गुजरातच्या खेडेगावातील या महिलांनी या दिवाळीत मिळवले ७० कोटी रुपये. कसे काय?

गुजरातच्या खेडेगावातील या महिलांनी या दिवाळीत मिळवले ७० कोटी रुपये. कसे काय?

Wednesday November 02, 2016,

1 min Read

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील उत्तरसांडा हे छोटेसे गांव. गांधी नगर या राजधानीपासून केवळ ७६किलोमीटरवर वसलेल्या या गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या घरात आहे.

सन २०११च्या जनगणनेनुसार उत्तरसांडा या गावच्या साक्षरतेचे प्रमाण ९०%च्या आसपास आहे आणि राहणीमान तसेच शिक्षणाच्या दर्जाबाबतही हे गांव तसे इतर गावांच्या तुलनेत उजवेच म्हटले पाहिजे. कारण या गावाच्या तुलनेत संपूर्ण गुजरात राज्याच्या साक्षरतेचे प्रमाण आहे ७८% आणि देशाचे साक्षरता प्रमाण आहे ७४%.

image


असे असले तरी उत्तरसांडा गावाची ओळख आहे ती त्यांच्या चविष्ट नाश्त्याच्या व्यवसायासाठी. जो प्रामुख्यांने महिलांच चालवितात, उत्तरसांडा मध्ये ३५ लघुद्योगांचे माहेरघरच झाले आहे. जेथे स्थानिक खाद्यपदार्थ जसे की, पापड, मठिया आणि चोलाफली तयार केले जाते. हा व्यवसाय बहरात येतो तो दिवाळीच्या सुमारास, ज्यावेळी येथे सुमारे ७०कोटी रुपयांच्या खाद्यपदार्थ विक्रीची उलाढाल केली जाते.

याबाबतच्या माहितीनुसार उत्तरसांडा गावातील महिला सुमारे तीस वर्षांपासून हे खाद्य पदार्थ तयार करत आहेत. केवळ दिवाळीच्या महिन्यातच त्या ७००टनाहून जास्त खाद्यपदार्थ तयार करून वितरीत करतात. त्यातील निम्मे पदार्थ विदेशात पाठविले जातात.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया

    Share on
    close