नवी दिल्लीत एक महिला सा-या अडचणी पार करून कशी बनली पहिली महिला उबेर वाहनचालक?

0

शान्नो बेगम या नवी दिल्लीतील पहिल्या महिला उबेर वाहन चालक आहेत. ज्यांना शैक्षणिक पार्श्वभुमी नाही, ज्यावेळी त्यांच्या पतीचे निधन झाले त्यावेळी त्यांना कसे जगावे या चिंतेने घराबाहेर यावे लागले. शान्नो ज्या तीन मुलांची माता आहेत, वाहन चालक होण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या नोक-या करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासमोर अनेक समस्या होत्या, सर्वात सामान्य प्रश्न असा की पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्या कशा काम करणार? मात्र त्यांच्या मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या ओढीने त्यांना आज त्या जेथे आहेत तेथे आणून सोडले.


Image Source: Mashable
Image Source: Mashable

पतीच्या निधनानंतर शान्नो यांनी प्रथमच एक नोकरी भाजीपाला विक्रीच्या ठेल्यावर केली. त्यात कुटूंबाच्या गरजा किंवा मुलांचे शिक्षण पूर्ण होईल इतके उत्पन्न होत नाही हे पाहून त्यांनी रूग्णसेवा करण्याचे काम स्विकारले. त्यांच्या या नोकरीत त्यांना नर्स प्रमाणे काम करावे लागे मात्र त्यांच्या इतके वेतन मिळत नव्हते. त्यांचे वेतन पुरेसे नव्हते म्हणून त्यांनी स्वयंपाक करण्याचे कामही केले, त्यांचे उत्पन्न महिना सहा हजार रूपये होते. ज्यात कुटूंबाचा चरितार्थ चालू शकत नव्हता.

त्यानंतर त्यांना एका सेवाभावी संस्थेची माहिती मिळाली ज्याचे नाव आझाद फाऊंडेशन होते. जे निराधार महिलांसाठी काम करते, त्यांनी महिलांना सहा महिन्यांचे वाहन चालकाचे प्रशिक्षण दहावी उत्तीर्ण देण्याचा प्रस्ताव दिला. पण त्या त्या निकषात बसत नव्हत्या म्हणून त्यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी परिक्षा देण्याचे ठरविले. त्यांनी रात्री अभ्यास आणि दिवसा काम करून शिक्षण घेतले. दोन वर्षात त्या दहावी उत्तिर्ण झाल्या त्यानंतर त्या वाहन कसे चालवावे ते शिकल्या. त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ सहा महिने मी फाऊंडेशन सोबत शिकले, त्यावेळी त्यांनी आम्हाला नकाशा वाचनही शिकवले. या शिवाय काही स्व-संरक्षणाच्या पध्दती देखील.”

या पूर्वी त्यांनी आज तक आणि इंडिगो एअरलाइन्स मध्ये काम केले, आणि आता त्या उबेर मध्ये दाखल झाल्या आहेत. ही सुरक्षित जीवन जगण्याची सुरुवात होती, जे त्यानी कुटूंबासाठी नेहमीच पाहिले होते. त्या म्हणाल्या की, “ माझी मुलगी आता आयजीएनओयू मध्ये शिक्षण घेत आहे आणि मुलगा खाजगी शाळेत, दहाव्या वर्गात शिकतो आहे. फार नाही परंतू सप्ताहाला बारा हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले तर चांगले शिक्षण घेता येते, त्यामुळे माझी मुले त्याना स्वत:ला सिध्द करण्यासाठी शिकत आहेत”.

त्यांनी सा-या वाईटांचा सामना केला आणि समस्या पार केल्या मात्र हे करताना जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. हे करत असतानाच त्यांनी परंपरा तोडली आणि पुरूषांचा व्यवसाय समजल्या जाणा-या वाहन चालक व्यवसायात स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांच्या तीव्र इच्छा शक्ति आणि महत्वाकांक्षेमुळेच हे शक्य झाले, ज्याचे आज इतर महिलांसमोर त्यांनी उदाहरण घालून दिले आहे.