वेबसाईट्सच्या निर्मितीपासून डिजिटल मार्केटिंगपर्यंत सर्वकाही पुरवणारी ‘नीड वेबसाईट्स’

वेबसाईट्सच्या निर्मितीपासून डिजिटल मार्केटिंगपर्यंत सर्वकाही पुरवणारी ‘नीड वेबसाईट्स’

Monday November 23, 2015,

2 min Read

मुळचे कोलकात्याचे असलेले उद्योजक इंद्रशीष चटर्जी यांना सुरुवातीपासूनच स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इच्छा होती. ही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून २०१३ मध्ये ‘नीड वेबसाईट्स’(Need Websites)ची स्थापना केली. चार जणांच्या सहाय्यानं त्यांनी एका इमारतीच्या गोदामात आपला व्यवसाय सुरू केला. पण या गोदामापासून ते शहराच्या आयटी केंद्रातील प्रमुख ठिकाणी कार्यालय सुरू करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आव्हानात्मक ठरलाय.

नीड वेबसाईट्स हे एक बिझनेस टू बिझनेस या तत्वावर आधारित व्यासपीठ आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर असतो असं नीड वेबसाईट्सचे सह संस्थापक इंद्रशीष सांगतात. सर्व स्टार्टअप्सना ऑनलाईन अस्तित्व निर्माण करण्यासाठी किफायतशीर दरात मदत पुरवण्याचं काम ही कंपनी करते. तसंच व्यावसायिक वेबसाईट तयार करण्यासह डिजिटल मार्केटिंग आणि ऍप्लिकेशन विकसित करण्याचं कामही कंपनी करते असं इंद्रशीष सांगतात.

नीड वेबसाईटने नुकतंच ग्राहक संपर्क व्यवस्थापन आणि उद्योग साधनसंपत्ती व्यवस्थापन करणारं सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी पाऊल उचललं आहे. उत्पादन आणि सेवा वैज्ञानिक पद्धतीनं पुरवण्याबरोबरच अद्ययावत माहितीवर संशोधन करणारं नीड वेबसाईट्स हे एक व्यासपीठ असल्याचा दावाही कंपनी करते.

नीड वेबसाईट्स सध्या स्वत:च्या निधीवरच चालत आहे. तसंच नीड वेबसाईट्सचं नुकतंच अमेरिकेतील जॉर्जियामध्ये काम सुरू झालंय. त्याचबरोबर काही बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत आऊटसोर्सिंगमध्ये भागीदारी करण्याबाबतही कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.


image


इंद्रशीष यांच्या मते भारताची बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ आहे आणि आता इथं नवीन संकल्पनांचं स्वागत केलं जातंय. ओयो रुम्स, वूडू, मबल,ग्रॅब हाऊस स्कूप्ससह अनेक उपक्रमांना चांगल्या संकल्पनांमुळे भरपूर निधी मिळाला आहे. २०१६ पर्यंत नीड वेबसाईट्स आपली पहिली संकल्पना बाजारात उतरवणार आहे.

जास्तीत जास्त गुंतवणूकदार हे ई व्यापार किंवा उत्पादनावर आधारित व्यवसायात गुंतवणूक करण्यास तयार असतात, पण नीड वेबसाईट्स आतापर्यंत सेवा देणारी कंपनी म्हणून ओळखली जायची, असं इंद्रशीष सांगतात. पण आता नवीन उत्पादनं आणि सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर जागतिक व्यासपीठावर एक ब्रँड म्हणून पुढे येऊ असा दावाही इंद्रशीष करतात.


image


भारतात ४ कर्मचाऱ्यांपासून सुरु झालेल्या या कंपनीत सध्या १ सदस्य आहेत. आता २०१६ च्या सुरुवातीपर्यंत कंपनीचं ३० सदस्यांच्या संस्थेत रुपांतर करण्याचं ध्येय आहे. याशिवाय अमेरिकेच्या कार्यालयातही चार जणांची टीम कार्यरत आहे.

सेवा उद्योगापासून या कंपनीचा प्रवास सुरु झाला. नुकतंच कंपनीनं सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन्सवर विशेष लक्ष देण्यासाठी स्वत:च्या उत्पादन विभागाची स्थापना केली आहे. २०१६ पर्यंत कंपनी २ लाख अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह पुढच्या आव्हानांना सामोरी जायला तयार आहे. सध्या ३५० ग्राहकांना डेटाबेस पुरवणाऱ्या कंपनीचं ध्येय येत्या वर्षात एक हजार ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं आहे. २०१६ -१७ पर्यंत कंपनीला५ लाख डॉलर्सपेक्षाही जास्त नफा मिळवायचा आहे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य ब्रँडिंग किंवा मार्केटिंगशिवाय कोणतंही उत्पादन यशस्वी होऊ शकत नाही. कंपनीचा प्रवास खूप आव्हानात्मक असल्याचं इंद्राशीष सांगतात. पण आज कंपनी ज्या स्थानावर आहे त्यामागे आहे योग्य आर्थिक नियोजन आणि प्रगतीसाठी तयार केलेला आराखडा.

वेबसाइट

लेखक – तौसीफ आलम

अनुवाद – सचिन जोशी