जीवनातील अडचणींनाच रंग दिला, कलाविश्वात मिळवले नांव!

जीवनातील अडचणींनाच रंग दिला, कलाविश्वात मिळवले नांव!

Monday October 19, 2015,

5 min Read

असे म्हणतात की, उडी इतकी उंच असावी की आकाश ठेंगणे वाटावे. काहीसे असेच केले शुक्ला चौधरी यांनी. त्यांनी जीवनातील सा-या अडचणींवर मात करत वयाच्या ४८ व्या वर्षी फाईन आर्टसाठी प्रवेशच मिळवला नाही तर इतर महिलांसमोर नवा आदर्श ठेवला.

कोलकाता येथे सन १९५४ मध्ये जन्माला आलेल्या शुक्ला चार बहिणी भावंडात सर्वात मोठ्या आहेत. त्यांचे बालपण कला आणि शिक्षणात व्यतीत झाले. त्यांच्या मातोश्री स्वत: एक कुशल कलाकार होत्या,ज्यांनी यावर खास लक्ष दिले की,त्यांची मुले अभ्यासासोबतच कला आणि इतर गोष्टीत देखील निपूण राहतील.त्याचमुळे शुक्ला चौधरी यांनी वयाच्या दुस-याच वर्षी नृत्यकलेची साधना सुरु केली.परंतू आईच्या प्रभावामुळे त्यांचा जास्त ओढा होता तो फाईन आर्ट या विषयाकडेच.

image


बंगालमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या शुक्ला चौधरी यांना काही वर्षे संगीत साधनेनंतर रविंद्र डान्स आणि म्युजीक स्कूल मध्ये प्रवेश देण्यात आला. इथूनच त्यांच्यात टागोर यांच्याबाबतचा स्नेह वृध्दींगत झाला. शांतीनिकेतन येथे शिक्षण घेत असताना त्यांच्या जीवनात सारे काही ठिकठाक सुरू होते. तेथे त्या मनापासून अभ्यास करत होत्या, जेणेकरून फाईन आर्टच्या बारकाव्यासह ते शिकता यावे. त्यांची इच्छा होती की बंगालच्या नामवंत कलावंतात त्यांची गणना व्हावी. त्या सन १९७४ ते १९७७ दरम्यान शांतीनिकेतन येथे राहिल्या. येथेच त्यांना काही सुंदर अनुभव मिळाले, त्यांच्या मते तो खूपच चांगला अनुभव होता. त्यावेळी त्या स्वत:ला आकाशात उडणारी चिमणीच समजत होत्या. तेथे जे काही शिकायला मिळाले ते त्यांनी आत्मसात केले. त्या मानतात की त्या आज जे काही आहेत त्यावर शांतीनिकेतन मध्ये त्यावेळी व्यतीत केलेल्या या दिवसांचा प्रभाव आहे.

तेथे त्याना ना केवळ मोठ्या कलाकारांचा सहवास मिळाला, तर व्यक्तिश: कलेच्या विश्वात असलेले स्वातंत्र्य देखिल मिळाले. त्यामुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आणि नविन गोष्टी शिकण्याचा आनंद देखिल मिळाला. त्यांना फाईन आर्ट च्या क्षेत्रात अभ्यास करायचा होता पण १९७७ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर त्यांचे सारे जीवनच बदलून गेले आणि नव्या जबाबदा-या येऊन पडल्या. त्यासोबतच मुलींची जबाबदारी देखिल आली. इतकेच नाही त्यांच्या पतीची बदली भोपाळ येथे झाली, त्यामुळे त्यांचे शिक्षण एकदम थांबले. त्यांचे म्हणणे आहे की, माझ्या परिवाराच्या जबाबदारीला माझे प्राधान्य होते. त्यांनी आपला सारा वेळ परिवाराला दिला होता. अश्या प्रकारे त्यांच्या जीवनातील २५-३० वर्षांचा काळ कुटूंबाच्या कल्याणात खर्च झाला.


image


काळाच्या ओघात मुले मोठी होत गेली आणि जबाबदारी कमी होत गेली, तेंव्हा त्यांनी विचार केला की, आता पुन्हा एकदा अपूर्ण राहिलेले अभ्यासाचे स्वप्न पूर्ण करावे! त्याचवेळी त्यांच्यात आणि पती दरम्यान काही गैरसमज देखील झाले होते. त्यामुळे त्यांना वाटले की, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिकले पाहिजे. शुक्ला चौधरी यांचे म्हणणे आहे की, त्या जगात अश्या गोष्टीमुळे ओळखल्या जाव्यात जी त्यांच्या मनात आहे. कलाच त्यांचे जीवन होते त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा सन्मानपूर्वक तिच्याशी जोडायचे होते.

त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी पदवीधारक होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी नियमित वर्गाना जाणे सुरु केले. प्रत्यक्ष हजर राहण्यास सुरूवात केली आणि महाविद्यालयातील कार्यक्रमात भाग घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी महाविद्या्लयात त्यांची ओळख तिथल्या विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकात ‘टाइमपास आंटी’ अशीच झाली होती. त्याना असेच वाटत होते की, शुक्ला चौधरी या आपला रिकामा वेळ घालवण्यासाठीच आणि हौस म्हणून महाविद्यालयात येत असतात. यामध्ये बहुतांश लोक तर असे होते ज्याना हेच माहिती नव्हते की शुक्ला चौधरी केवळ गृहिणी नव्हत्या तर तीन मुलांची आई देखील होत्या. कुणालाही त्यांचा भुतकाळ माहीत नव्हता आणि त्या काय करत आहेत हे समजू शकत नव्हते. दुसरीकडे शुक्ला चौधरी यांनी ना कधी आपला नाईलाज कुणाला सागांयचा प्रयत्न केला ना सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. असे असूनही महाविद्यालयात सा-यांनी सन्मानानेच वागावे असे त्यांचे मत होते. जसे इतर सा-या विद्यार्थांना वागवले जात होते. या आव्हानाचा सामना करत त्यांनी आपल्या फ़ाईन आर्टच्या शिक्षणात आनंदी राहायचे प्रयत्न केले.


