अवचित येणा-या ह्रदयविकाराच्या धक्क्याना ओळखणारे उपकरण तयार केले आहे या १५ वर्षीय मुलाने!

अवचित येणा-या ह्रदयविकाराच्या धक्क्याना ओळखणारे उपकरण तयार केले आहे या १५ वर्षीय मुलाने!

Monday March 27, 2017,

2 min Read

तमिळनाडूचा १५ वर्षीय मुलगा आकाश मनोज, याने एक उपकरण विकसित केले आहे ज्यातून अवचितपणे येणा-या ह्रदयविकाराच्या धक्क्यांना ओळखण्याची सोय आहे, या उपकरणाच्या मदतीने अनेकांचे प्राण वाचविणे सोयीचे झाले आहे, आणि ही तर आकाश यांच्या प्रवासाची सुरूवात आहे.


image


ह्रदय विकाराचा धक्का येताना काही लक्षणे दिसतात, जसे की छाती दुखणे, किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. परंतू अवचित येणा-या ह्रदयविकाराच्या ध्क्क्यात अशाप्रकारची लक्षणे आढळत नाहीत. अगदी साधा फ्लूचा ताप येऊन किंवा अस्वस्थ वाटून ह्रदय विकाराचा धक्का बसतो. त्यामुळे लोकांना अनेकदा समजतही नाही की, ते स्वत:ला जितके निरोगी समजतात तितके ते नाहीत. आकाश याला त्याचे आजोबा अशाप्रकारच्या ह्रदयविकाराने निधन पावल्यानंतर प्रेरणा मिळाली की अशाप्रकारच्या रूग्णांना या उपकरणाचा वापर करता यावा. एका वृत्तानुसार आकाश म्हणाला की, “ त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता, मात्र ते वरून निरोगी दिसायचे, त्यांना अवचित ह्रदयविकाराचा धक्का बसला ते कोसळले आणि निधन पावले.”

आकाशला नेहमीच वैद्यकीय लिखाण वाचायला आवडते, आणि आठवीत असल्यापासून त्याने त्याचा मौजेसाठी उपयोग केला. तो बंगळुरू येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या ग्रंथालयात जातो, जे त्याच्या तामिळनाडूमधील होसूर येथील घरापासून तासभराच्या अंतरावर आहे. आकाश म्हणाला की, “ नियतकालिकातील लेख महागडे असतात, त्यामुळे ग्रंथालयात जावून वाचणे मला सोपे वाटते. इतकेच नाहीतर येथे जावून वाचन केल्याने मला कोट्यावधी रूपयांच्या किमती इतके ज्ञान मिळते, जे वाचन मी करतो. मी नेहमी वैद्यकशास्त्रात रूची ठेवली आहे, आणि मला नियतकालिकातील वाचन आवडते, कार्डियालॉजी हा माझा आवडता विषय आहे.”

आकाश याने अलगद प्रकारचे तंत्र या उपकरणासाठी विकसित केले, ज्यातून प्रथिनांच्या रक्तातील FABP3, च्या मात्रेवरून निदान करता येते. हे उपकरण मनगटावर किंवा कानावर लावता येते. माध्यमांशी बोलताना आकाश याने या उपकरणाच्या तंत्राबाबत सांगितले की, “ हे ‘एफएबीपी३’ एक छोटेसे प्रथिने आहे जे रक्तात असते, आणि ते नकारात्मकता दर्शविते. आम्ही त्यांच्या या वैशिष्ट्यांचा वापर उपकरणात करून घेतला.

आकाश नुकताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निमंत्रणावरून निवासी कार्यक्रमांतर्गत संशोधन करणा-या योजनेतून पाहूणे म्हणून राष्ट्रपती निवासात राहून आला. आकाश याला विश्वास आहे की, त्याच्या उपकरणाच्या मदतीने अनेकांचे प्राण वाचविता येतील. खासकरून जे ग्रामिण भागात राहतात आणि त्यांना रूग्णालयाच्या सेवा लवकर मिळू शकत नाहीत. त्यांनी या उपकरणाच्या पेटंट (स्वामित्व हक्क) साठी अर्ज केला असून हा प्रकल्प विकण्याऐवजी भारत सरकारने लोकांच्या सेवेत वापरावा असे त्याला वाटते. आकाशला कार्डियोलॉजीमध्ये रस आहे, आणि तो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीमध्ये भविष्यात शिकू इच्छितो.

इतक्या तरूण वयात, आकाशने खूप काही वेगळे करून दाखवले आहे. त्यातून त्याच्याबद्दलचा आदर वृध्दिंगत होतोच परंतू अनेकांना काही करुन दाखविण्याची प्रेरणा देखील मिळते. या वंडरबॉयच्या भविष्यातील वाटचालीत ते आणखी काय काय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

    Share on
    close