ठाणेस्थित संस्था ‘मिमांसा’ने शिक्षणात मागे पडलेल्या ४०० गरीब मुलांना शिकण्याचे दिले बळ!

0

एक सेवाभावी संस्था जिने सरकारी शाळेत जाणा-या गरीब मुलांना शिक्षणात पुढे जाताना व्यक्तिमत्व विकास आणि शिक्षण यांचे महत्व पटवून दिले. आकडे लिहिताना, अक्षरे आणि वाक्य लिहिताना मोहिनीला कंटाळा येत असे, ती ठाण्यातील महापालिकेच्या सावरकर नगर येथील शाळेत चवथीच्या वर्गात शिकते. तिला डायस्लेक्सिया म्हणजे शिकण्यातील आकलन शक्तीचा आभाव होता, त्यात भाषिक अडचण देखील होती. त्यामुळे गणिता सारखे विषय आणखी बोजड वाटू लागले होते.


मात्र मिमांसा मधील शिक्षकांच्या मदतीने मोहिनी आता अक्षरे अंक वाचू लिहू शकते आहे. आता तिला गणित सोडवता येते आणि ती घड्याळात पाहून वेळ देखील सांगू शकते. मोहिनी नशिबवान आहे कारण तिला वेळीच मदत मिळाली, मात्र अशा अनेक मुलांना शाळेतील अभ्यासात गती नसल्याने मंद बुध्दी मानले जाते.

“ आपण समजतो त्यापेक्षा ही गोष्ट अगदीच सामान्य आहे, आपण एकटेच नाही. आणि आयूष्यभर हा गोंधळ होत राहतो की तुम्हाला नक्की काय करायचे आहे. ही व्दिधा मन:स्थिती कायम राहू शकते.” हॉलीवूडचे चित्रपट निर्माता स्टिवन स्पिलबर्ग यांची ही वाक्य आहेत, जे स्वत: कधी काळी मंदबुध्दी होते, भारतात १३-१४ टक्के मुलांना या मंदबुध्दीत्वाचा आजार असतो. शिकण्यातील मागासलेपणाच्या या केंद्र सरकारच्या केंद्रीय पाहणी नुसार हा प्रकार बौध्दिक आजाराचा भाग आहे. ज्यात मेंदूला काही गोष्टी समजण्यास, करण्यास आणि आठवण्यास प्रतिसाद देण्यास वेळ लागतो.


भारतात, बहुतांश शाळामध्ये मुलांच्या या वैगुण्याला ओळखण्यात चूक होते, की त्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेकदा आर्थिक कारणानी ते शक्य होत नाही. मात्र येथे काही शिक्षक आहेत ज्याना अशा विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना इलाज करता येतो. अशाच  एक शिक्षिका आहेत पूजा जोशी. ज्या मिमांसाच्या संस्थापिका आहेत. 

त्या म्हणाल्या की, “ वयाच्या २१व्या वर्षी मी फ्रेंच शिक्षिका  म्हणून आठवी आणि बारावीच्या वर्गात शिकवण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी मला क्लास टिचर म्हणून अशी स्पेशल मुले दिसून आली. त्यातील काहींची नावे लिहून दिली मात्र त्यांना काय समस्या आहेत त्या शिक्षकांनाही सांगता येत नव्हत्या.” पुजा पुढे म्हणाल्या की, “ त्यानंतर मी आतंरराष्ट्रीय शाळेत गेले, जेथे रिसोर्स रूम होती ज्यात लर्निंग डिसॅबिलीटी शिकण्यातील मागासपण प्रथमच अधोरेखित केले गेले होते. तेथेच मी पहिल्यांदा पाहिले की, मुलभूत शिक्षणात मागे पडणा-या मुलांना काय समस्या असतात. ज्या सहजपणे दुर्लक्षित  केल्या जातात. त्या नंतर मी या संदर्भात सेवाभावी संस्थेच्या कामात भाग घेतला आणि या समस्येबाबत जास्तीची माहिती घेण्यास सुरूवात केली.”


त्यांनी २०१२मध्ये  मिमांसाची स्थापना केली. जी सेवाभावी शिक्षकांचा समूह होती. विशेष शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ आणि मेंदू विकार तज्ज्ञ यांचा त्यात समावेश होता. सध्या ही संस्था ठाणे शहरातील किसन नगर आणि सावरकर नगर येथे कार्यरत आहे आणि चारशे पेक्षा जास्त मुलांना मदत करत आहे.

“ आम्ही सेवाभावी शिक्षण कार्यक्रम राबवितो, त्यात गणित इंग्रजी आणि हस्तकला यांचा समावेश असतो. आम्ही उपचार कार्यक्रमही राबवितो जी मुले शैक्षणिक मागास असतात त्याना खेळातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. या हसत खेळत शिक्षणाचा  सकारात्मक फायदा होतो. हा कार्यक्रम प्रशिक्षित  समुपदेशक आणि विशेष शिक्षक चालवितात”. पुजा म्हणाल्या.


जिथे इच्छा तिथे मार्ग असतोच

मिमांसाला आत्मा एज्यूकेशन ट्रस्ट, उडान इंडिया फाऊंडेशन आणि प्रेरणा यांनी प्रायोजकत्व दिले आहे. ज्यांनी मिळून मुलांच्या जीवनात विकास करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला निधी आणि समर्थन दिले आहे 'अनलिमिटेड इंडिया' या सामाजिक संस्थाच्या पुरस्कर्त्या संस्थेने. संस्थेचे लक्ष्य आहे की सर्वात हेळसांड होणा-या सरकारी शाळांतील मुलांच्या शिक्षणात विकास करून त्यांचे व्यक्तिमत्व विकास साधणे, जी शैक्षणिक मागासलेपणाने मागे पडत असतात.

लेखिका : आर सरिता.