जगाला आपल्या कवेत करण्यासाठी पाहिजे ‘संकल्प’, एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी शेकडो मुलांना दाखवला आशेचा किरण

जगाला आपल्या कवेत करण्यासाठी पाहिजे ‘संकल्प’, एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी शेकडो मुलांना दाखवला आशेचा किरण

Monday December 14, 2015,

4 min Read

कोणत्याही छोट्या गोष्टीची सुरुवात करणे हे आपल्या स्वतःसाठी देखील आव्हानात्मक असते. आपण जर हिम्मत आणि मेहनतीची कास धरुन वाटचाल केली तर आपण आपली अर्धी बाजी सर करतो. ७ वर्षापूर्वी जमशेदपूरच्या नॅशनल इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे NIT च्या माजी विद्यार्थ्यांचा एक छोटासा प्रयत्न, आज आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये उर्जेचे काम करीत आहे. कधी काळी एनआयटीच्या खानावळीमध्ये काम करणारी ही छोटी मुले आज वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी शाळेत शिकत आहेत. इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून कालपर्यंत शिकलेले हे मुलं आज स्वत: इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या प्रकारचे उच्च शिक्षण पण घेत आहेत. शिवेंद्र श्रीवास्तव जे एनआयटीचे माजी विद्यार्थी आणि ‘संकल्प’ चे संस्थापक आहेत ते सांगतात की, "आम्ही कोणतीही योजना आखून कामाला सुरवात केली नव्हती, पण आज आमची संस्था तीन राज्यांमध्ये कार्यरत आहे".


image


यूपीच्या गोरखपूरमध्ये राहणारे शिवेंद्र श्रीवास्तव यांचे बालपण गरिबीत गेले पण अभ्यासात हुशार असणारे शिवेंद्र यांनी एनआयटी, जमशेदपूरमध्ये प्रवेश मिळविला. इथे त्यांनी इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून टाटा स्टील मध्ये कामाची सुरुवात केली. अभ्यासादरम्यान शिवेंद्र आपल्या मित्रांसोबत फावल्या वेळेत जवळच्या आदिवासी पाड्यात फेरफटका मारायचे. त्यांना जाणवले की इथल्या गरीब परिस्थितीमुळे ही मुले शाळेत जावू शकत नाही. मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांनी आपले मित्र स्वीकृती आणि विक्रांत यांना सांगितली. यानंतर जवळपास ३० मुलांना जमा करून ‘संकल्प’ नावाने आपली मोहीम सुरु केली.


image


मुलांना शिकतांना बघून त्यांचे पालक खुश झाले त्याचबरोबर त्यांनी शिवेंद्र आणि त्यांच्या मित्रांना गावातल्या इतर अनेक मुलांना शिकवण्याचा आग्रह केला. याप्रकारे त्यांनी सन २००८ मध्ये मोहननगर भागातल्या मुलांना शिकवण्याचे काम सुरु केले, ज्यांनी कधी कोणत्याही शाळेचे नावसुद्धा ऐकले नव्हते. सन २००९ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शिवेंद्र यांना टाटा स्टीलमध्ये नोकरी मिळाली. पण त्यांच्या ज्युनिअर मुलांनी शिकवण्याच्या कामात कधी खंड पडू दिला नाही. तसेच त्यांनी यशस्वीपणे त्यांचे कार्य हाताळले. आपल्या ज्युनिअरच्या योगदानाने शिवेंद्र अतिशय खुश होते. तसेच मुलांना कशा प्रकारे शिकवायचे व त्यांच्या गरजा काय आहे याचे शिवेंद्र वेळोवेळी मार्गदर्शन करायचे.


