पहिल्यांदाच, केरळातील तीनशे महिलांनी त्यांच्या भागाला १९० विहिरी खणून दुष्काळमुक्त केले!

0

विहीर खणणे हा ग्रामिण भागातील मुख्य विषय समजला जातो, जो नेहमी पुरूषांचा विषय असतो. त्यामुळे महिलांच्या गटाला विचारणा झाली की अशा प्रकारच्या कठीण कामात सहभागी होणार का? तेंव्हा त्यांचे उत्तर धक्कादायक होते, इतके की या पूर्वी त्यांना काही विचारणा झाली कि त्यांनी असे उत्तर कधीच दिले नव्हते. मात्र त्यातही काही होत्या त्यांनी हे आव्हान स्विकारायचे ठरविले, आणि अशक्य अशा वाटणा-या या गोष्टी शक्य करून दाखवल्या.

केरळ मधील पोक्कोटूकाव्हू या पलक्कड जिल्ह्यातील पंचायतीमध्ये हे सारे घडले. जे काही पाच महिलांनी सुरू केले त्यात नंतर ३०० महिला सहभागी झाल्या ज्यांनी मिळून १९०विहिरी खोदल्या आहेत. जो देशात महिलांनी सर्वाधिक विहीरी खणण्याचा विक्रम समजला जातो. याबाबतच्या वृत्तानुसार पंचायतीचे अध्यक्ष के जयदेवन या उपक्रमाबाबत बोलताना म्हणाले की, “ अर्धा डझन खडकाळ भागातील विहिरी सोडल्या, तर सर्व विहिरीत आता पाणी दिले जात आहे, जेथून टॅकर मार्फत एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. या यशाने प्रेरणा घेवून आम्ही महिलांना तीन वर्षात ३१० विहिरी तयार करण्याचे उद्दीष्ट देत आहोत. याचा खर्च नरेगा योजनेअंतर्गत केला जात असून लोकांना मोफत विहिरी मिळत आहेत.” 

या विहीरींच्या खोदकामात काम करणा-या महिला महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करत आहेत, ज्यावेळी त्यांनी विहीरीसाठी काम सुरू केले, या महिलांना त्यांच्या स्वत:च्याच खूप समस्या होत्या, त्याशिवाय पुरूषांचे टक्के – टोमणे देखील ऐकावे लागत होते. कारण हे काम त्यांनी पूर्वी कधीच केल नाही आणि जे पुरूषांची मक्तेदारी होते. त्यापूर्वी महिला केवळ शेती आणि स्वच्छता याच कामात सहभागी होत असत. ज्यावेळी खणण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला, त्यांनी सुरूवातीला नकार दिला होता. केवळ २४० रूपयांसाठी हा धोकादायक कामाचा प्रकार आहे असा त्यांचा समज होता, शिवाय महिलांनी विहिरी खणल्या असे त्यांच्या पूर्वी कधीच ऐकीवात नव्हते.

असे असले तरी पाच महिलांना हे काम हवे होते, त्यानंतर इतरांनी त्याचे अनुकरण केले. ३७ वर्षांच्या राधा, या कामात सहभागी असलेल्या एक महिला म्हणाल्या की, “ ज्यावेळी पंचायतीच्या अधिका-यांनी ही कल्पना सांगितली, मी माझ्या जीवनाला खरेच कंटाळले होते, पण जे काम महिलांनी कधीच केले नव्हते आणि पुरूषांची मक्तेदारी होते ते करायची कल्पना मला आवडली. पण तरीही मी स्वत:हून पहिल्या चमूत सहभागी झाले नाही. ज्यावेळी इतर महिलांनी हे सिध्द केले की आम्हीसुध्दा हे काम करतू शकतो त्यावेळी मी यात सहभागी झाले.” त्यांनी आणखी सांगितले की, “ जसजश्या खोल विहीरी आम्ही रोज खणत जातो आमचा आत्मविश्वास आणखी वाढत जातो”.

अशा वेळी जेथे सगळीकडे दुष्काळी स्थिती आहे, या पंचायतीकडे पुरेसे पाणी आहे जे त्यांना वापरता येते. त्यानी ते स्वयंपूर्ण होईपर्यंत विहीरी खणत राहायचे ठरविले आहे. या विहीरींचा दुसरा फायदा हा आहे की महिलांना पाण्याचा शोध घेत दिवसभर कुठेही वण वण करत रहायला नको. या महिलांचा आदर्श घेत इतरही अनेक पंचायतीनी महिंलांमार्फत महिलांसाठी विहीरी खणून घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. (थिंक चेंज इंडिया)