आयएएसची...

आईच्या आजाराने घडवलेला डॉक्टर.... 

लेखक : कुलदीप भारव्दाज
अनुवाद : किशोर आपटे