सामाजिक विषमतेच्या लढ्यात अंतिम विजय मानवता आणि समानतेचे मुल्य शिकवणा-या संविधनाचाच!

सामाजिक विषमतेच्या लढ्यात अंतिम विजय मानवता आणि समानतेचे मुल्य शिकवणा-या संविधनाचाच!

Sunday August 14, 2016,

5 min Read

त्यावेळी मी खूप लहान होतो. आम्ही मिर्झापूरला राहात होतो, असे शहर जे वाराणसी आणि अलाहाबाद या दोन ऐतिहासिक शहरांमध्ये दबले गेले आहे. माझे वडील आयकर विभागात काम करत होते. रोज संध्याकाळी त्यांचा शिपाई आमच्या घरी येत असे. रोजचा त्याचा पाहूणचार चहा आणि बिस्कीटांनी होत असे. पण थांबा, येथे एक फरक आहे. त्याचा, कप ताट आमच्यापेक्षा वेगळे असे. आम्ही कित्येकवेळा आमचा चहा नाश्ता स्टीलच्या भांड्यातून करत असू मात्र त्याला वेगळी ऍल्युमिनिअमची भांडी दिली जात असत. त्याची भांडीसुध्दा आमच्या भांड्यातून वेगळी असत. हा नित्याचा परिपाठ होता. लहान असल्याने मला काही समजत नसे, आणि माझ्यासाठी हा काहीच विषय नव्हता. तरीही एक दिवस उत्सुकता म्हणून माझ्या आईला याबद्दल विचारणा केलीच की हे असे का?!

माझी आई जी उत्तरप्रदेशातील एका अतिदुर्गम खेड्यातून आलेली होती तिने सहजपणे सांगितले की, ‘ अरे तुला माहित आहे का तो अनुसूचित जातीचा आहे'. लहान असल्याने मी त्यावेळी त्यावर जास्त विचार नाही केला. पण मी जेंव्हा मोठा झालो, अशा गोष्टीबाबत अवगत झालो आणि महाविद्यालयात गेलो तेंव्हा तर मला समजले की ती ज्या सहजतेने हे सारे सांगत होती ते हजारो वर्षांच्या सामाजिकतेचे फलित आहे ज्याला अस्पृश्यता समजले जात होते. त्यावेळची आणखी एक गोष्ट मी पाहिली होती की तो शिपाई जो एरव्ही आमच्याशी खूप जवळचा असल्याप्रमाणे वागत असे, आमच्या घरातील इतर भांड्याना स्पर्श करणे टाळत असे आणि स्वत:ची भांडी स्वत: धुवून देत असे.

बराच काळ लोटला आम्ही मोठे झालो मित्र परिवार वाढला, मुले आणि मुली ज्या सर्व समाजातील होत्या, माझ्या घरी येत जात असत आणि आईला समजत नव्हते कोण कोणत्या जातीचा आहे. त्यामुळे माझ्या मित्रपरिवाराला काही अडचण नव्हती मात्र दोघे जण मुस्लिम आणि दलित होते. जेंव्हा आईला हे सारे समजले तिने काहीच कुरकूर केली नाही तिने त्यांचा शांतपणे स्विकार केला. यातून काय दिसते? की त्यावेळी प्रत्येक घरात अस्पृश्यता पाळली जात असे, अगदी फार काळ नाही लोटला. ही वागणूक ज्यांना दिली जात असे त्यांनी देखील ती सहजपणे मान्य केली होती. या मर्यादा पाळण्यासाठी ते सुध्दा अगदी दक्ष राहात. तो काळ गेला आणि समाज सुधारला, काही लोकांनी त्यांच्यातील कट्टरता कमी केली.

image


माझी आई बदलली. ती सहजपणे वागू लागली. ती धार्मिक व्यक्ती आहे. तसेच माझे वडीलसुध्दा. माझे वडील पदवीधारक होते आणि सरकारी नोकरीत होते. अगदी उदारमताचे पण त्यांनी सुध्दा कधीच माझ्या आईवर कसले आक्षेप घेतले नाहीत. आता त्या दोघांनाही माझ्या मित्रपरिवाराच्या जातीबाबत आक्षेप होते. पण तरीही ते रोज सकाळी उठत, स्नान,पुजा करत आणि नंतर अन्न घेत. धार्मिक महत्वाच्या सर्व दिवसांत त्यांचे उपवास सुरू असत. यातून आम्हाला सा-यांना काय धडा घेता येतो? होय अर्थातच. माझे पालक हिंदू आहेत. ते धार्मिक आहेत पण ते सनातनी विचारांचे नाहीत. ते जीवनाला आधिक सुधारीत आणि उदारपध्दतीने जगू पाहतात. माझ्यातील ब-याच उदारमतवादी विचारांचा ते स्त्रोत आहेत. मी थक्क होऊन विचार करतो की त्यांनी आम्हाला त्या सामाजिक कुप्रथांची कधी सक्ती केली असती तर?