image


दिवसेंदिवस मुलांची अभ्यासातील रुची वाढू लागली तसेच त्यांची संख्या पण वाढू लागली. शिवेंद्र आणि त्यांच्या सहकार्यांच्या उत्साहाने पण जोम धरला. आतापर्यंत त्यांच्याकडे २०० मुले शिकत होती पण शिवेंद्र यांची इच्छा होती की या मुलांना अधिकृतपणे शाळेत जावून पदवी घेता यावी. पण मुलांचे पालक या गोष्टीला अजिबात तयार नव्हते. आता शिवेंद्र यांच्या समोर एकच पर्याय होता तो म्हणजे मुलांच्या पालकांचे समुपदेशन करणे, ज्यांची अजिबात इच्छा नव्हती की आपल्या मुलांनी कोणत्याही शाळेत जावून शिक्षण घ्यावे. याव्यतिरिक्त शिवेंद्र आणि त्यांच्या सहकार्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक खासगी सभांचे आयोजन केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले व त्यानंतर त्यांनी मागासवर्गीय भागातल्या मुलांचा प्रवेश वेगवेगळ्या शाळेत केला. पण शिवेंद्र आणि त्यांच्या सहकार्यांनी शिक्षणाचे काम चालूच ठेवले. यामुळे जी मुले शाळेत जायला लागली ती नंतर त्यांच्याकडे अभ्यासासाठी येऊ लागली.


image


एकीकडे मुले शिकत होती तर या भागात शिक्षणाप्रती लोक हळूहळू जागृत होऊ लागले तर दुसरीकडे एनआयटी च्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यात याप्रकारचे काम करण्याची इच्छा दर्शविली, ज्यासाठी त्यांना शिवेंद्रने मदत केली. यानंतर जमशेदपूर व्यतिरिक्त बिहारच्या मधेपुरा आणि वाराणशीच्या बीएचयू तसेच धनबाद मध्ये ‘संकल्प’ चे काम सुरु झाले आहे.


image


याप्रकारे ‘संकल्प’ चे एकूण ८ सेंटर चालू झाले आहेत. जमशेदपूरच्या सेंटर मध्ये जास्तीत जास्त एनआयटी चे विद्यार्थीच मुलांना शिकवण्याचे काम करीत आहेत. पण जमशेदपूर सोडून इतर सेंटरमध्ये बाहेरचे शिक्षक पण शिकवण्याचे काम करीत आहेत.

‘संकल्प’ चा उद्देश फक्त मुलांना शिकवण्याचाच नाहीतर त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा आहे. हेच एक कारण आहे की जे मुलं अभ्यासात हुशार आहे त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. आतापर्यंत मागच्या तीन वर्षामध्ये ते ५४ मुलांना खासगी शाळेत प्रवेश मिळवून देण्यात सफल झाले आहेत. या मुलांमध्ये २८ मुले आणि २६ मुली होत्या. ज्या शाळेत यांना प्रवेश मिळाला त्यात ख्रिश्चन मिशनरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, रामकृष्ण मिशन स्कूल व डीएव्ही स्कूल यासारख्या शाळांचा समावेश आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गणवेश, पुस्तके इ. चा खर्च ही संस्था करते. या शाळेत मुले पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत आणि या सगळ्या मुलांना एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी दत्तक घेवून त्यांचा शाळेचा खर्च करीत आहे.

‘संकल्प’ मध्ये असे अनेक मुले आहेत जे फक्त पदवीच घेत नाहीतर वेगवेगळ्या ठिकाणी इंजीनियरिंगचा अभ्यास पण करीत आहे. तसेच हे लोक वेळोवेळी हुशार मुलांच्या परीक्षा पण घेत असतात जेणेकरून त्यांना नवोदय शाळेसारख्या किंवा इतर चांगल्या शाळेत प्रवेश मिळू शकेल. ‘संकल्प’ मध्ये शिकणारे ९०% मुले हे अनुसूचित जाती व जमातीतून आलेले आहेत. तसेच एनआयटी मध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी दर महिन्याला १० रुपये ‘संकल्प’ ला देतो. ‘संकल्प’ ची एक वेगळी टीम आहे जी पुरस्कृत मुलांच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करते आणि त्यांच्यातल्या एखाद्या कमीला सुधारण्याचे काम करते.


image


शिवेंद्र आणि त्यांची संस्था ‘संकल्प’ फक्त मुलांना शिक्षित करीत नाही तर त्यांच्या ५० पालकांना पण शिक्षित करीत आहे. भविष्यातील योजनेबद्दल शिवेंद्र सांगतात की आम्ही देशभरातले ३६ असे जिल्हे निवडले आहे की जिथे अशा मुलांची संख्या जास्त आहे, ज्यांना काही कारणाने पालकांमुळे शाळा सोडण्यास भाग पडले. त्यांची संस्था प्रयत्नशील आहे की निदान अशा मुलांना कमीत कमी प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. 

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close