लोकांना डिजीटल व्यवहारांसाठी प्रशिक्षित करण्यासाठी सरकार सुरु करत आहे २४तास दूरचित्रवाणी वाहिनी!

0

भारतात लोकांना डिजीटल आणि कॅशलेस व्यवहारांसाठी प्रशिक्षित करण्यासाठी, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नुकतेच २४तास चालणारे फ्री टू एअर चालणा-या दूरचित्रवाणी वाहिनीचा शुभारंभ केला. डिजीशाळा नावाच्या या वाहिनीवर हिंदी आणि इंग्रजीतून कार्यक्रम प्रसारित केले जातील. लवकरच ही वाहिनी स्थानिक भाषांमध्येही सुरु केली जाणार आहे.

दूरदर्शनच्या वृत्तानुसार, प्रसाद म्हणाले की, दैनंदीन व्यवहारात लोकांना येणा-या अडचणी या वाहिनीच्या माध्यमातून दूर करता येतील. ग्रामिण आणि मध्यमवर्गीय दर्शकांना लक्षात ठेवून या वाहिनीवरुन कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यात त्यांना इ वॉलेट, युपीआय, युएसएसडी,आधार, इत्यादी डिजीटल पर्यांयाची तज्ञांकडून माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविली जातील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डांचा वापर करण्याबाबतचे टॉक शो केले जातील ज्यातून त्यांना शंका समाधान करुन घेता येईल”.

सध्या, या २४तासांच्या वाहिनी जवळ चार तास दाखविता येतील इतक्या माहितीची तयारी आहे. दूरदर्शनची यंत्रणा वापरून ही वाहिनी सध्या चालविली जात असल्याने त्यासाठी वेगळ्या खर्चाची तरतूद केली गेली नाही. “त्यामुळे सध्या आम्ही ही वाहिनी थोड्या प्रमाणात चालवितो आहोत, ही लोकांचे शिक्षण आणि जागृतीसाठी काम करेल. आणि लोकांना मदत करेल परंतू पुढील काळात हिच्या पूर्णवेळ प्रसारणासाठी तयारी केली जात असून त्यातून अनेक उपयोगाचे कार्यक्रम केले जातील”एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयांच्या माहिती नुसार,पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनी नोटांबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल व्यवहारांची वाढ .४०० ते १.००० टक्के वाढली आहे. नव्या वाहिनीमुळे जागरुकता वाढेल आणि हे प्रमाण आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल असे मंत्रालयाचे मत आहे.