image


मनाचा निश्चय असेल तर कोणतेच काम कठीण असत नाही आणि यश मिळतेच. अनेक आव्हाने आली तरी शुक्ला चौधरी यांनी आपले पहिले प्रदर्शन भरविण्यात यश मिळवलेच. या प्रदर्शनाला नाव देण्यात आले होते’ द फाईट ऑफ द फिनिक्स’. इतके सारे होऊनही शुक्ला चौधरी यांच्यासमोरच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नव्हती. त्यांच्या समोर सर्वात मोठी अडचण होती भाषेची. त्यांना अस्खलित इंग्रजी बोलता येत नव्हते त्यामुळे त्याच्यात न्यूनत्वाची भावना निर्माण झाली होती. खरेतर त्यांच्या शिक्षणाची सुरूवात इंग्रजीत झाली होती.परंतू नंतर त्यांनी बंगालीत शिक्षण घेतले होते. त्यानंतर जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या पतीची बदली आधी भोपाळ आणि नंतर हैद्राबादला झाली जेथे हिंदीत कामकाज चालत असे. त्यांना तर हिंदीत जास्त काही बोलता येत नव्हते.परंतू ऐकून ऐकून त्यानी ती आत्मसात केली होती. इंग्रजी शिकण्यासाठी त्यानी नियमित वर्ग सुरू केला परंतू वेळ अपूरा मिळाल्याने त्याना तो पूर्ण करता आला नाही. कारण मुले आणि पती यांना वेळ देता येत नव्हता.

जेंव्हा दुस-यांदा त्यानी पदवी परिक्षा देण्याचे ठरवले तेंव्हा सुध्दा भाषेची अडचण त्याना जाणवत होतीच. कारण जे शिक्षण त्या घेत होत्या त्याची भाषा मराठी होती. त्यावेळी मराठीतील छायाप्रती घेऊन त्या त्याचा हिंदी अनुवाद पती किंवा सहका-यांकडून करून घेत होत्या. वारंवार या अडचणी येत राहिल्याने एक दिवस त्यांचे पती ,मुली, आणि मित्र सारे एकत्र बसले. त्यानी संक्षिप्त इंग्रजीत परिच्छेद लिहीले. जे त्यांना समजू शकत होते. खरेतर हे कामही कठीणच होते पण सन २००५ मध्ये वयाच्या ५१व्या वर्षी शुक्ला चौधरी यांनी पुणे विद्यापीठातून पदवी परिक्षेत प्राविण्य मिळवलेच!

आज देखिल त्याना भलेही चांगले इंग्रजी किंवा हिंदी बोलता येत नसेल परंतू त्या खूश आहेत की जास्तीत जास्त लोकांपर्यत त्याना त्यांचे म्हणणे पोचवता येते आणि ते देखिल कोणत्याही भाषेच्या अडचणीशिवाय! त्यांचे म्हणणे आहे की, कलेच्या माध्यमातून त्या आपले म्हणणे जगासमोर ठेवण्यास समर्थ आहेत. खरेतर इंग्रजी बोलताना त्या अधिक सतर्क असतात परंतू जेव्हाही त्या काही बोलतात तेंव्हा लोक ऐकत असतात आणि हेच महत्वाचे आहे. आतापर्यंत शुक्ला चौधरी यांची देशातील मोठ्या शहरातून बारा प्रदर्शने लागली आहेत. त्यांच्या कलाकृतीमध्ये दैनंदीन जीवन पहायला मिळेल.त्या साठी त्या चमकदार रंग आणि बोल्ड स्ट्रोक्स यांचा वापर करताना दिसतात. त्यांच्या चित्रांचे खरेदी करणारे केवळ देशी नाहीत तर विदेशी नागरीक देखील असतात.

शुक्ला चौधरी म्हणतात की पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचार आणि वेगवेगळ्या गोष्टीच्या सतत संपर्कात राहणे महत्वाचे आहे. त्यांच्या मते आपल्या बुध्दीला कधीही आराम देता कामा नये. जे्व्हा बुध्दी काम करणे बंद करते तेंव्हाच नकारात्मक विचार घर करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक वेळी आपल्या कामात लक्ष देत राहिले पाहिजे जे आपण करत आहोत. त्यांच्यामते पूर्वीपेक्षा हल्लीच्या महिला अधिक स्वतंत्र आहेत आणि त्यांच्याकडे अधिक संधी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सासरच्यांच्या विरोधानंतरही त्यांनी त्यांचे लक्ष त्या गोष्टीत लावले ज्यामध्ये त्यांना रूची होती. ही त्यांच्या इच्छाशक्ती आणि साहसाची लढाई होती. त्यांनी त्या गोष्टींचा पिच्छा तोवर पुरवला जोवर त्यांच्या त्या हाती लागत नाहीत. कोणत्याही कलावंतासाठी त्याचे डोळे महत्वाचे असतात पण शुक्ला चौधरी यांच्या दोनही डोळ्यांची दृष्टी काही प्रमाणात अधू झाली आहे. असे असूनही त्यांनी त्यांचे काम व्यवस्थित सुरूच ठेवले आहे.


image