मी खूप अस्वस्थ झालो जेंव्हा मागच्या सप्ताहात मी काही गोरक्षकांनी दलितांना मारहाण केल्याची दृश्य पाहिली. मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. मला वाटते की गोरक्षक कार्यकर्त्याचे गु्न्हे म्हणजे पारंपारीक काळापासून खोलवर रुतलेल्या दलितांना अस्पृश्यतेची अमानवी वागणूक देण्याच्या मानसिकतेचा परिपाकच आहे. मला असे अजिबात वाटत नाही की यात त्यांच्या गोरक्षणाच्या सदविचाराचे प्रतिबिंब दिसत असावे. तसे असते तर त्यांनी दररोज रस्त्यांवर आणि महामार्गांवर मरत असलेल्या गायींच्या हितासाठी काही तरी केले असते; ते सरकारशी त्यांना अधिक चांगले जीवन मिळावे म्हणून भांडले असते. त्यांनी मोदी सरकारला देशातून गायींच्या मासांवर बंदी घालण्याची मागणी केली असती. त्यांनी यावर असंतोष व्यक्त केला असता की मोदी यांच्या कार्यकाळात देश गायींच्या मांस निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोचला आहे.पण याबाबत गोरक्षकांमध्ये काहीच खंत दिसत नाही.

हे तर मान्यच करावे लागेल की, अस्पृश्यता हा हिंदू समाजाच्या भुतकाळातील कलंक होता ज्याचे अनुकरण हजारो वर्षे करण्यात आले. दलितांना आमच्या समाजात अमानवीपध्दतीने वागविण्यात आले होते. त्यांना काहीच अधिकार नव्हते. त्यांना जातीच्या भिंतीबाहेर केले गेले होते आणि विषमतेची वागणूक दिली जात असे. अशाच प्रकारची वागणूक पाश्चात्यांच्या देशात आजही काहीवेळा दिली जात असल्याचे प्रत्ययास येते. फरक इतकाच की जातीसाठी नागवणारे आणि नागवले गेलेले हे सारे एकाच धर्माचे होते. त्यामागे असलेल्या कर्मसिंध्दाताला सारे मानत होते की मागच्या जन्मात काहीतरी चूक केल्याने ही स्थिती त्यांना भोगावी लागत होती.पुढच्या जन्मात तरी ही स्थिती येऊ नये म्हणून सारे या प्रकारच्या वागणूकीचा स्विकार करत होते ते ब्राम्हण असले तरी. पण या जन्मात त्यांना नरकात जाण्याच्या भितीने असे वागण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.

लेखणीच्या एका फटका-यात भारतीय संविधानाने अस्पृश्यता आणि असमानता यांना नाकारले. कायद्याने सारे समान आहेत, उच्च जातीच्या लोकांइतकेच अधिकार आता दलितांना देखील आहेत. पण तरीही आज समाज जाती मध्ये दुभंगला आहे. हजारो वर्षांची मानसिकता एका रात्रीत बदलणार नाही. पण घटनेने दिलेल्या समानतेच्या हक्काची जाणीव दलित समाजाला झाली आहे. ते आग्रहीपणाने त्यांचे हक्क मागत आहेत, मानव म्हणून जगण्याच्या हक्काचा लढा देत आहेत जो हक्क त्यांना संविधनाने दिला आहे, आणि जो उच्च समाजातील काही घटकांकडून त्याना दिला जात नाही त्यातून संघर्ष निर्माण होतो आहे. अश्या प्रकारच्या घटनातून हेच पहायला मिळते आहे की सनातनी लोकांना अजूनही दलितांना धडा शिकवायचा आहे, आणि इतिहासातील त्यांची समाजातील जागा दाखवून द्यायची आहे. यातून त्यांच्यातील बदल्याची भावनाही दिसून येते ज्यात आपले लोकशाही हक्क मागणा-यांना अद्दल घडविण्याचा प्रयत्न दिसून येतो.

माझे पालक हजारो वर्षांच्या रुढी-परंपरांचे बळी होते. त्यांना वास्तव जेंव्हा समजले तेंव्हा त्यांनी आपली चूक सुधारली आणि स्वत:मध्ये बदल केला. त्यांनी सुधारणांचा विरोध केला नाही. उलट त्यानी दोन्ही बाजूंनी या गोष्टी स्विकारल्या, पण दलिताना मारहाण करणारे ही गोष्ट मानण्यास तयार नाहीत. ते अमानवी प्रथा आणि रुढींचे रक्षक बनले आहेत ज्यात माणसाला माणसाप्रमाणे जगू दिले जात नाही. ते बदलायला तयार नाहीत. ते सुधारणांचे शत्रू आहेत. ते लढत राहतील. आणि पराजित होतील. ही शुभ्र रेषा आहे की, दलितांचा आत्मविश्वास वाढला आहे, प्रकाशमान झाला आहे आणि सामाजिक कुप्रथांविरोधात ते एकजूट होत आहेत आणि आपल्या स्वत:च्या हक्काची लढाई लढण्यासाठी त्यांना याची लाज वाटत नाही ज्यातून त्यांच्या इतिहासातील सामाजिक स्थानाची ओळख होत असते.


(लेखक आशुतोष, वरिष्ठ पत्रकार आणि आम आदमी पक्षाचे नेते आहेत, या लेखातील त्यांनी मांडलेल्या विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)