एक मृत व्यक्ती देऊ शकतो आठ लोकांना जीवदान

एक मृत व्यक्ती देऊ शकतो आठ लोकांना जीवदान

Monday August 21, 2017,

2 min Read

अवयव दानाबाबत लोकांमध्ये अद्याप अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. ते दूर होणे आवश्यक आहेत. त्वचा आणि इतर अवयव दानामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकते. एका मृत व्यक्तीच्या अवयव दानामुळे आठ लोकांना जीवदान मिळू शकते, असे प्रतिपादन रोटरी क्लब, बोरिवलीचे अध्यक्ष राजेशकुमार मोदी यांनी केले. अवयव दानाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब जिल्हा ३१४१ तर्फे मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर आज जीवनापलिकडील जीवन या शीर्षकांतर्गत जनजागृती मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

रोटरी क्लब, मुंबई तर्फे लाईव्ह बियाँड लाईफ या शीर्षकांतर्गत अवयवदानाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अवयव दानाबाबत लोक अनभिज्ञ असून त्यांच्यात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करून लोकांना त्वचा आणि अवयव दानासाठी प्रोत्साहित करणे, हा आमचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे, अशी माहिती राजेशकुमार मोदी यांनी दिली.


image


दरवर्षी आठ लाख लोक भाजले जातात. गंभीररित्या भाजल्याने प्रत्येक चार मिनिटांना एका व्यक्तीचा मृत्यू होतो. किंवा त्यांना अपंगत्व येते. त्वचा रोपणासाठी नव्या त्वचेची रुग्णांना गरज असते. लोकांमध्ये त्वचादानाविषयी माहिती नसल्याने लोक त्वचा दान करण्यासाठी पुढे येत नाही. हीच परिस्थिती नेत्र आणि अवयवदानाबाबत आहे. अवयव रोपणाअभावी असंख्य रुग्णांचा मृत्यू ओढवतो. एका मृत व्यक्तीमुळे आठ लोकांना जीवदान मिळते, पण समाजामध्ये त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही रोटरी क्लबतर्फे हे अभियान राबवत आहोत. मुंबईमध्ये दहा लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहचून त्यांना अवयव दानासाठी प्रेरित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे राजेशकुमार मोदी यांनी सांगितले.

रोटरी क्लब लोखंडवालाच्या अध्यक्षा रश्मी दास म्हणाल्या की, १८ वर्षावरील कोणतीही व्यक्ती त्वचा दान करून शकते. वय वर्षे १०० पर्यंत त्वचा दान करता येते. परंतु लोकांना याबाबत माहिती नाही. त्वचा रोपणासाठी रक्तगट जुळविण्याची आवश्यकता नाही. त्वचेचा छोटासा पापुद्राही त्वचा रोपणासाठी घेतला जातो. त्वचा रोपणामुळे असंख्य लोकांना भाजल्यामुळे येणारे विद्रुपीकरण रोखता येऊ शकते.

लोकांनी त्वचा आणि अवयव दानासाठी पुढे यावे,असे आवाहन यावेळी राजेशकुमार मोदी आणि रश्मी दास यांनी यावेळी केले.

नुकतेच रोटरी क्लब तर्फे मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डिस्ट्रिक गर्व्हनर प्रफुल्ल शर्मा, रोटरी क्लब, बोरिवलीचे सल्लागार मनिष ज्ञानी आदी मान्यवर तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना अवयवदानाची माहिती देऊन त्यांच्याकडून अवयव दान करण्यासाठी माहिती पत्रक भरून घेण्यात आले.

फोटो कॅप्शन – बोरिवली येथे त्वचा आणि अवयव दान जनजागृतीसाठी रोटरी क्लब तर्फे सुरू करण्यात् आलेल्या लाईव्ह बियाँड लाईफ या अभियानासाठी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक गर्व्हनर प्रफुल्ल शर्मा, रोटरी क्लब, बोरिवली पूर्वचे अध्यक्ष राजेशकुमार मोदी, रोटरी क्लब लोखंडवालाच्या अध्यक्षा रश्मी दास, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.