रेहाना आबीद - पीडिता झाली मसिहा, ज्या अन्य महिलांना आपल्या मार्गाने घेवून जात आहेत

0

रेहाना आबीद यांच्यावर अत्याचार झाला, जबरीने शाळा सोडवण्यात आली, लग्न लावून देण्यात आले, आणि ज्या कायम घरगुती हिंसाचाराची शिकार होत राहिल्या हे सारे त्या १८ वर्षाच्या होण्यापूर्वीच घडून गेले. पण आज त्या मसिहा आहेत ज्यांची स्वत:ची सेवाभावी संस्था आहे, ‘अस्तित्व’. अशा महिलांच्या मदतीसाठी ज्यांना महिला असल्याने लैंगिक छळाला सामोरे जावे लागते.

उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मध्ये रेहाना यांना मध्यम वयाच्या माणसासोबत लग्नासाठी जबरदस्ती झाली, ज्यावेळी त्या केवळ १५ वर्षांच्या होत्या . मुस्लिम कुटूंबात जन्मल्याने आणि महिला असल्याने त्यांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागले, आणि या वाईट प्रसंगातून बाहेर पडण्यात त्यांचा खूप वेळ गेला. तरीही त्या सर्वसाधारण जीवन जगू शकल्या नाहीत. त्यांनी माध्यमांना सांगितल्या नुसार, “ सर्व प्रथम, मला हेच समजत नव्हते की माझ्या सोबत काही चुकीचे होत आहे. मुस्लिम महिला असल्याने, मला कायम पडद्यात रहावे लागले. आणि इतर महिलांशी देखील असेच होताना पहावे लागले. त्यावेळी मला जाणवू लागले की जे होत आहे ते योग्य नाही. तोवर मी पाच मुलींची आई झाले होते”.


फोटो - द वायर
फोटो - द वायर

एक दिवस, त्यांनी स्थानिक सेवाभावी संस्थेच्या बैठकीला हजेरी लावली, जिचे नाव दिशा आहे. त्या अशा घरातून आल्या होत्या जेथे महिलांना घराबाहेर पडण्यास देखील मनाई होती. त्यामुळे सुरूवातीला त्यांना हिंमत होत नव्हती, मात्र नंतर त्यांना आग्रह झाला की फक्त येवून निरिक्षण करा आणि जा. तेथे गेल्यावरच्या पहिल्या दिवसाबद्दल त्या सांगतात की, “ बुरखा परिधान करून, कडेवर मुल घेवून मी बैठकीत हजेरी लावली. जेथे लोक म्हणत होते की महिलांनी छळाचा प्रतिकार केला पाहिजे. पोलिसांत तक्रार दिली पाहिजे, आणि याची लाज वाटता कामा नये. ते क्रांतीची गाणी म्हणत होते. त्याने मी अस्वस्थ झाले आणि रात्री झोपू शकले नाही.”

त्यानंतर त्यांनी निश्चय केला की त्या आता कोणताही अत्याचार सहन करणार नाहीत. आणि यामध्ये त्या भागातील अन्य महिलांना देखील मदत करतील. मात्र याचा अर्थ होता की, त्यांना अजून छळ आणि अत्याचार यांचा सामना करावा लागणार होता. जो त्यांचे कुटूंबीय आणि शेजारीच करणार होते. या सा-याची तमा न बाळगता, निर्धाराने त्यांनी पिडीत महिलांसाठी अन्य सेवाभावी संस्थेत काम करण्यास सुरूवात केली आणि नंतर स्वत:ची संस्था सुरू केली.

२००५ मध्ये अस्तित्व सुरू करण्यात आली, त्यातून मुजफ्फरनगर परिसरात महिलांवर होणा-या लैगिक अत्याचारांना प्रतिकार केला जावू लागला. त्यात ऑनर किलींग हा त्या भागात सर्रास होणारा प्रकार समाविष्ट होता. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरूवात केली, मात्र धमक्या देखील येत राहिल्या अगदी अलिकडे त्या बिजींग येथे प्रमुख पाहूण्या म्हणून गेल्या असतानाही त्यांना धमक्या येत होत्या. कारण त्यांच्या भागात कुणाला परदेशातून निमंत्रण क्वचितच येते. लोकांना मात्र हे पटले की त्या काहीतरी चांगले करत आहेत. ज्यांचा प्रभाव त्या भागात सर्वाधिक आहे.

रेहाना यांना सर्व प्रकारच्या धमक्या नेहमीच मिळत असतात, कारण त्या जे काही करत असतात ते जात पंचायतीला मान्य नसते.  तरीही त्या चालत राहिल्या आहेत, निर्धाराने, जास्तीत जास्त महिलांना सुरक्षा द्यावी म्हणून जे त्यांचे ध्येय आहे.